शनिवार, 29 अप्रैल 2017

महाराष्ट्र दिन विशेष

महाराष्ट्र दिन विशेष

गडकोट सह्याद्री, तुझी संपदा ही
गडकोट सह्याद्री, तुझी संपदा ही
गे माय मराठी गं, तुला वंदितो मी
तुला वंदितो मी, तुला वंदितो मी
गे माय मराठी गं, तुला वंदितो मी || धृ ||

इथं शिवबाची किर्ती, चराचरात घुमते गं
इथं तुकियाची वाणी, भजनात रंगते गं
भजनात विठूच्या, तल्लीन होतो मी
गे माय मराठी गं, तुला वंदितो मी .......1

कधी बैल पोळ्याला, सजतात गं वेशी
कधी लावणीचा ठेका, गाजतो दूर देशी
पायी पैंजण काश्याची, खुरात बांधतो मी
गे माय मराठी गं, तुला वंदितो मी .......2

बोली गोड वऱ्हाडी, मनास भावते गं
मुखी जायका मिसळ ही, पुणेरी दावते गं
रस्सा कोल्हापूराचा, तांबडा रांधतो मी
गे माय मराठी गं, तुला वंदितो मी .......3

बघा कोकणचा राजा, हापूस वेगळा गं
जळगांव खांन्देशचा, कापूस वेगळा गं
कुशीत सह्याद्रीच्या, खुशीत नांदतो मी
गे माय मराठी गं, तुला वंदितो मी .......4

कवितेत महाराष्ट्र, फिरुनी आलो मी
गितात मातीच्या, बेधूंद बघा झालो
गजलेचा मऱ्हाटी, समां बांधतो मी
गे माय मराठी गं, तुला वंदितो मी .......5

ही लेखणी शिवाची, लौकिक मातीचा
ही शब्दांची सहलं, दावी रंग ख्यातीचा
या रंगात मातीच्या, दंगून रंगतो मी
गे माय मराठी गं, तुला वंदितो मी .......6

गडकोट सह्याद्री, तुझी संपदा ही
गडकोट सह्याद्री, तुझी संपदा ही
गे माय मराठी गं, तुला वंदितो मी
तुला वंदितो मी, तुला वंदितो मी
गे माय मराठी गं, तुला वंदितो मी || धृ ||

बुधवार, 26 अप्रैल 2017

हगणदारी युक्त गावं

*हगणदारी युक्त गाव*

स्वच्छतेच्या राबवून मोहिमा
घरोघरी स्वच्छालये बांधली
कुणी त्यात थाटली दुकानं
कुणी तिथेच भाकर ही रांधली

अनुदानं काढली चेक वटवले
फाईली सरकल्या भराभरा
परसाकडं पोहचे पर्यंत
त्यांच्या पिरकल्या ही जराजरा

पण रम्या सुऱ्या परश्याला
मोकळ्यातच वाटतय भारी
मग गावातली लेकरं जरी
डझनावर पडोत आजारी

कुणालाच कशाचं ही
सोयर सुतक दिसत नाही
गावा साठी झटणारांचे
कौतुक ही वाटत नाही

उलट लोटा घेऊन सकाळी
बायका साऱ्या रोडवर असतात
शौचालयाच्या भिंती गावात
आज ही कागदावर दिसतात

कागदावरच गाव त्यांनी
हगणदारी मुक्त केलाय
पण गाव मात्र अजूनही
*हगणदारी युक्तच* राहिलाय

✍🏽 *शिवा चौधरी*
*जामनेर,जळगांव*

समीक्षण

स्पर्धेसाठी....

*समिक्षा*

एखाद्या पुस्तकाचं समिक्षण करण्या इतपत, मी अजून तरी मोठा झालेलो नाही. पण स्पर्धेच्या निमित्ताने का होईना,ही संधी मला उपलब्ध झाली. हे माझ्यासाठी एखाद्या पुरस्कारा पेक्षा नक्कीच कमी नाही. "आक्रोश लेखणीचा" या कविता संग्रहाची लिंक कवी हकिमांनी मला या स्पर्धेपूर्वीच पाठवली होती. त्यातूनच मी कवी हकिमांना डोळसपणे वाचू शकलो. काव्य संग्रहाचं समिक्षण सुरू करण्या आधी, मी हकिमांबद्दल चार ओळी प्रस्तुत करू इच्छितो......

*व्यंग जरी   पायात   माझ्या*
*पण    शाबूत   आहे    मती*
*शब्दांसंगे लेखणीच माझ्या*
*आयुष्यास     देतेय     गती*

पायाने अदू आणि बुद्धीने शाबूत असलेले कवी अब्दूल हकिम एक जिद्दी व मेहनती व्यक्ती तर आहेतच, पण समाजातील अनिष्ट प्रथांना सडेतोड उत्तर देणारे निडर व्यक्ती ही आहेत. हे त्यांच्या लेखणीतून स्पष्टपणे जाणवतं.
           त्यांचा हा कविता संग्रह, डॉक्टर या कवीतेतून डॉक्टरांना सल्ला देण्यापासून सुरु होतांना आपणाला दिसतो. आणि त्यांची स्व शोकांतिका मांडत, कविता संग्रह पुढे सरकत जातो. स्त्री भ्रूण हत्या ही आज खूपच गंभीर समस्या झाली असून, स्त्री भ्रूण हत्या करणाऱ्या आई बापावर काय लिहावे. हा प्रश्न कविला "काय लिहू?" या कवितेत पडतो. याच कवितेत आईचा पोटाचा मसणवटा झालाय ही समर्पक उपमा देत, कवीने आपल्या लेखणीचा आक्रोश प्रकर्षानं मांडलाय. व्यथा मांडता मांडताच कवी कन्या जन्माचं स्वागत मुलींना पारिजातकाच्या सुंगधी फुंला सारखं संबोधून करतांना आपल्याला कविता संग्रहात दिसतात. कविता संग्रह जसजसा पुढे सरकेल तसतसे हत्या झालेले भ्रूण सुद्धा आपणाला कविच्या कवितेतून कविंशी बोलतांना दिसतील. इतकच नाही तर कविची लेखणी धार्मिकतेला जवळ करून देव देव भजून मुंलिंची हत्या करणारांना जाब विचारतांना सुद्धा दिसते. कन्या जगावी म्हणून सांगणारी लेखणी किर्त अंधारातली म्हणजेच कालची गर्भातली मुलगी पुढे जाऊन कल्पना चावला व सुनिता विल्यम सारखा कसा आसमंत गाठते, हे सिद्ध करून जाते. कविची लेखणी आक्रोश करता करता शब्दांतून लढा तर देतच आहे पण सोबत, सर्व घृणित कृत्यांनी ती व्यथित सुद्धा होतांना आपणास आढळून येईल. कविने कविता संग्रहाच्या शेवटी आपल्यातला नाटककार जागा करत, भ्रूण हत्या मुलिचीच का ? या द्विपात्री नाटकातून आपल्या लेखणीचा परिचय दिलाय. तसेच समाजमनाचा खरा आरसा वाचकांसमोर ठेवलाय. अशाच या बहूगुणी व्यक्तीमत्वाच्या धन्याच्या लेखणीला, सदा बहर येवो हीच सदिच्छा......

रविवार, 23 अप्रैल 2017

कशाला उगाच मिस कॉल मारतोय....

*कशाला उगाच मिस कॉल मारतोय....*

मी रंगले होते
मी दंगले होते
मेरे सपने में कायकु तू आया.......
कशाला उगाच मिस कॉल मारतोय,
रातीला मला भेटाया.....|| धृ ||

तुझ्या रिंगटोन ने सारी सोसायटी जागी केली
बोला टँव टँव टँव, मी लाजून पाणी झाली - 2
त्याला व्हायब्रेट किया
चोली में छिपाया - 2
फिर भी छातीत धडधड होया.... || 1 ||

आरं मोबाईल मला का दिला
त्याच्यामुळेच ह्यो पंगा झाला - 2
कधी चोळीत जाई
कधी दाळीत जाई - 2
त्याचं कवर कपडों में धोया....|| 2 ||

तू रं फेसबुकला लाईक मारतोय
माझ्या सेल्फीला शेयर करतोय - 2
तुझी व्हॉटस् अप ची चाट
माझी लावतेया वाट - 2
तुझा ई-मेल इनबॉक्स में पाया....|| 3 ||

तू रं ये रं ये माझ्या जवळ ये
तुझा मोबाईल तू रं परत घे - 2
माझी बाली उमर
मला साऱ्यायचा डर - 2
नको येऊस पुन्हा खेटाया....|| 4 ||

लावणी मराठी चित्रपटासाठी

*लावणी*

पहाटंच्या पारी न् भराया पाणी
मी तुझीच हापशी हेरलिया......

वाकड्या दांड्याची,
वाकड्या दांड्याची, हापशी मनात भरलिया ||धृ||

कोरस:- (वाकड्या दांड्याची, हापशी मनात भरलिया )

दोन घागरी....., घेऊन काखेत आले
पाणी भर्रायाला, शालू हिरवा लेवून आले
माझ्या घागरी गोल ,
मुखी छोटा गं होल - 2
धार अरधी बाहेर झरलिया.... ||1||

तोरा हापशिचा, बघावा काय
नळ नम्बरीच, दिसत हाय
रंग काळा जरी,
बघा चमचम करी- 2
मुठं आवळून दांड्याची धरलिया.... ||2||

तुमच्या पाण्याला जोरं भारी
आता आलिया  माझी बारी
लावता थोडा जोरं,
सोडी मोठी धारं - 2
दोन झटक्यात घागर भरलिया....||3||

शनिवार, 22 अप्रैल 2017

पत्ता गित रजिस्ट्रेशन

The Film Writers' Association 

201/204, Richa, Plot no B - 29,
Off New Link Road,Opp.City Mall,
Andheri (West) Mumbai - 400 053,

Phone:
+91 22 2673 3027 / 2673 3108
Fax:
+91 22 6692 2899
​Email:
filmwritersassociation@gmail.com

Office Time:- Monday to Saturday 11.00 am to 7.00 pm

Script Registration Day :- Monday to Friday 2.00 pm to 5.30 pm 

Close :- Sunday and Bank Holiday   

http://www.fwa.com

शनिवार, 1 अप्रैल 2017

बाटा है इन्सान को

बाटा है इन्सान को

कहा से आया कैसे आया
ना समझ उस नन्ही सी जान को,
क्यों बाटा किसने बाटा मैं क्या जानू
पर बाटा हैं इन्सान कों.....|| धृ ||

कोई करता मुंडन उसका
कोई खतने की चिड़िया दिखाता हैं ।
कोई मुंडवाये दाढ़ी मुछे
कोई बाल लंबे रखवाता हैं ।
भले बटे हो चंद धर्मों में
ना बाँटो हिंदूस्थान कों,
क्यों बाटा किसने बाटा मैं क्या जानू
पर बाटा हैं इन्सान कों.....1

एक कहे अल्लाह बड़ा हैं
दुजा कहे ईश्वर का बोलबाला हैं ।
अरे एक ही तो हैं अल्लाह ईश्वर
बस चोला उनका निराला हैं ।
लाल हरे चोलो में ना तुम
बाँटो उस भगवान कों,
क्यों बाटा किसने बाटा मैं क्या जानू
पर बाटा हैं इन्सान कों.....2

सियासत का रंग गलियों में
मजहब के झंडो में दिखता हैं ।
इन्सानों के संग संग यारों
ईमान यहाँ पर बिकता हैं ।
चंद रुपयों के ख़ातिर भाई
बेचो ना ईमान कों,
क्यों बाटा किसने बाटा मैं क्या जानू
पर बाटा हैं इन्सान कों.....3

धर्म तो धर्म में छोड़ो
लोग जात-पात में भी बटते हैं ।
सांप्रदायिकता के नाम यहापर
इन्सान मुफ़्त मे कटते हैं ।
यूँ ना गवाओं मुफ़्त मे अपनी
बेशकिमती जान कों,
क्यों बाटा किसने बाटा मैं क्या जानू
पर बाटा हैं इन्सान कों.....