शुक्रवार, 29 जनवरी 2016

लिहत गेलो लिहत गेलो

लिहत गेलो  लिहत गेलो

लिहत गेलो  लिहत गेलो
लिहता लिहता भारावलो
भारावून लोचणी आला पूर
शेतकऱ्याची व्यथा लिहतांना
भरभरुन आला उर……………

लिहत गेलो  लिहत गेलो
लिहता लिहता हरवलो
हरवलो तुझ्या आठवात
अजून किती दीस जगू सांग
सखे तुझ्या विरहात………

लिहत गेलो  लिहत गेलो
लिहता लिहता गहिवरलो
गहिवरतांना चिंता खाई मनाला
कन्ये वाचून कसे जगावे
का? कळेना या मानवाला………

लिहत गेलो  लिहत गेलो
लिहता लिहता दचकलो
दचकलो इतक्या साठी
नाते ही का? विसरती लोकं
दोन दिवसाच्या सत्तेसाठी………

लिहत गेलो  लिहत गेलो
लिहता लिहता गोंधळलो
गोंधळून झालो बेजार
क्षणाच्या वासनापूर्ती साठी
का ? विकत घेताय आजार……

लिहत गेलो  लिहत गेलो
लिहता लिहता भटकलो
का? जगू नये किन्नराने
माणसा सारखं मानानं
या स्त्री सारखं आदरानं……

लिहत गेलो  लिहत गेलो
लिहता लिहता थकलो
शब्दा मध्ये विवेक भर रे शिवा
डोळे असून अंधळ्यांना दाव
समाज कल्याणाचा तू दिवा……

© शिवा चौधरी
     जामनेर,जळगांव

गुरुवार, 28 जनवरी 2016

चल दिस ते जगूया

चल दिस ते जगूया

चल दिस ते जगूया
बालपणात शिरुया
पुन्हा होऊन लहानगे
थोडं ऊनाड फिरुया

फुलपाखरु धरुया
बैल मातीचा करुया
झोका बांधुन झाडाला
उंच हिंदोळा घेऊया

काही वेगळं करुया
पीकं पैशाचं पेरुया
आई नसतांना घरी
थोडी साखर चोरुया

चल बांधानं फिरुया
सारं शिवारं घेरुया
पात तोडूनं कांद्याची
त्याच्या पिपाण्या करुया

किल्ला वाळूचा करुया
उन्हातान्हात फिरुया
पानं तोडून एरंडाची
माथी सावली धरुया

क्षण निसटले जे होते
पुन्हा क्षण ते धरुया
नाही सर बालपणीची
चल प्रयास करुया

© शिवा चौधरी
     जामनेर,जळगांव

बुधवार, 27 जनवरी 2016

हास्य कविता -3

मंडीतल्या गप्पा

मंडीतल्या भाज्या
गप्पा मारु लागल्या
एक मेकांच दुखणं
सांगत फिरु लागल्या

हळद म्हणाली बिटाला
तुझा लाल रंग कुठं गेला
कुणाच्या विरहात हरवला
कि कुणाच्या नकारात उडाला

बिट म्हणाले गप्प बैस
या बायका काहीही करतील
आज माझा रंग त्यांच्या ओठी
उद्या पिवळा शेड ही फिरवतील

नाचत नाचत भेंडी बोलली
म्हणे मी कशी नाजूक नार
भोपळ्या तुझा दुधी रंग
का? झालाय रे हद्दपार

भोपळा म्हणाला भेंडी ताई
नजाकत कुठंच राहीली नाही
अर्धी अर्धी कापडं घालून
तीच्या अंगी माझा रंग दावतेय बाई

मक्का म्हणाला मीच बरा
अंगभर कपडे वर केसांचा तुरा
लाज सोडलीय नट्यांनी
दावत फिरती डौल सारा

मीरची म्हणे बिनकापडाची मी
पण फार तिखट आहे बाई
शिवाचं बोलणं माझ्यावाणी
हसतांना ही झोंबून जाई

© शिवा चौधरी
     जामनेर,जळगांव

हास्य कविता -2

होता येत नाही

या जगात एकदा झाला बदल
कि पुन्हा मुळ रुपात येता येत नाही
ही वास्तविकता तुम्हाला सांगतोय
हवेत खोटे तीर मारत नाही

शहाळाचं होतय बघा नारळ
पण नारळाचं शहाळं होत नाही
किती ही केली धडपड जीवाची
पुन्हा लहान कधीच होता येत नाही

मुलीचं रुपांतर बाईत होतं
बाईला मुलगी होता येत नाही
एकदा का नवऱ्याचा केला तीनं बैल
त्या बैलाला पुन्हा नवरा होता येत नाही

काही माणसं भेटतात अवचित
त्यांना पुन्हा भेटलं जात नाही
निवडणूकीत घरघर फिरतो
तोच नेता पुन्हा गावात येत नाही

आला जरी गावात चुकून
आश्वासन पुर्ती करता येत नाही
आणि विचारलाच प्रश्न कुणी
तर म्हणे पक्षा पुढं माझं चालत नाही

निवडणूकी आधी असतो माणूस
नंतर खाता खाता होतोय नेता
माणसाला नेता नक्की होता येतं
नेत्याला मात्र माणूस होता येत नाही

© शिवा चौधरी
     जामनेर,जळगांव

हिंदि चारोळी

जीतना दर्द सहता है पकौडा
गरमागरम तैल मे तलते वक्त
उतना ही दर्द सहता हू मै जानू
तेरे जुदाई कै गम मे जलते वक्त

शिवा

हास्य कविता -1

मी तुझा असा "राम" नाही

मी म्हटलं सखे
माझं प्रेम आहे तुझ्यावर
तु ही बोल एकदा
तु प्रेम करते माझ्यावर

ती म्हटली मी पतंग
तु त्या पंतगाचा मांजा
मागे वळून बघ जरा
लाईनीत दिसेल दुसरा रांझा

मी म्हटलं हिरीये
मी तुझा पहीला रांझा तर ठरलो
तुझ्या प्रेमासाठी रातंदिन
तुझ्या गल्ली बोळातुन फिरलो

ती म्हणे गल्ली बोळात
झुरळं ही फिरतात
तुझ्या सारखे कित्तेक रांझे
माझ्या "हिट" नेच मरतात

या लैला ला कळतो तुमचा
खोट्या नाट्या प्रेमाचा कावा
तु स्वतःला समजू नकोस पहीला
तु मजनू तिसराय भावा

मी म्हटलं माझा भाऊ केलास
आता सांग तुला पति कसा हवा
हवा श्रीरामा सारखा
कि तुला घन:शाम हवा

ती म्हणे मी प्रेमबावरी राधा
मला तो घन:शाम हवा
मी सिता कलीयुगातली
मला असा राम हवा

मी म्हटलो तुला झेलणं
या रामासाठी सोप्प काम नाही
तु असली जरी राधे "माँ" सर्वांची
मी तुझा असा "राम" नाही
मी तुझा असा "राम" नाही

© शिवा चौधरी
    जामनेर,जळगांव

सोमवार, 25 जनवरी 2016

चारोळ्या

तु जरी असली ज्योती
मी तुझी वात आहे
तुच देते प्रकाश साऱ्यांना
दुर्लक्षित ही पुरुषाची जात आहे

शिवा

मी एक शुल्लक सा कचरा
स्वैर भैर उडत होतो हवेत
नेऊन ठेवलं शिखरावर मला
हळूच घेऊन शब्दांनी कवेत

शिवा

मी शब्दाची कठपुतली
नाचू लागलो तालावर
कविता, गजल नाव माझं
खेळ कविंच्या बोटावर

शिवा

नाही रंग रूप मला
पण शब्दात माझ्या गोडवा आहे
आपल्या सारखे स्नेही भेटतात
तो प्रत्येक दिवस माझा पाडवा आहे

शिवा

तुझ्या इतकाच मी ही सखे
भोगत असतो रोजच वनवास
तू चित्रकारी अडगळीतली
मी त्याच चित्राचा कॅनव्हास

शिवा चौधरी

जितक्या वेदना सहतो वडा
उकळत्या तेला तळतांना
तितक्याच वेदना होती मला
तुझ्या विरहात जळतांना

शिवा

दुरावा

( ही रचना कोणत्याही व्यक्तिच्या स्वभावाला गृहीत धरुन केली नाही. किंवा ह्या रचनेचा इथं काही संबंध नाही. असं आढल्यास हा योगायोग समजावा अन शक्य झालं तर आपापसात प्रेम भाव वाढवावा, प्रत्येक जन आपल्याच हिश्याचं खातो. हिसकावत कधीच नसतो....)

दुरावा

तोडीस तोड देनारा भेटला
कि लोक ईग्नोर करु लागतात
कुणी जरी वागत असला प्रेमानं
का कुणास ठाऊक लोक त्याला टाळू लागतात

भीति तर वाटेत नसेल ना? त्यांना
त्याची मनातल्यामनात
कदाचित देईल एक दिवस
हा आपल्यालाच मात

अहो त्याच्या जवळचं कौशल्य
त्याच्या कडेच असतं
आपण ईग्नोर केलं
तरी सुद्धा ते दिसतंच

तो जवळीक करु पाहतो
पण ते दूरदूर पळतात
त्यांच्या यशानेच ते
मनोमन का ? बरं जळतात

अशी विलक्षण स्थिति
प्रत्येक क्षेत्रात सुरु असते
आणि आत्मकेंद्रीत केली
तर ती आपलीच भासते

©शिवा चौधरी
    जामनेर,जळगांव

हिंदि हास्य कविता

हास्य कविता

एक दिन वह बोली
सुनाओ कुछ ऐसा
उडने लगू पिया मैं
परीयों के जैसा

मैने कहा राणि तुम
परीयों सा उड न पाओगी
सुनकर मेरी कविता
जलभून जाओगी

उसने कहा मुझसे
चलो कैसे भी सुनाओ
और् सुना न पाओ तो
अपनी शकल दफा कराओ

मैने कहा मुझपर
शक न करो जानम
आवो बैठकर सुनेंगे
कुछ नया हम

है थोडी मोटी जरुर
पर है बडी प्यारी प्यारी
रंग उसका है गोरा
पर अकल की है वह मारी

चाहे मै चिढ़ाऊ कितना
रहती हर दम कूल है
अंग्रेजी का ई ना जाने
ऐसी ब्लडीफूल है

अंग्रेजी का नाम सुनकर
चूप कराया मुझको ऐसा
जैसे वह मारने वाली भैंस
मै उसका गरिब भैसा

सुन कर मेरी बात को
वह लगी हसने
मैने कहा क्यो हसती हो
ऐसा क्या है ईसमे

उसने कहा जानम
क्या कविता सुनायी ऐसी
वाकयी मे शकल तुम्हारी
है काले झोटे जैसी

उसे चिढ़ाने गया
पर खुद ही मुह की खायी
कौन सा मुहरत था वह यारों
जो ऐसी चुड़ैल ब्याहकर लायी

© शिवा चौधरी
       जलगांव,महाराष्ट्र

शनिवार, 23 जनवरी 2016

हास्य कविता करा

हास्य कविता करा

बायको म्हणाली मला
माझ्यावर एक हास्य कविता करा …
मी म्हटलं तीला संसार आपला चालू आहे ना बरा.

ती म्हटली कवितेनं
संसार तुटत नसता
तुम्ही नाहीयेत का कवी
का ? नुसत्या थापा मारत असता.

मी म्हटलं कवीला
चॅलेंज नको देऊ
ऐकवतो एक कविता
चल आस्वाद घेऊ

बायको माझी गुणाची
रंग तुझा सावळा
तु माझी चिमणी
मी तुझा कावळा

माझं घर शेणाचं
तुझं घर मेणाचं
बायको माझी शहाणी
ऐकत नाही कुणाचं

फार्मात आल्यावर
मला म्हणते इथंच बैस
मी तुझा गरिब रेडा
तु माझी मारकी म्हैस

बायको लागली हसू
मी म्हटलं का तु हसते
बायको म्हटली मला
खरचं तुमची शकल
रेड्यावाणीच दिसते

कोटि करायला गेलो
तीनं माझीच कोटि केली
म्हणुन आवडते मला
बायको पेक्षा जास्त साली

©शिवा चौधरी
      जामनेर,जळगांव

शुक्रवार, 22 जनवरी 2016

भ्रूण हत्या

भ्रूण हत्या

सोनोग्राफिचा माऊस
फिरु लागला पोटावर
हसू कसं फुलेल सांगा
त्या माऊलीच्या ओठावर……1

कसलं तरी औषध
लावलं गेलं ओटी पोटी
एक नारी दुसऱ्या नारीची
खालि करणार होती ओटी……2

लग्ना नंतर बिचारी
आई होऊ पहात होती
तीच्या पोटची मात्र आज
कळी खुडली जात होती……3

डोळे होते भरलेले
कंठ आला होता दाटून
जणू धमण्यातलं रक्त तीचं
गेलं होतं आटून……4

केविलवाण्या नजरेनं
छताकडे पहात होती
आई होण्या आधीच दुसरी
आई मारली जात होती……5

विज्ञानानं प्रगती केली
अन् शिखरावर पोहचलं
चांगलं राहीलं बाजुला
लोकांनी वाईटच घेतलं……6

शनै: शनै: माऊस तो
जसा फिरू लागला
बाबा म्हणून घेणारा ही
सांगा असा का? वागला……7

मी सांगते तुम्हास धनी
ही मुलगी नसेल आपली
अन्यथा तुम्ही आज
नसती तीला कापली……8

लाज वाटेल माझी तुम्हास
जर माझा एक गेला डोळा
मग तीच लाज कुठे जाते
कापतांना हा पोटचा गोळा……9

सासूबाई बाई अडाणी
सासरेबुवा हतबल झाले
शिकून सवरुन तुम्ही धनी
सांगा का ? वाया गेले……10

पैशा साठी डॉक्टर तो
आज जीव घेणार आहे
मेल्यावर तोच पैसा
सोबत का ? तो नेणार आहे……11

चाकू ,सुरे , कात्री घेऊन
तयार होते लढायला
विश्वातील सर्वश्रेष्ठ रत्नाचे
तुकडे तुकडे पाडायला……12

कुठून तरी आर्त हाक आली
आई मला जगायचंय
तु भोगतेय तेच दुःख
मला ही भोगायचंय……13

गडगडली वीज नभी
अन् बळ तीनं एकवटलं
गर्भातल्या आर्त हाकेनं
काळीज तीचं फाटलं……14

उठली ती ताडकन
अन् बंड तीनं पुकारला
अबलत्वाचा श्रृंगार आज
तडक तीनं झुगारला……15

प्रत्येकीनं असंच
वागायला पाहीजे
वाघिण असते नारी
वाघिणी गत जगायला पाहीजे
वाघिणी गत जगायला पाहीजे……16

©शिवा चौधरी
   जामनेर,जळगांव

चारोळ्या 21/01 च्या

[1/22, 1:36 PM] shivachaudhary468: महेश सर्

चारोळीतला तुमचा
हातखंडा न्यारा आहे
चारोळीच्या जंगलातला
तुम्ही हसता खेळता वारा आहे

💐शिवा
[1/22, 1:36 PM] shivachaudhary468: 😊😊😊
मला चारोळीत ही
मनकि बात करायला आवडतं
मी बोलबच्चन नाही
ज्याला नुसता फिरायला आवडतं

🎯 लगा ना निशाने पर…
[1/22, 1:36 PM] shivachaudhary468: पुजल्या जातात वाहणा ही इथे
ते वाहणांचं ही सौभाग्य असतं
नितळ असलं मन् आपलं
तर त्याचं रूप माणसातच दिसतं
[1/22, 1:36 PM] shivachaudhary468: मी शिकतोय इथं
प्लिज मला शिकू द्या
काव्यविश्वातला ही थोडा
श्वास मला घेऊ द्या
[1/22, 1:36 PM] shivachaudhary468: काय करू तारिफ तुझी
मी तर आहे फारच खुजा
तुझ्या सारखा वीर मी
पाहीला नाही अजून दुजा
[1/22, 1:36 PM] shivachaudhary468: मी आसवांची झालर
घेऊन जाईल परत खरी
पण माझ्या आठवांत सखे
तुझी तब्बेत नसते बरी
[1/22, 1:36 PM] shivachaudhary468: लोक उगाचच म्हणतात
दगडं कठोर असतात
पण दगडालाच इथं
पाझर फ़ुटतांना दिसतात
[1/22, 1:36 PM] shivachaudhary468: किती गोड गोड चारोळ्या
माझा तर गोंधळ उडतोय
कुणा कुणाला देऊ दाद
जीव आतल्या आत घुटमळतोय
[1/22, 1:36 PM] shivachaudhary468: स्वारी नेट गेलं होतं

कवितेचं बेसिक चारोळी
भन्नाट कल्पना देऊन जाते
चारोळीतुनच एखादी
अप्रतिम रचना निर्माण होते
[1/22, 1:36 PM] shivachaudhary468: मला वाटतं पावसाळ्यात
तीज संग उगाचच उलझावे
होताच आसमंती कडकडाट
तीनं येऊन मज बिलगावे
[1/22, 1:36 PM] shivachaudhary468: हवी असते दाद
तर दाद द्यायला शिका
हवा असेल प्रतिसाद
आधी साद द्यायला शिका
[1/22, 1:36 PM] shivachaudhary468: सर्वच सुंदर मनाने
काव्य ही सुंदर अतोनात
किती जरी लिहले तुम्ही
ईच्छा आमच्या वाढतात
[1/22, 1:36 PM] shivachaudhary468: थोडा झालो काना
तर मोबाईल भरुन टाकताय
चारोळ्यांच्या जाळ्यात मला अडकवून टाकताय
[1/22, 1:36 PM] shivachaudhary468: मी ही चलतो मंडळी
मला ही द्या रजा
महेश रांवानी दिलेली
झाली आता पुरी सजा
[1/22, 1:36 PM] shivachaudhary468: मिश्रण

शुभ रात्री बोलके
चला एक काजवा
झोपा आता गुमानं
पहेले दिये अपने विझवा
[1/22, 1:36 PM] shivachaudhary468: खूप झाली रात्र
अडवू नका आता
शुभ रात्र म्हणतो मी
फक्त जाता जाता
[1/22, 1:38 PM] shivachaudhary468: आमचे डोळे नका तपासू
तुम्ही ही प्रेमात पडाल
मित्राची प्रेयसी घेऊन राजे हो
फुर्रकन आकाशी उडाल

शिवा
[1/22, 1:38 PM] shivachaudhary468: खरं बोलताय कि
खोटं खोटं सांगताय
कल्ला करीन बायको
म्हणुन हळूच लपवताय
[1/22, 1:38 PM] shivachaudhary468: आपण जरी वाघ असलो
ती रिंग मास्टर असते
आपण टाकतो गुगली
ती आपल्या पेक्षा फास्टर असते
[1/22, 1:38 PM] shivachaudhary468: असं असेल तर मग
ती बेरिज कधीच नसते
शुन्यान आपला करुन गुणाकार
ती आपलं ही शुन्यच करते
[1/22, 1:38 PM] shivachaudhary468: पाणीपुरी खाऊन
दिवस आठवू नका आंबट-गोड
घरात माहीत पडलं तर
अंगाले चोपडा लागिन अंब्या हळदिची ओली ओली फोड
[1/22, 1:38 PM] shivachaudhary468: प्रेम तुझं माझं सखे
चव्हाट्यावर येऊ दे
प्रत्येक गल्लो गल्ली
आपलीच चर्चा होऊ दे
[1/22, 1:38 PM] shivachaudhary468: घरं जळावं दुसऱ्याचं
भलं माझं व्हावं
अन मला सांगा रावं
हे पाप कसं कुठं फेडावं
[1/22, 1:38 PM] shivachaudhary468: आता मही बायको
मले बोलावून रायली
तीच्याशी बोलल्या बिगर
मही होते काह्यली
[1/22, 1:38 PM] shivachaudhary468: सॉरी जुगलबंदी सोडून
थोडं बाजूला होतो गेलो
आता हे कशाला सांगू
आमच्या हाय कमांडला भेटून आलो
[1/22, 1:38 PM] shivachaudhary468: अगोदर ते वाघ झाले होते
बहुतेक होम मिनिस्टर
घरी नव्हते
नंतर आले प्रेमात………
कारण बायको उभी होती दारात
[1/22, 1:38 PM] shivachaudhary468: 😊🙏🏼💐
चला आता निरोप घेतो
ड्युटीची वेळ झाली
नजर अंदाज करा थोडी
आज गंमत जरा जास्तच झाली

दुचाकीवरचं प्रेम

दुचाकी वरचं प्रेम

किती छान होते ते दिवस  !………
मी रोज सायंकाळी तिला दुचाकी शिकवायला जायचो, शिकवण्याच्या नादात आम्ही दूर निघून जायचो. कधी मोकळ्या मैदानी, तर कधी सरळ रस्त्याने………
बहुदा आमचा मार्ग लांब लांब रस्ताच असायचा. आमच्या त्याचं रस्त्याने एक पाणिपुरीचा ठेला लागत असे, त्यामुळे आमचा पाणिपुरी खायचा मोह आवरला जात नसे. मी तर पाणिपुरी फक्त इतक्या साठी खायचो कि तिच्या सोबत एकाच प्लेट मधुन खायला मिळेल…… समोरा समोर ऊभं राहुन तिला निरंतर न्याहळता येईल. मी पाणिपुरीचा आस्वाद कमी अन् तिच्या सौंदर्याचाच आस्वाद जास्त घ्यायचो. पाणिपुरीवाला  मुद्दाम खोडसाळ पणा करुन थोडी तिखट पाणि पुरी माझ्या पुढ्यात ठेवायचा, नकळत मला भानावर आणायचा. माझ्या प्रतिक्रियॆवर ती खळखळून हसायची … एखाद्या अप्सरे पेक्षा सुंदर भासायची.
              दुचाकी शिकवतांना…… तिच्या हाती स्टेरिंग देऊन, तिच्या थरथरणाऱ्या हातावर माझे हात ठेवायचो. त्या भितीच्या निमित्तानं का होईना, तिला स्पर्श करुन घ्यायचो. तिचा तो मखमली स्पर्श खूप सुखावत असे, आणि त्याचं स्पर्शानुभूतित सारा दिवस निघून जात असे. कधी कधी हळूच माझा उष्ण श्वास तिच्या मानेवर रुळायचा. कदाचित ती ही त्या श्वासात हरवून जात असेल म्हणून आम्ही कोलमडून पडायचो. झाल्यात हि जखमा शरीरावर पण तीनं जिद्द मात्र सोडली नाही. तिच्या थरथरणाऱ्या हातांना सांभाळणारे हात कधी तीच्या कमरे भोवती विळखा टाकू लागले कळलंच नाही. काही दिवसांनी, ती एकटीच सुसाट वेगात रस्त्यावर धावू लागली.माझी केविलवाणी नजर तीला दुरुनच पाहू लागली. तीचा तो दुरावा आता सहन होत नव्हता. का?  शिकवलं हिला लवकर हाच पश्चाताप होत होता.
          माझ्या मनाची घालमेल तीच्या बांबाना बहुतेक कळली होती. आमच्या लग्नाची पत्रिका दुचाकीवरच जुळली होती. आता आमच्या लग्नाला बरेच दिवस झालेत, गोड कडू असे बरेच क्षण हि येऊन गेलेत. पण दुचाकीवरचा तो आनंद पुन्हा कधी भेटलाच नाही ! कारण खोटं खोटं तीला आता शिकवू तरी कसं ………  आणि बसलोच पाठीमागं तर त्या भेदक नजरा खूप खूप छळतात. बोल त्या नजरांचे  भरमसाठ……
काय हे उतारवयात चाळे ! , बघा हे पुन्हा यौवणात शिरतायं ! , कोलमडेल तेव्हा कळेल बाबाला !
अशा कितीतरी गोष्टी, म्हणुन सहसामीच ते टाळतो ……… 
आता पाणिपुरी हि घरीच येते, तीच्या डोळ्यात हरवायला वेळ मिळत नाही. नाजुक हाताला स्पर्श केला जरी तरी ते आता खरबरीत झालेय ! मानेवर रुळणारा तो उष्ण श्वास आता हळू हळू थंड पडू लागलाय.... आता उरलीय तीच दुचाकी आणि टकटकणारी अंधूकशी केविलवाणी नजर.... आता पुन्हा एकदा तिला म्हणावसं वाटतयं, शिकायला नकोस येऊ !  त्याच दुचाकीवरुन आपण दोघे लाँग ड्राईव्हला जाऊ, नसेल तो ठेला पाणिपुरीचा दुसऱ्याच ठेल्यावर पाणिपुरी ही खाऊ.

येशिल !!

©शिवा चौधरी
    जामनेर,जळगांव

गुरुवार, 21 जनवरी 2016

सवाल जबाब (राजे)

सवाल जबाब

पहिला आमुचा मुजरा मंडळी
थोर शिवाजी राजानां……
अन मुसळा एव्हडं कुसळ लोचणी
तरी कळेना लोकांना जी जी रं जी |||
माझे राजे जी रं खरे राजे जी रं

(काय सांगताय शाहिर………)

अगं स्वार्थासाठी खोटंच लिहती
अन  खोटंच दावती जनाला
जरी एखादी लिहतो सत्य
मुकतो आपुल्या प्राणाला गं गं गं
माझी राणि तु गं माझी राणि तु गं |||||

काय सांगताय तुम्ही शाहिर
असं हो कधी झालयं का?
अन् सत्य कधी असत्या म्होरं
सांगा बघू मेलयं का? रं रं रं
माझ्या राजा तु रं माझ्या राजा  तु रं |||||

अगं काय सांगू तुला साजने
खोटं घुसवून इतिहास बाटवला
अन् सत्तेसाठी राजा आपुला
घातपाताने मिटवला गं गं गं
माझी राणि तु गं माझी राणि तु गं |||||

अशा साठी चला हो शाहिर
सवाल-जबाब आपण करु या
अन् गावरान या ठसक्या मधूनी
सत्य जगा म्होरं आणूया रं रं रं
माझ्या राजा तु रं माझ्या राजा  तु रं |||||

(असं होय)
मग ऐक साजने सवाल माझा
कुणी दावले राजे खरे
अन् सांगत होते कोण शिवाजी
का जीवे मारिले पानसरे गं गं गं
माझी राणि तु गं माझी राणि तु गं |||||

(आता गं बया……)
जगा म्होरं येती शिवबा
जेव्हा फुले शोधती समाधी
अन् वाघा म्होरं कशा हो येतील
षंढांच्या त्या अवलादी रं रं रं
माझ्या राजा तु रं माझ्या राजा  तु रं |||||

(आता माझा सवाल ऐका शाहिर…)
गुरु तयाचा असे निराळा
का ? सांगत सुटती दुसराचं
अन् जागा होता समाज थोडा
का ? इंगीत करती तिसराचं रं रं रं
माझ्या राजा तु रं माझ्या राजा  तु रं |||||

अंग चाल तयांची कळु चुकली
त्यासी किती करु दे हायतौबा
एक गुरु आई जिजाऊ
दुसरे गुरु तुकोबा गं गं गं
माझी राणि तु गं माझी राणि तु गं |||||

जागे पणी जे सोंगात झोपलयं
कसं तयांना उठवावे
अन् बुद्धि जयांची दुसऱ्या हाती
सत्य त्यासी कसे पटवावे गं गं गं
माझी राणि तु गं माझी राणि तु गं |||||

शिकलीय आता नवी पिढी
तीच जाणतील खोटं-खरं
अन् वाचुन खरा इतिहास राजांचा
सत्य आणतील जगा म्होरं रं रं रं
माझ्या राजा तु रं माझ्या राजा  तु रं |||||

शौर्य जयांचे अनमोल शाहिरा
मुजरा साऱ्या मावळाला
अन् सरते शेवटी पुन्हा एकदा
वंदन आपुल्या राजांना जी जी रं जी
माझ्या राजा जी रं माझ्या राजा  तु रं |||||

©शिवा चौधरी
    जामनेर,जळगांव

काय असतो कवी

काय असतो कवी ?

काय असतो कवी ?
कवी कवितेचा आत्मा
कवी शब्दांना स्मरतो
स्मरतो जसा परमात्मा

काय असतो कवी ?

स्वतःवर प्रेम ही करतो
कधी स्वतःशीच भांडतो
इतरांच्या वेदना ही
कवी अचूक मांडतो

काय असतो कवी ?

असला जरी निराश
तरी दावी प्रेमाचा बहर
कल्पनॆच्या बाबतीत कधी
भलताच करतो कहर

काय असतो कवी ?

कवी अंधाऱ्या रात्री
शब्दांचं चांदणं सांडतो
कवी भर दिवसा
लोचणी काजवे ही आणतो

काय असतो कवी ?

कवी अचानकच
आसमंती भरारी मारतो
नकळतच कधी
पाताळात ही शिरतो

काय असतो कवी ?

सद्गुणी व्यक्तिंना
कवी घेतो डोक्यावर
भ्रष्टाचाऱ्यांचे घोटाळे
आणतो चव्हाट्यावर

काय असतो कवी ?

कवी कधी कधी तर
खळखळून हसवतो
कधी शब्दांच्या गांभिर्यांनं
आपसुकच रडवतो

काय असतो कवी ?

कवी जन्म मृत्यूचा
करवित असतो आभास
आणि आलीच लहर
तर टाकी शब्दांचे फास

काय असतो कवी ?

कवी कल्पनॆच्या डोही
चिंब चिंब न्हातो
कवी अंतरीच्या जखमा
आसवांनी धुतो

काय असतो कवी ?

किती करणार रे शिवा
कवीचं तू गुणगाण
कवीचे शब्दच असती
खरे कवितेचे प्राण

काय असतो कवी ?

कवीला नको असते
धन द्रव्य अमाप
कवीला हवी असते
फक्त कौतुकाची थाप
फक्त कौतुकाची थाप !

©शिवा चौधरी
    जामनेर,जळगांव

सोमवार, 18 जनवरी 2016

एक हृदय द्रावक कथा

एक हृदय द्रावक कथा

हि कथा सत्य घटनेवर आधारित असून पात्र आणि स्थान काल्पनिक आहेत.

गोष्ट त्या वेळची आहे, ज्या वेळी आमची नियुक्ति अतिमागास देशात होती. तिथली परिस्थिति फारच बिकट, ना कुठलं प्रशासन ना जिवनावश्यक वस्तुंचा मुबलक साठा. त्यामुळे तिथे काही ना काही घटना घडतच असायच्या, अगदी कुणाचा कोंबडा जरी चोरीला गेला तरी पोलिस पाचारण करत असतं आणि सोबतीला आमची तुकडी. कारण स्थानिक पोलिसांना ते लोक कमीच भित असतं, आणि आमच्या हजेरीमुळं ते उपद्रव थोडा कमी करत असत. इतकच नाही तर स्वतःला सुरक्षित ही समजत पण दुर्दैव आम्हाला तिथली भाषाच कळत  नव्हती. भाषेतील दुवा असायचा तो द्विभाषी कर्मचारी, त्याच्या मुळे आम्हाला बरचं काही जाणून घेता यायचं. आमची ड्युटी कधी सकाळी तर कधी दुपारी असायची.
           अशाच एका दुपारी साधारण 3 वाजत आले होते. मी आणि माझे सहकारी पोलिस मुख्यालयात चर्चा करत बसलो होतो. आम्ही नेहमी फावल्या वेळात अशा चर्चा करत असू. हो दररोज विषय मात्र बदलत असे कारण आम्हाला कधी कोणाची कोंबडी वा बकरी शोधायला जावे लागेल सांगता येत नव्हतं. आणि चर्चॆला तिथंच खंड पडायचा मग दुसऱ्या दिवशी दुसराच विषय. त्या दिवशी चर्चॆचा विषय होता "आई" जो तो आपल्या आई विषयी किंवा त्यांच्या पाहण्यात आलेल्या मातृ प्रेमाचे दाखले देत चर्चा रंगवत होता. "आई" म्हणतात या शब्दात सारं विश्व सामावलं असतं. तिचे उपकार कधी ही फेडले जाऊ शकत नाही. तिच्या प्रेमावर शंका घेतली जाऊ शकत नाही वगैरे वगैरे…………
          दररोज प्रमाणं आज ही बोलावणं आलंच पण आज कुणाची कोंबडी शोधायची नव्हती तर, चक्क हत्येची केस होती. तो देश थोडा उपद्रवी म्हणून आम्ही चिलखत, जिरे टोप, शस्त्रास्त्र घेऊन सज्ज असायचो. हो फरक इतकाच हा सारा साजोसामान आधुनिक होता. म्हणजे बुलेटप्रूफ जकेट, हेल्मेट, बंदूक वगैरे... आणि हत्तेची केस म्हटलं तर हत्यारा ही जरा दमदारच असेल म्हणुन आम्ही तयारी निशी आपापल्या गाड्यात जाऊन बसलो. आमच्या तिन गाड्या आणि स्थानिक पोलिसांची एक गाडी, अशा चार गाड्या घटना स्थळाकडे निघाल्या. त्या दिवशी आमचा द्विभाषीक आमच्या सोबतीला नव्हता. तर तो जागे अभावी दुसऱ्या गाडीत बसला होता. गाड्या सुसाट वेगानं निघाल्या होत्या, रस्ता कच्चा असल्यानं धुळीच्या लोटात एकाबाजूचं काही दिसत नव्हतं तर दुसऱ्या बाजूनं काही मोडकी तोडकी घरं आणि झाडं सुसाट पळतांना भासत होती. कुणी बरं केली असावी हत्या ? आणि का? या आधीही अशा घटना घडल्या होत्या, तशीच लिंक डोक्यात लावून मी तर्काच्या घोड्यांचा लगाम सैल सोडला होता. अचानक लगाम लागावा आणि घोडा थांबावा तसा गाडीचा करकचून ब्रेक लागला. आमची डोकी समोरच्या सिटवर आदळता आदळता राहीली, आणि मी भानावर आलो. अरेच्चा आपण आज घोड्यावर  नव्हे तर विंचवावर स्वार आहोत. म्हणजे स्कॉर्पिओ गाडीत हं !
          आम्ही गाडीतून भराभर खालि उतरलो, सोबत रोजच्या मानसां ऐवजी एक व्यक्ति नवा दिसत होता. त्याचं नाव कार्ल् बहूदा तो गृहस्थ हत्येची सुचना देनारा होता. आमची काही माणसं गाड्यां जवळ सोडुन त्याच्या मागोमाग निघालो. कारण पुढे अगदी अरुंद रस्ता असल्यानं गाडी जाणे अशक्य होतं. आम्ही सुरक्षित अंतर ठेऊन, आजुबाजूला चौकस नजर ठेऊन मार्ग क्रमण करत होतो. काही पत्री घरं काही छपराची सर्वाच्या भिंती जवळ लाकडी फळ्यांच्या प्रत्येक घरा समोर दोन चार शेंबडी मुलं अगदी नग्न अवस्थेत तर एखाद दुसरी स्त्री अर्ध नग्न अवस्थेत उभी असलेली जग लाजेनं फक्त कमरेखालचा भाग झाकलेला तोही एकाख्या मळकट पण फॅशनेबल कपड्यानं कदाचित शेजारच्या श्रीमंत देशाच्या नागरिकांची उतरण असावी, असावी काय होतीच. कारण तसे बाजार आमच्या पाहण्यात आले होते. त्या स्त्रीयांच वय फारसं नसायचं पण भासायच्या मात्र वयस्कर. कारण तिथल्या स्त्रीया जरा स्थूल असायच्या. पोटात काही नसलं तरी साधारणा तीन चार महिण्याची गरोदर  तर नाही ना ? अशी शंका यायची. कडेवर एखाद मुलं लटकलेलं आणि तेही स्तनपान करण्यात व्यग्र, पण आम्हाला पाहुन ते पण कुतूहलाने आम्हाला पाहू लागलं होतं. बहुदा त्यांनी क्वचितच पोलिस बघितले असावेत आणि तेही विदेशी मानसं चेहरा मोहरा सगळं वेगळं. आम्ही तिन नाले आणि चार टेकड्या पार करुन एका मोकळ्या मैदानात आलो. तिथे जवळच एक छोटासा तलाव तुंबला होता. त्यात की पुरुष मंडळी आणि स्त्रीया अंघोळ करत होते. त्याचं वर्णन मी इथे मुद्दाम टाळतो कारण ते आपल्या सभ्यतेला साजेसं नाही. साधारण विस मिनिट चालल्या नंतर आम्ही एका घरा समोर येऊन उभे राहीलो. गर्दीच्या नावावर तिथं कुणीही नव्हतं. आम्ही अधिकाऱ्यांच्या निर्देशावर चहु बाजूनं ते घर घेरलं. एव्हाना हत्या कुणी ? कुणाची?  का केली ? आम्हाला काही माहीत नव्हतं. कार्ल्, दोन पोलिस वाले एक द्विभाषी आणि आमची तिनं जनं असे एकून सात जन आम्ही आत शिरलो. शिरतांना विशेष काळजी घेत आत शिरलो. हत्यारा तिथं असणं संभव नव्हतं पण खबरदारी घेणं गरजेचं होतं. तो आमचा पोलिसी खाकाच असतो. घर आजूबाजूच्या घरापेक्षा जरा बरं होतं, कदाचित त्या भागातली छोटीमोठी असामी असावी. आम्ही घराच्या मागच्या बाजूला पोहचलो. तिथं एक विशीतली स्त्री उभी होती, चेहऱ्यावर कसला ही भाव नाही काही नाही. जवळच एक पाण्याची टाकी, आणि एक पिवळ्या रंगाची बादली होती बादली शेजारी पाण्याच्या टाकीचं झाकण पडलं होतं. त्याच झाकणावर निपचीत पडलं होतं एक निरागस बाळ त्याच्या अंगावर एखादा कपडा सुद्धा नव्हता.ते बाळ काही तासापुर्वी जन्मलेलं असावं. काही तासापुर्वी म्हणण्याचं कारण हेच कि बाळाची नाळ सुद्धा कापली गेली नव्हती. नाळे सोबत बाळंत पणा नंतर स्त्री करवी त्यागल्या जाणाऱ्या इतर  आतड्या ही तशाच।जुडल्या होत्या. तिथे हत्या कुणा मोठ्या माणसाची नव्हे तर त्या चिमुकल्या जीवाची झाली होती. आमच्या ऐवजी सामान्य व्यक्तिने जर हा प्रसंग पाहीला असता, तर निश्चित भोवळ आली असती. कार्ल ने स्थानिक भाषेत सारं वृत्त पोलिसांना सांगितलं. आणि ते आपली कागद कार्यवाही करु लागले. मी संधी साधून द्विभाष्याला पकडलं आणि सारी घटना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा समोर आली ती हृदय दावक घटना अशी…………
             लिंडा तीन वर्षापुर्वी तीचं लग्न जैन नावाच्या व्यक्तिशी झालं होतं. जैन नशेचा आदि असल्यानं दररोज काही तरी वादविवाद होत असत. प्रेम म्हणून त्या दाम्पत्यात नव्हतचं, होती ती वासनापुर्ती त्याच वासनापुर्तीचा परिणाम जैन कडुन तिला एक कन्यारत्न झालं होतं. लिंडाला वाटत होतं जैन आता तरी सुधारेल पण सारं निरर्थक उलट तो दिवसेदिवस जास्त नशा करायला लागला. परिणामी त्यांचा घटस्पोट झाला. लिंडाची मुलगी जैन कडेच राहीली. लिंडा आता एकाकी पडली होती ऐन् तारुण्यात ती एकटी झाली होती. आई वडीलांना स्वतःचे खायचे वांदे ते तिचा काय सांभाळ करणार, पण कार्ल दाम्पत्याने तिला सहारा दिला. थोड्या पगारावर तिला कामावर ठेवले, लिंडाची पोटाची आग विझत होती पण तारुण्याचं काय? अशातच कार्ल दाम्पत्याच्या व घरच्यांच्या नजरा चुकवून लिंडाचे गावातील एका पुरुषाशी सुत जुळले. स्त्रीला हवा असतो भावनिक आधार... तोच आधार शोधता शोधता आधार केव्हा व्यभिचार झाला कळलंच नाही. लिंडाच्या पोटात बाळ वाढत होतं पण अगोदर सांगितल्या प्रमाणं, स्थूलपणा मुळे ते कुणालाच जाणवलंच नाही. आणि समजलं ते आज, जेव्हा लिंडाला प्रसव पिडा होऊ लागल्या. तेव्हा ती कार्ल दाम्पत्याच्याच घरातील बाथरुम मध्ये गेली. कदाचित ही जागा तिला सोईची वाटली असावी. तास झाला तरी लिंडा बाहेर येत नाही म्हणुन कार्ल ने पत्निला शहानिशा करायला पाठवलं. हो आलेच म्हणुन लिंडाने आतूनच आवाज दिला. कार्लच्या पत्नी परत कामात व्यस्त झाल्या. थोड्याच वेळात लिंडा बाहेर आली आणि घरातील कामं आवरु लागली पण शरीरातुन होणारा रक्त स्त्राव ती आवरु शकली नाही. फरशीवर रक्ताचे डाग दिसल्यानं मिसेस कार्ल ने पतीला सुचना दिली व स्वत: तीच्या सोबत बाथरुम मध्ये जाऊन पाहीलं आणि त्यामुळे तीचं भिंग फुटलं व  हे चित्तथरारक हत्येचं प्रकरण समोर आलं. लिंडाने काही मिनिटापुर्वी एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. बाळ तिच्या पेक्षा किती तरि पटीनं सुंदर  होतं आणि हे स्वतःच्या डोळ्याने पाहिलं होतं आणि त्या निष्ठूर मातेनं जन्मताच बाळची पाण्यात बुडवून हत्या ही केली होती. आणि वेळ मिळताच तिचा त्या बाळाला जंगली श्वापदाच्या हवाली करण्याचा ही मानस होता. पण कार्ल दाम्पत्यांच्या माध्यमातून हे प्रकरण समोर आलं. तिनं आपलं पापच लपवण्याचा प्रयत्नच केला नव्हता तर  " आई " या शब्दला काळिमा फासला होता. थोड्या वेळापुर्वी आम्ही आईच्या माहात्या विषयी चर्चा करत होतो तर आता हे चित्र पाहुन मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते.
लिंडानं नेमकं काय केलं ? योग्य केलं कि अयोग्य ? निरागस बाळाकडे बघून वाटलं अशी पापिणी आई होऊच शकत नाही. ती जर आई असती तर तीनं असं करणं शक्यच नव्हतं. कदाचित नऊ महिने तीनं पोटात बाळ  वाढवलं नसून पाप वाढवतोय असंच समजलं असेल का ? तीनं शरिराची भूक भागवली हे योग्य होतं कि तीनं हा व्यभिचार केला होता? आणि काहीही केलं असलं तर हत्या का केली ? आणि हत्याच करायची होती तर वाढवलंच का? वगैरे वगैरे पुन्हा माझे विचारांचे घोडे भरधाव धावू लागले. आम्ही सगळी कार्यवाही आपोपून तिला अगोदर इस्पितळात पोहचवलं नंतर कोर्टात……… पुढे काय झालं याची माहिति काढायला वेळच मिळाला नाही. बरेच प्रश्न अनुत्तरितच राहीले.

© शिवा चौधरी
    जामनेर,जळगांव