शनिवार, 5 नवंबर 2016

आस

*आस*

हरवलेल्या पाखरा भेट एकदा घेऊन जा
आठवातला चेहरा पुन्हा एकदा दावून जा

हृदयात दाटलिया  हूरहूर तव भेटीची
येऊनीया दिस चार  मजपाशी राहून जा

पोरक्या झाल्या बघ तुजविण सरी श्रावणाच्या
चिंब चिंब सरी खाली एकदा तरी न्हाऊन जा

काळवंडू लागलिया बघ चिंच तुझ्या वाट्याची
गाभूळलेला वाटा तुझा आता तरी खाऊन जा

धडधडतेय काळीज  तव मधुर स्पर्शासाठी
काळजावर हात तुझा एकदा तू ठेऊन जा

अडकले प्राण बहूदा काया तुला दावण्याला
शिनली काया माझी अखेरस तरी पाहून जा

🏽 *शिवा चौधरी*
*जामनेर,जळगांव*

घमंड

घमंड

हर कोई यहाँ खोटे सिक्के चलाने लगे है |
बंजर जमीं मे भी कमल खिलने लगे है |

कल तक घुम रहे थे नंगे ही रस्तों पर
आज कपडे पहनने का सलिका सिखाने लगे है

परसो देखा था उन्हे नाक रगडते कलाई से
आज बाबु बनते ही रुमाल पकडाने लगे है

चुपके से अंधेरे में दस्तक देते है कोठो के व्दार
दिन में सभाओं में सत्संग सुनाने लगे है

नजरों से ही लूट लेते थे हुस्न किसी गोरी का
आज लगातार घुरने का कलम पढाने लगे है

काला धन खाकर फुला ली है तोंद मुस्तंडो सी
कही हाजमोला तो कही युनो ढूंढने लगे है

मत भूल घमंड मे ये यारा ये तेरी ही जागीर नही
तुझसे भी बडे धुरंदर यहाँ पनपने लगे है

शिवा चौधरी
जामनेर,जळगांव

सशक्तीकरण

*सशक्तीकरण*

अजून किती दिवस बनवणार आम्हाला ताटाखालचं मांजर ?
किती दिवस घोळावा गोंडा,
चूल आणि मुला भोवती……

कशा सहन कराव्यात बलात्कारी नजरा,
आणि गर्दितून जातांनाचा मुद्दाम केलेला घाणेरडा स्पर्श....

कशी वळते निर्लज्ज जीभ "मस्त माल" म्हणायला,
कशी लवते पापणी निसर्गानं दिलेल्या देणगीकडे पाहून…

कुठं गहाण असते बुद्धि, मैत्रिणींवर अभद्र शेरे मारतांना,
आणि कसा बदलतो पवित्रा तिच्या भडकण्यावर……
कसं स्विकारु शकता तेव्हा पळपुटे पणाचं धोरण.

का जाळतात त्या मेणाच्या कांड्या माझं शील भंगल्यावर,
का सुचतात नंतर उपाय योजना निर्भयाला संरक्षण देण्याच्या……

त्या आधि कुठं असतं तुमचं प्रकांड पांडित्य……
की नुसताच असतो ? प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा प्रयत्न.

काही काही कळत नाही !

कंटाळा आलाय का ? या जीवनाचा……
असं वाटतं कधी भयाण शांततेच्या वेळी,

पण नाही !

ठेवा तुमच्या मेणबत्त्या पाकीट बंद करून,
लपवून ठेवा तुमच्या पदव्या, अधिकार आणि ते अदु पांडित्य………

जाळून टाका ते कायदे, किंवा विकून टाका रद्दिच्या भावात ते सारं साहित्य, जे सशक्तीकरणा साठी सतत लिहलं जातयं ……

मी स्वतःच मशाल बनून उजळवणार आहे माझी काळरात्र,
मीच रक्षणार माझं शील माझ्याच मनगटाच्या जोरावर………

दाखवून देईन साऱ्यांना ………
ही मनगटं बांगड्या प्रमाणे शत्र ही लिलया पेलू शकतात.
माझ्या डोक्यात शिरलीय आता सावित्री,
अंगात संचारलीय जिजाऊ,अहिल्या……

आता लपकवून बघ पापणी……
दुसऱ्या क्षणी पापणी खाली डोळा नसेल, किंवा शिरच नसेल धडावर…

करुन बघ मुद्दाम स्पर्श गर्दित यौनांगांना,
कदाचित तेव्हाच पुरुषत्व लोप पावण्याची जाणिव होईल तुला.…
कारण तो प्रहारच तसा असेल.

बंद करा तुमचे प्रसिद्धीचे भंडारे,

जे मिठ मिरच्या लावून वाढवतात चव  प्रसार माध्यमांच्या बातम्यांची ,
ज्यांनी उघडलेत असंख्य दुकानं शब्दांच्या हेराफेरीचे……

बदनाम करुन ठेवलीय मोजक्याच नालायकांनी,
संबंध पुरुष जात कारण नसतांना……

अरे एकदा तरी भोगून पहा,
किती त्रास होतो वाळूला, नाहक लाहीसंग भाजतांना.

*शिवा चौधरी*
*जामनेर,जळगांव*

हायकू प्रेम

स्पर्धॆसाठी………

*प्रेम*

प्रेम बावरे
सखे तुलाच साजे
तुझे नी माझे

प्रेमाची गाथा
दोघे लिहीत राहू
जगास दावू

कोमल भाषा
आणते उदयाला
शोभे तयाला

प्रेमात तुझ्या
जग विसरलो मी
बावरलो मी

तुझ्या प्रेमाचा
साज गोड हाकेला
सदा भुकेला

🏽 *शिवा चौधरी*
*जामनेर,जळगांव*

पहिला प्रयत्न समजून घ्याल ना ? प्लिज☺🙏🏽

मंगलवार, 1 नवंबर 2016

घमंड

घमंड

हर कोई यहाँ खोटे सिक्के चलाने लगे है |
बंजर जमीं मे भी कमल खिलने लगे है |

कल तक घुम रहे थे नंगे ही रस्तों पर
आज कपडे पहनने का सलिका सिखाने लगे है

परसो देखा था उन्हे नाक रगडते कलाई से
आज बाबु बनते ही रुमाल पकडाने लगे है

चुपके से अंधेरे में दस्तक देते है कोठो के व्दार
दिन में सभाओं में सत्संग सुनाने लगे है

नजरों से ही लूट लेते थे हुस्न किसी गोरी का
आज लगातार घुरने का कलम पढाने लगे है

काला धन खाकर फुला ली है तोंद मुस्तंडो सी
कही हाजमोला तो कही युनो ढूंढने लगे है

मत भूल घमंड मे ये यारा ये तेरी ही जागीर नही
तुझसे भी बडे धुरंदर यहाँ पनपने लगे है

शिवा चौधरी
जामनेर,जळगांव

दिपावली

*स्पर्धॆसाठी………*

*दिपावली*

सासरातुनिया     पोरं
ओवाळते   तुला दिवा
ये गं   ये गं   दिपावली
आसं लागलिया जिवा……

भाऊराया       सिमेवर
दीप     चक्षुचे    करतो
भाऊबिजेच्या रातीला
उरी    हुंदका     उरतो

किती  मेल्यात  बहिणी
पोटी मोहानं  दिव्याच्या
कशी   सोसते  गं  कळा
माय अंतरी  लाव्ह्याच्या

तार  दोंघाना  मायेनं
नको मिठाई नी  मेवा
ये गं   ये गं   दिपावली
आसं लागलिया जिवा……

भाऊ  बहिणी अनाथ
वाटं  तुझी  गं  पाहता
दारी अनाथालयाच्या
उभे   व्याकुळ  राहता

दे गं  प्रकाश  तयांना
उजळण्या तू जीवनं
पाडं हर्षाचा  पाऊस
बनुनिया   तू श्रावणं

एक सांगणे साऱ्यांशी
तया  पाठी उभे राव्हा
ये गं   ये गं   दिपावली
आसं लागलिया जिवा……

बाप माझा शेतकरी
जळजळतो  शेतीत
हात पाय वाती गत
घामं  भरे   पणतीत

त्याचा घाम तेला वाणी
उजाळतो   गं     संसारं
जळूनिया         पणतीत
करी   काळोखा  पसार

जळजळीत  हे  सत्य
सांगतोय तुला शिवा
ये गं   ये गं   दिपावली
आसं लागलिया जिवा……

*शिवा चौधरी*
*जामनेर,जळगांव*
📞 *9592487310*