स्पर्धेसाठी....
*समिक्षा*
एखाद्या पुस्तकाचं समिक्षण करण्या इतपत, मी अजून तरी मोठा झालेलो नाही. पण स्पर्धेच्या निमित्ताने का होईना,ही संधी मला उपलब्ध झाली. हे माझ्यासाठी एखाद्या पुरस्कारा पेक्षा नक्कीच कमी नाही. "आक्रोश लेखणीचा" या कविता संग्रहाची लिंक कवी हकिमांनी मला या स्पर्धेपूर्वीच पाठवली होती. त्यातूनच मी कवी हकिमांना डोळसपणे वाचू शकलो. काव्य संग्रहाचं समिक्षण सुरू करण्या आधी, मी हकिमांबद्दल चार ओळी प्रस्तुत करू इच्छितो......
*व्यंग जरी पायात माझ्या*
*पण शाबूत आहे मती*
*शब्दांसंगे लेखणीच माझ्या*
*आयुष्यास देतेय गती*
पायाने अदू आणि बुद्धीने शाबूत असलेले कवी अब्दूल हकिम एक जिद्दी व मेहनती व्यक्ती तर आहेतच, पण समाजातील अनिष्ट प्रथांना सडेतोड उत्तर देणारे निडर व्यक्ती ही आहेत. हे त्यांच्या लेखणीतून स्पष्टपणे जाणवतं.
त्यांचा हा कविता संग्रह, डॉक्टर या कवीतेतून डॉक्टरांना सल्ला देण्यापासून सुरु होतांना आपणाला दिसतो. आणि त्यांची स्व शोकांतिका मांडत, कविता संग्रह पुढे सरकत जातो. स्त्री भ्रूण हत्या ही आज खूपच गंभीर समस्या झाली असून, स्त्री भ्रूण हत्या करणाऱ्या आई बापावर काय लिहावे. हा प्रश्न कविला "काय लिहू?" या कवितेत पडतो. याच कवितेत आईचा पोटाचा मसणवटा झालाय ही समर्पक उपमा देत, कवीने आपल्या लेखणीचा आक्रोश प्रकर्षानं मांडलाय. व्यथा मांडता मांडताच कवी कन्या जन्माचं स्वागत मुलींना पारिजातकाच्या सुंगधी फुंला सारखं संबोधून करतांना आपल्याला कविता संग्रहात दिसतात. कविता संग्रह जसजसा पुढे सरकेल तसतसे हत्या झालेले भ्रूण सुद्धा आपणाला कविच्या कवितेतून कविंशी बोलतांना दिसतील. इतकच नाही तर कविची लेखणी धार्मिकतेला जवळ करून देव देव भजून मुंलिंची हत्या करणारांना जाब विचारतांना सुद्धा दिसते. कन्या जगावी म्हणून सांगणारी लेखणी किर्त अंधारातली म्हणजेच कालची गर्भातली मुलगी पुढे जाऊन कल्पना चावला व सुनिता विल्यम सारखा कसा आसमंत गाठते, हे सिद्ध करून जाते. कविची लेखणी आक्रोश करता करता शब्दांतून लढा तर देतच आहे पण सोबत, सर्व घृणित कृत्यांनी ती व्यथित सुद्धा होतांना आपणास आढळून येईल. कविने कविता संग्रहाच्या शेवटी आपल्यातला नाटककार जागा करत, भ्रूण हत्या मुलिचीच का ? या द्विपात्री नाटकातून आपल्या लेखणीचा परिचय दिलाय. तसेच समाजमनाचा खरा आरसा वाचकांसमोर ठेवलाय. अशाच या बहूगुणी व्यक्तीमत्वाच्या धन्याच्या लेखणीला, सदा बहर येवो हीच सदिच्छा......
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें