गुरुवार, 28 जुलाई 2016

"भिजुनी ओले चिंब"

भिजुनी ओले चिंब

पावसा यैक जराश्या
भावना या अंतरीच्या
स्वप्ने होती निसटली
धाग्यातून जरीच्या

काळजाची लक्तयं
देखिले तव प्रकाशी
जमवूनी कवटाळले
धडधडत्या ऊराशी

तव आगमनाने
खुलल्या मुखी कळ्या
धागे सरींचे शिवती
काळजाच्या चिंधळ्या

भेगाळल्या भूईला
थंडावून जाई गारवा
विस्कटल्या घरट्याचा
जिर्णोद्धार करी पारवा

सर्प जणू धरेवर
रेंगाळती खुशितं
अंकुरतील बीज सारे
वंसुधरेच्या कुशितं

जळफाटल्या मनांचे
शमले कित्तेक दाह
"भिजूनी ओले चिंब"
आज थंडावला देह

शिवा चौधरी
जामनेर,जळगांव

छक्कड

छक्कड

मी गं राघू , तु माझी मैना
माझ्या जीवाची झालीया दैना
तु होशिल का ? दिलाची राणि
तुझ्या वाचून जीव काही राहीना

तुला न्हातांना वढ्यावर पाह्यली
तुझ्या रुप्पाची छक्कड गायली ||धृ||

तुझ्या रुप्पानं झालाय येडा
ह्यो गबरु गडी भोळा
काळजास करी घायाळ
तुझ्या केसांचा आंबाडा
बट केसांची पाण्यासंग वाह्यली
तुझ्या रुप्पाची छक्कड गायली ………1

नाक चाफेकळी व्हट लाल
काळा तीळ गोरा गोरा गालं
पीळ बघूनिया ज्वानीचा
गडी झालाय बेहाल
मेनका डोळ्या म्होरं उभी राह्यली
तुझ्या रुप्पाची छक्कड गायली ………2

जवा नजर गड्यावर ठरली
नारं खोलात अजून शिरली
गोरीमोरी झाली गं मैना
पाणी होऊन पाण्यात इरलि
गार पाण्यात बी होतिया काह्यली
तुझ्या रुप्पाची छक्कड गायली ………3

खोल पाण्यात ऊर धडधडला
रंग ज्वानीचा मनात भरला
पाणी चावट वढ्याचं भारी
तुझा पदर पाण्यावर तरला
डोही मासळी वळवळू राह्यली
तुझ्या रुप्पाची छक्कड गायली ………4

तु लखलखली गं अशी
जशी सळसळती नागिण
तु दिलाची खमकी अशी
मला भासली वाघीण
माझ्या रुप्पाला वाघीण भायली
तुझ्या रुप्पाची छक्कड गायली ………5

शिवा चौधरी
जामनेर,जळगांव