सोमवार, 7 सितंबर 2015

आण्णाभाऊ साठे

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

    ।।आण्णा भाऊ साठे ।।

वाटेगावात जन्मले
पायी मुंबई गाठले
असे कर्तुत्वान मोठे
नाव आण्णा भाऊ साठे

दोन दिवसाची शाळा
तरी रचिला पोवाडा
फक्त पोवाडाच नाही
साहीत्यात नाव होई

"माझी मैना गावा कडं"
गाजली लावणी ज्यांची
स्वच्छ ठेव मन् तुझे
हीच शिकवण त्यांची

किर्ती तयाची लिहण्या
शब्द पडती अपुरे
माझ्या आण्णा भाऊंसाठी
कसे लिहावे साजरे

©शिवा चौधरी(कळमसरेकर)
      जामनेर,जळगांव
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें