शनिवार, 23 जनवरी 2016

हास्य कविता करा

हास्य कविता करा

बायको म्हणाली मला
माझ्यावर एक हास्य कविता करा …
मी म्हटलं तीला संसार आपला चालू आहे ना बरा.

ती म्हटली कवितेनं
संसार तुटत नसता
तुम्ही नाहीयेत का कवी
का ? नुसत्या थापा मारत असता.

मी म्हटलं कवीला
चॅलेंज नको देऊ
ऐकवतो एक कविता
चल आस्वाद घेऊ

बायको माझी गुणाची
रंग तुझा सावळा
तु माझी चिमणी
मी तुझा कावळा

माझं घर शेणाचं
तुझं घर मेणाचं
बायको माझी शहाणी
ऐकत नाही कुणाचं

फार्मात आल्यावर
मला म्हणते इथंच बैस
मी तुझा गरिब रेडा
तु माझी मारकी म्हैस

बायको लागली हसू
मी म्हटलं का तु हसते
बायको म्हटली मला
खरचं तुमची शकल
रेड्यावाणीच दिसते

कोटि करायला गेलो
तीनं माझीच कोटि केली
म्हणुन आवडते मला
बायको पेक्षा जास्त साली

©शिवा चौधरी
      जामनेर,जळगांव

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें