काय असतो कवी ?
काय असतो कवी ?
कवी कवितेचा आत्मा
कवी शब्दांना स्मरतो
स्मरतो जसा परमात्मा
काय असतो कवी ?
स्वतःवर प्रेम ही करतो
कधी स्वतःशीच भांडतो
इतरांच्या वेदना ही
कवी अचूक मांडतो
काय असतो कवी ?
असला जरी निराश
तरी दावी प्रेमाचा बहर
कल्पनॆच्या बाबतीत कधी
भलताच करतो कहर
काय असतो कवी ?
कवी अंधाऱ्या रात्री
शब्दांचं चांदणं सांडतो
कवी भर दिवसा
लोचणी काजवे ही आणतो
काय असतो कवी ?
कवी अचानकच
आसमंती भरारी मारतो
नकळतच कधी
पाताळात ही शिरतो
काय असतो कवी ?
सद्गुणी व्यक्तिंना
कवी घेतो डोक्यावर
भ्रष्टाचाऱ्यांचे घोटाळे
आणतो चव्हाट्यावर
काय असतो कवी ?
कवी कधी कधी तर
खळखळून हसवतो
कधी शब्दांच्या गांभिर्यांनं
आपसुकच रडवतो
काय असतो कवी ?
कवी जन्म मृत्यूचा
करवित असतो आभास
आणि आलीच लहर
तर टाकी शब्दांचे फास
काय असतो कवी ?
कवी कल्पनॆच्या डोही
चिंब चिंब न्हातो
कवी अंतरीच्या जखमा
आसवांनी धुतो
काय असतो कवी ?
किती करणार रे शिवा
कवीचं तू गुणगाण
कवीचे शब्दच असती
खरे कवितेचे प्राण
काय असतो कवी ?
कवीला नको असते
धन द्रव्य अमाप
कवीला हवी असते
फक्त कौतुकाची थाप
फक्त कौतुकाची थाप !
©शिवा चौधरी
जामनेर,जळगांव
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें