।। उलटी व्यथा ।।
भर सांजेशी आज पहाट झाली ।
अन्नाला आज भुक लागली ।।
मुलगा आज सासरी चालला ।
हुंड्यासाठी कुणी जावाई मारिला ।।
पिकवून धान्य शेतकऱ्याने हुंडी घातली ।
व्यापाऱ्याने मग फाशी घेतली ।।
भ्रुणहत्तेची व्यथाचं भारी ।
पुत्राला बाप पोटातचं मारि ।।
सारंग आज नदीस भेटला ।
पडला पाऊस अन् डोह आटला ।।
शिकला माणुस अन् नवलचं केले।
पोरांवर मग बलात्कार झाले ।।
जनतेनं आज तावं मारिला ।
भ्रष्टाचारी फक्त पाहु लागला ।।
न्यायाच्या हो ईथे उलट्याच बोंबा ।
चोराला सोडा अन् शावाला कोंबा ।।
शिवाने मांडली उलटीच व्यथा ।
कळेल का कुणाला माझी कविता ।।
© शिवा चौधरी (कळमसरेकर)
जामनेर, जळगांव
सीमा सुरक्षा बल
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें