*हगणदारी युक्त गाव*
स्वच्छतेच्या राबवून मोहिमा
घरोघरी स्वच्छालये बांधली
कुणी त्यात थाटली दुकानं
कुणी तिथेच भाकर ही रांधली
अनुदानं काढली चेक वटवले
फाईली सरकल्या भराभरा
परसाकडं पोहचे पर्यंत
त्यांच्या पिरकल्या ही जराजरा
पण रम्या सुऱ्या परश्याला
मोकळ्यातच वाटतय भारी
मग गावातली लेकरं जरी
डझनावर पडोत आजारी
कुणालाच कशाचं ही
सोयर सुतक दिसत नाही
गावा साठी झटणारांचे
कौतुक ही वाटत नाही
उलट लोटा घेऊन सकाळी
बायका साऱ्या रोडवर असतात
शौचालयाच्या भिंती गावात
आज ही कागदावर दिसतात
कागदावरच गाव त्यांनी
हगणदारी मुक्त केलाय
पण गाव मात्र अजूनही
*हगणदारी युक्तच* राहिलाय
✍🏽 *शिवा चौधरी*
*जामनेर,जळगांव*
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें