बुधवार, 28 अक्टूबर 2015

गाठीभेटी

1) गाठीभेटी

नकळत भेटले तुला अन्
प्रेमात तुझ्या रे पडले,
ऋणानुबंध जिवनाचे या 
गाठीभेटी तून जुळले…

शब्दांच्या माधुर्यानेच कसे
स्नेही आकर्षित होती,
मग शब्दांच्या पावसात तेही
चिंबचिंब न्हाती,
शब्दांच्या खेळातुनच आज
मनी काव्य हे उमळले,
ऋणानुबंध जिवनाचे या 
गाठीभेटी तून जुळले…

सप्तरंगी रंगून निळे नभ ही
रंगीत मग होती,
इंद्रधनुच्या दुव्या मधला इथं
रवीकर का विसरती,
लुभावणाऱ्या इंद्रधनुचे दर्शन
रवि किरणांमुळे घडले,
ऋणानुबंध जिवनाचे या 
गाठीभेटी तून जुळले…

पुष्प परागांची बदली भवऱ्यासवे
मक्षिकाही करती,
मधुर फळ चाखणारे का त्या
गाठीभेटी विसरती,
सृष्टिच्या त्या किमयेचे मज
मर्म न अजून कळले,
ऋणानुबंध जिवनाचे या 
गाठीभेटी तून जुळले…

अथांग सागराच्या मधोमध ही
नृत्य लिलया त्या करती,
किनाऱ्याच्या पालवीस त्या लाटा
अवचित भेटुन जाति,
बंध रेशमी धाग्यांचे सारे
नकळतच होते वळले,
ऋणानुबंध जिवनाचे या 
गाठीभेटी तून जुळले…

गगनी उडणाऱ्या मातेस साद घाली
घरट्यातला पारवा,
जळत्या मनाला सुखावून जाई
भेटीतला गारवा,
विना भरारीचे जगी या
कुणा न काही मिळले,
ऋणानुबंध जिवनाचे या 
गाठीभेटी तून जुळले…

©शिवा चौधरी(कळमसरेकर)
      जामनेर,जळगांव
2)

गाठीभेटी

भेटता स्नेही सारे
शब्दातुन मने उमडली,
तव ऋणानुबंधने
गाठीभेटीतून जुळली.

शब्दांचा गोडवा मुरून आला,
शब्द रसात चिंब चिंब न्हाला,
शब्दांसवे स्नेहचव हि कळली,
तव ऋणानुबंधने……

सप्तरंगी साजते निळ्या नभी,
मनमोही इंद्रधनुची छबी
रवि किरणे स्पटीकास भिडली,
तव ऋणानुबंधने……

पराग कणांची किमया न्यारी,
मधुर फळांची चवच भारी,
किटकांची भूल का ? जिवा पडली,
तव ऋणानुबंधने……

उसळती लाटा संथ सागरी,
येऊन भिडती किनाऱ्यावरी,
बंधने तयाची कशी आवळली,
तव ऋणानुबंधने……

पिलांसाठी मादा उडे आकाशी,
सांजवेळी येई घरट्या पाशी,
भरारी विन कुणा पै न मिळली,
तव ऋणानुबंधने……

©शिवा चौधरी(कळमसरेकर)
      जामनेर,जळगांव

मंगलवार, 27 अक्टूबर 2015

मनाला भावतं……

मनाला भावतं……

मनाला भावतं……
तुझं उगवतीच्या पानासम
कोवळं दिसणं,
अन् उथळ झऱ्यासम
खळखळून हसणं.

मनाला भावतं……
तुझ्या रेशमी केसांचं
भुरभूर उडणं,
अन् नाजुक पापण्यांच
हळुच फडफडणं.

मनाला भावतं……
तुझ्या डाळिंबी ओठांचं
लालजर्द दिसणं,
अन् नाजूक नाकाचं
चाफेकळी असणं.

मनाला भावतं……
तुझं टुकूर टुकूर
माझ्याकडं बघणं,
अन् नजर मिळताच लाजून
जमीनीकडे बघणं.

मनाला भावतं……
उगाच गळ्यातल्या माळेच्या
मण्यांशी खेळणं,
अन् शुभ्र दातांच्या जात्यात
ओठाला दळणं.

मनाला भावतं……
तुझं लटक्या रागातलं
खोटंखोटं रुसणं,
अन् हळूच तोंड लपवत
गालातचं हसणं.

मनाला भावतं……
तुझ्या कानातल्या झुंबराचं
हळूच हलणं,
अन् मैत्रिणीच्या बहाण्यातून
माझ्याशी बोलणं.

मनाला भावतं……
तुझं लाजाळू समान
साजूक लाजणं,
अन् श्रावण सरींखाली
चिंबचिंब भिजणं.

शुक्रवार, 23 अक्टूबर 2015

राजे शिवाजी राजे

राजे शिवाजी राजे

राजे $  राजे $
राजे $ शिवाजी राजे $………

धगधगते अंगार शिवाजी
तळपती तलवार शिवाजी
सिंहाची दहाड शिवाजी
सह्याद्रीचे पहाड शिवाजी

राजे $  राजे $
राजे $ शिवाजी राजे $………

लाभली तयाला गुरूमाऊली
आई जिजाऊ परी,
लढले हो राजे स्वप्न घेऊनी
स्वराज्याचे उरि,
आमुचे सरदार झाले
स्वराज्याचे शिलेदार झाले

राजे $  राजे $
राजे $ शिवाजी राजे $………

रांझ्याच्या पाटलाला दिली
हो त्यांनी शिक्षा,
स्वराज्याच्या नरनारीची
राजे करती रक्षा,
अन्ययाचा काळ राजे
आई जिजाऊचे बाळ राजे

राजे $  राजे $
राजे $ शिवाजी राजे $………

वाघ नखानं वार केला
त्यांनी खानावरी,
शाहिस्तेची तोडून बोटे
फेकली भूईवरी,
दृष्टांचा संहार करती
पळता भूईफार करती

राजे $  राजे $
राजे $ शिवाजी राजे $………

छत्रपती हि उपमा त्यांना
ऐसी अनुकूल साजे,
शेतकऱ्यांच्या हितासाठी
झटले आमुचे राजे,
बळीचा उद्धार करीती
सोन्याचा नांगर धरती

राजे $  राजे $
राजे $ शिवाजी राजे $………

गुरुवार, 22 अक्टूबर 2015

समजु नका लेखणीची बोथट झाली धार……

समजु नका लेखणीची बोथट झाली धार……

लिहती जरी लावणी, गजल
अन् कवितेचे विविध प्रकार
समजु नका लेखणीची
बोथट झाली धार……

लिहती जरी प्रेमकविता
किंवा लावणीचा झटका,
भ्रष्टाचार करणाऱ्यांवर
लगावती शब्दाचा फटका,
अन्ययाचा पक्ष घेऊन
बोलू नका रे फार,
समजु नका लेखणीची
बोथट झाली धार……

मारलेत तुम्ही पानसरे
अन् मारले दाभोळकर,
मारलेत जरी कलबूर्गी
पण पुन्हा जन्मले हाजारांवर,
मारणार तुम्ही विचारवंत
पण मरत नाहित विचार,
समजु नका लेखणीची
बोथट झाली धार……

त्यांच्या समोर बोलायला
बोबडी का हो वळतेय,
का ? असे लाजिरवाणे
वर्षानुवर्षे घडतेय,
शब्द नव्हेत ती त्यांची
शस्त्र आहेत धारदार,
समजु नका लेखणीची
बोथट झाली धार……

कायदे करुन माणसांची
मुसकी आवळू नका,
समाजसेवा करा प्रांजळपणे
नुसता देश गिळु नका,
कायदा असा करा तुम्ही
ज्याने थांबेन रे भ्रष्टाचार,
समजु नका लेखणीची
बोथट झाली धार……

रक्त पिऊन इथं सारि
बनलित बघा ढेकून,
निवडणूकीच्या टप्प्यात मात्र
नमस्कार करती वाकुन,
शब्दांना शब्दच राहू द्या
त्यांचा सोसवणार नाही प्रहार,
समजु नका लेखणीची
बोथट झाली धार……

अन्यायाच्या विरोधात
बोलते लेखणी त्यांची,
मोठमोठ्या घोटाळ्यांचे राज
सुद्धा खोलते लेखणी त्यांची,
बोलत राहील सदा ती
नाही कुणाला ही भिनार,
समजु नका लेखणीची
बोथट झाली धार……

            ©शिवा चौधरी(प्रहार)
                जामनेर,जळगांव

शुक्रवार, 16 अक्टूबर 2015

खपली

खपली

करुन घाव रक्त सांडण्या
सारे इथं टपली,
उगाच नाही जपत आलो
जखमेवरची खपली || धृ ||

जखम केली पावसानं
जाळलं सारं रान,
पाण्या वाचुन गुरंढोरं
सोडू लागली प्राण,
उरल्या सुरल्या पिकानं
मान खाली टाकली…
उगाच नाही जपत आलो
जखमेवरची खपली……………

काढुन खपली त्रास होतो
पुन्हा अनावर माझा,
सावकाराच्या दारी जाता
दिसे बंद दरवाजा,
वेदनेच्या वनव्यामंधी
रक्तासंग काया सुकली…
उगाच नाही जपत आलो
जखमेवरची खपली……………

मलम म्हणुन आम्हा
दिल्या थोड्या टिकल्या,
जखमेवर मीठ चोळतांना
का? असतील लाजा विकल्या,
नाव मोठं करण्यासाठी
असतील का? ती चगली…
उगाच नाही जपत आलो
जखमेवरची खपली……………

जित्यापणी मरतांना
कुणी तिथं फिरकत नाही,
का करतोय आत्महत्या
कुणीच का विचारत नाही,
मेल्यानंतर पोरांसंग
फोटो काढण्या झुकली…
उगाच नाही जपत आलो
जखमेवरची खपली……………

आरं शेती संग मरणाची
कारण असती खुप,
जित्यापणी मारतीया रं
चिमुकल्यांची भुक,
शेतकऱ्यांच्या आनंदाची
गाडी कशी हुकली…
उगाच नाही जपत आलो
जखमेवरची खपली……………

आज सांगतो ठोकुन छाती
संकटाशी लढणार,
किती येवो दुःख तरी
संघर्ष मी करणार,
देईन मज सहारा
ही काळि आई आपली…
उगाच नाही जपत आलो
जखमेवरची खपली……………

चला ऊठा संघर्ष करा
अजून थोडा धीर धरा,
पावसा संग तारेल रे
आपणाला वसुंधरा,
देव"इंद्राची" कुणाजवळी
नका करु रे चुगली…
उगाच नाही जपत आलो
जखमेवरची खपली……………






बुधवार, 7 अक्टूबर 2015

लावणी

लावणी

अहो काय बाई उगाच बसला,
चला फेरफटका आज मारु या....
आणि शब्दातुन हो या जिभेचे,
चोचले आज पुरवू या...गं गं गं ……
माझी राणी तू गं…माझी राणी तू  गं…

आरं बाजारातुन रोजचं वांगी,
अन् मीरच्या आनतो संगतीला…
भाजून वांगी अन् मीरच्यांच,
भरीत करु चल पंगतीला...गं गं गं ……
माझी राणी तू गं…माझी राणी तू  गं…

अगं लय मजा ती खान्देशाच्या भरीता मंधी,
एवडचं आहे तुले आता सांग्याचं...
अन् चारिन मया हातचं तुले,
भरीत रोज मी वांग्याचं...गं गं गं ……
माझी राणी तू गं…माझी राणी तू  गं…

पुरणपोळी अन् श्रीखंड पुरी
आमरस भेटे कधी कधी…
अन जोंधळ्याच्या भाकरी संग,
ठेचा चाले तोऱ्यामंधी...गं गं गं ……
माझी राणी तू गं…माझी राणी तू  गं…

अगं नाक मुरडूनी का गं बसली,
काय हवं तुला बोलं तरी…
अन् कोकणाच्या आठवणसाठी,
आणुन देतो काजूकरी...गं गं गं ……
माझी राणी तू गं…माझी राणी तू  गं…

काजूकरीचे नाव ओठी येता,
खुलली तुझी कळी गं…
अन् कोकणातल्या पापलेटाची,
दिसते तुजला गोडी गं...गं गं गं ……
माझी राणी तू गं…माझी राणी तू  गं…

झिंगला गं जीव हा माझा,
या फास्टफूडच्या वासानं…
अन् तृप्त होई जीव हा सारा,
मराठमोळ्या घासानं...गं गं गं ……
माझी राणी तू गं…माझी राणी तू  गं…

समाचार

पंकज तोमर ने संयुक्त राष्ट्र संघ के शांतिसेना मे पहुचाया पोरसा के नाम को ।

विश्व में बहुत से देशो में राजनितीक अस्थिरता के कारण जनजीवन अस्थव्यस्त है, उसमें अमेरिकी उपमहाद्विप के हैती मे भी लोग गंभीर परीस्थिती का सामना कर रहे है। इसी देश मे पोरसा के पंकज तोमर ने विश्व शांति दल का हीस्सा बनकर कठिण कार्य करते हूये, पोरसा के नाम को  संयुक्त राष्ट्र संघ के शांति सेना तक पहुचाया।

सन् 2000 में पहुचें थे बी. एस. एफ. :-

पोरसा तहसिल के खेरिया गाँव के बी जे पी के पुर्व नेता श्री राजेंद्र सिंह तोमर के भतीजे पंकज(अवधेश)तोमर सन् 2000 में बी एस एफ में चयनित किये गये थे। और निरंतर सेवा में रहते हूये इन्होनें देश के
विभीन्न हिस्सो में अपनी निस्वार्थ सेवा देश को बहाल  कि।

चयन प्रक्रिया :-
पंकज कि पिछली 15 साल कि कठिन एवं बेहतरीन सेवा का रिकॉर्ड देखते हूये बी एस एफ के वरीष्ठ अधिकारीयों ने, एक साल (2015)के लिये इस् कार्य हेतु उसका चयन किया। इस् चयन प्रक्रिया के दौरान उन्हे स्वास्थ जाँच, शारीरिक क्षमता, फ़ायरिंग कौश्यल एवं बुद्धिमत्ता का बखुबी परिचय देना पडा।

पंकज कि कलम से(✒):-
सोशल मिडिया के माध्यम से पंकज कहते है। मुझे गर्व है कि, मै भारतीय हूं। क्यो कि विश्व के अनेक ऐसे देश है जहाँ पर समश्यायों कि कमी नही है, हम उनकी अपेक्षा अच्छे ही है, तथा वह अपने परिवार को भी बहुत याद करते है। उनके परिवार में माताजी,भाई , पत्नी एवं दो बच्चे है, जो ईनका सदैव हौसला बढाते है।

07/10/2015

लावणी

लावणी

ज्वानीच्या, इश्काच्या, धुंदीत राया…
जळते रे माझी कोमल काया…
कुणी ताबा या देहावर मिळवा,
घोडा मदनाचा सुसाट पळवा…
हो घोडा मदनाचा सुसाट पळवा…

माझ्या पिरतीची मजाच न्यारी…
डाव्या डोळ्याची लवलव भारी..
कुणी लवलव या डोळ्याची थांबवा,
घोडा मदनाचा सुसाट पळवा…
हो घोडा मदनाचा सुसाट पळवा…

माझ्या ओठांची गुल्लाबी लाली…
खडी नाजूक गोऱ्या गाली…
माझ्या ओठांना ओठ कुणी भिडवा,
घोडा मदनाचा सुसाट पळवा…
हो घोडा मदनाचा सुसाट पळवा…

या या चोळीचा पिवळा रंग…
बघा चोळी ही झालीया तंग…
नवी चोळी माझ्यासाठी मागवा,
घोडा मदनाचा सुसाट पळवा…
हो घोडा मदनाचा सुसाट पळवा…

माझ्या उरात धडकी भरली…
अंगी मदनाची आग सरसरली…
कुणी आगीला आता या विझवा,
घोडा मदनाचा सुसाट पळवा…
हो घोडा मदनाचा सुसाट पळवा…

ज्वानी फुटून उरात भरली…
साऱ्या गावात चरचा पसरली…
कुणी रायाला माझ्याबी कळवा,
घोडा मदनाचा सुसाट पळवा…
हो घोडा मदनाचा सुसाट पळवा…

मंगलवार, 6 अक्टूबर 2015

पित्तरपाटा

पित्तरपाटा

घरी बाजरीचा घाटा
तरी करी पित्तरपाटा
बाप जिताव्हता तवा
अवधडा त्येच्या वाटा

जिते पणी तुयासाठी
राबराबली माऊली
तवा दिली नाही तीले
कुनी मायेची साऊली

आता शेरभर तुप
सांडीतो आगीवर
जीत्या पणी तेयेले
भेटेना सुखाची भाकर

पोटं भरलं कावळ्याचं
कसं शिवलं पिंडाला
काही दक्षिणेसाठी सांगे
तुया बाप रे रुसला

श्राद्ध करुन बापाचं
थोडा दान धर्म कर
कावळा शिवेल पिंडाला
असं काही कर्म कर

चोहीकडे लुट सारि
भीति दावितो धर्माची
शिकुन ही वाया गेला
कहानी विसरी कर्माची

:        ©शिवा चौधरी(कळमसरेकर)
               जामनेर,जळगांव

वाघ्या - मुरळी

वाघ्या - मुरळी

देव मल्हारीले असा
का रे नवस बोलला
उगा सोडता रे वाघ्या
का रे पोटच्या पोराला

नाव वाघ्या त्याचं तरी
जीणं का रे कुत्र्यावाणी
पोटाचं रिकामं खडग़ं
कधी फिरे अनवाणी

तुझी मागची रे पोरं
तेचा असे पायगुण
का रडवी माऊलीले
तीचं सरलं का? पुणं

पोराच्या हवासा पायी
देवा नवस तो फेडी
सोन्यावाणी पोरं जरी
बाप सोडतो मुरळी

लगीन लावूनी देवाशी
तरी फिरे वणवण
पोटा साठी दारोदारी
मुरळी घाली जागरण

नाव जागरणाचं तरी
पाप दुनियेच्या डोयी
नासवू नका रे पोरी
अशा अंधश्रद्धे पायी

वाघ्या मुरळीचं जीनं
एक दिसं तर जगा
कसं जळतं रे मनं
उघड्या डोळ्यांनी रे बघा.

(अजुन ही काही भागात, वाघ्या आणि मुरळी सोडण्याची प्रथा समाजाची पाठ सोडतं नाहीये. या साठी समाजात जागरुकता येणे जरुरी आहे. मानवाला जगण्याचा समान हक्क सृष्टिकर्त्याने दिलाय, मग त्यांचं जिणं कवडीमोल करण्याचा अधिकार आपल्याला कुणी दिला.)

टिप :- लंगर हा मराठी चित्रपट यावरच आधारीत आहे, जमल्यास नक्की बघा. डोळ्यात अश्रु तरळणारचं……

इज़हार

°``°``°`` °``°``°`` °``°``°`` °``°``°
                  इज़हार

मेरे शायरीं के लब्ज़ ,
दिल की बातें बयां करती हैं।
शायद इसलिये यारों,
वह मेरे गली सें गुजरा करती हैं।

जब मैं गुमसूम रहता था,
तब गलीयों में उसे देखा ही नहीं।
और बोलने लगा शायराना अंदाज में,
तब उसने अपने आप को रोका ही नहीं।

वह नैन मटक्का करती  रही,
मैं बस शरमाता रहा।
हर दिन गली से गुजरते वक्त,
प्यार से उसे ताकता रहा।

पर एक दिन भी हिम्मत न आयी,
कि उससे इज़हार करु गुमनाम से प्यार का।
कि सपना देखू जिंदगीभर साथ जुटाने,
ऐसी गुलज़ारसी नार का।

आज़ तो उसने हद कर दी ,
बेधडक मेरें व्दार पर दस्तक दे दीया ।
मैं इज़हार करना चाहता था आज़,
पर उसने हाथ में शादी का कार्ड रख दिया।

टूट गया दिल मेरा उसकी इस हरकत सें,
मैनें बस शरमाके नजरें झुका ली।
भाई के शादी कार्ड हैं ओ सनम कहकर,
खुद ही इज़हार कर के चल दी।

     शर्मिला आशिक

°``°``°`` °``°``°`` °``°``°`` °``°``°

गुरुवार, 1 अक्टूबर 2015

येरे येरे येरे

स्पर्धॆ साठी....

येरे येरे येरे, तु ये ना घरा...

गेला कुठे दूरदेशी, सांग ना मला..  - 2
येरे येरे येरे, तु ये ना घरा...  - 2

तुझ्या कृपेने भिजवं ना मळा - 2
मिळू दे रे दोन घास या जीवना -2
काय अशी चूक झाली सांग ना मला -2
येरे येरे येरे, तु ये ना घरा... -2

आठवांच्या रूपात येतो खरा -2
आसवांचा पाऊस झेले धरा -2
सुखले डोळे अन् सुखला गळा -2
येरे येरे येरे, तु ये ना घरा... -2

फाटली रे धरणी आणि भेगाळले मन् -2
सुखले रे पीक बाबा सुखले रे तन् -2
कशा सोसू रे विरह वेदना..-2
येरे येरे येरे, तु ये ना घरा... -2

सोसतांना भूक माझी मरती गुरं -2
व्याकुळली बायको आणि व्याकुळली पोरं -2
येतो घरा कि संपवू जिवना -2
येरे येरे येरे, तु ये ना घरा...-2

©शिवा चौधरी(कळमसरेकर)
      जामनेर,जळगांव