महाराष्ट्र दिन विशेष
गडकोट सह्याद्री, तुझी संपदा ही
गडकोट सह्याद्री, तुझी संपदा ही
गे माय मराठी गं, तुला वंदितो मी
तुला वंदितो मी, तुला वंदितो मी
गे माय मराठी गं, तुला वंदितो मी || धृ ||
इथं शिवबाची किर्ती, चराचरात घुमते गं
इथं तुकियाची वाणी, भजनात रंगते गं
भजनात विठूच्या, तल्लीन होतो मी
गे माय मराठी गं, तुला वंदितो मी .......1
कधी बैल पोळ्याला, सजतात गं वेशी
कधी लावणीचा ठेका, गाजतो दूर देशी
पायी पैंजण काश्याची, खुरात बांधतो मी
गे माय मराठी गं, तुला वंदितो मी .......2
बोली गोड वऱ्हाडी, मनास भावते गं
मुखी जायका मिसळ ही, पुणेरी दावते गं
रस्सा कोल्हापूराचा, तांबडा रांधतो मी
गे माय मराठी गं, तुला वंदितो मी .......3
बघा कोकणचा राजा, हापूस वेगळा गं
जळगांव खांन्देशचा, कापूस वेगळा गं
कुशीत सह्याद्रीच्या, खुशीत नांदतो मी
गे माय मराठी गं, तुला वंदितो मी .......4
कवितेत महाराष्ट्र, फिरुनी आलो मी
गितात मातीच्या, बेधूंद बघा झालो
गजलेचा मऱ्हाटी, समां बांधतो मी
गे माय मराठी गं, तुला वंदितो मी .......5
ही लेखणी शिवाची, लौकिक मातीचा
ही शब्दांची सहलं, दावी रंग ख्यातीचा
या रंगात मातीच्या, दंगून रंगतो मी
गे माय मराठी गं, तुला वंदितो मी .......6
गडकोट सह्याद्री, तुझी संपदा ही
गडकोट सह्याद्री, तुझी संपदा ही
गे माय मराठी गं, तुला वंदितो मी
तुला वंदितो मी, तुला वंदितो मी
गे माय मराठी गं, तुला वंदितो मी || धृ ||
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें