शुक्रवार, 19 अगस्त 2016

यंदा तरी सुखावून जा

यंदा तरी सुखावून जा

येतोय तर येवून जा
चार दिस राहून जा
दाणा उगव मातीत
घास त्याचा खाऊन जा

इवल्या इवल्या पिकांची
बघ लहरणारी कांती
हर्षी बागडणारे बघ
राघू मैना आसमंती

नाचनारी पोरं पहा
फाटक्या अर्ध्या चड्डीवर
थांबलास तर चढलं मास
थोडं ठिसूर हड्डीवर

गोडवे ओवीत गाईल
कारभारीन जात्यावर
मोत्यावाणी चमक तू
माझ्या पिकांच्या पात्यावर

चंद्र, सुर्य, तारे तुझी
उतारतील रे आरती
नाचतील बैल जोड्या 
चाळ बांधून खुरावरती

स्पटिकातून आसमंती
अवतरतो इंद्रधनू
मम कल्पनेच्या चित्रात
तो रंग भरतोय जणू

आलास तर येवून जा
खरचं चार दिस राहून जा
जाता जाता साऱ्यांनाच
यंदा तरी सुखावून जा



शुभ सकाळ







*🌸शुभ सकाळ🌸*

रातराणीचा विरळला गंध

प्राजक्त अवचित पसरवी सुंगध

पक्षी घेती निळ्या आसमंती भरारी

अंगात माझीया भरे नवी तरारी

वेलींच्या मुखी ताजगी मावेना

ढगा आडून ही रवी चमकल्या विन राहीना

श्याम

श्याम

साने गुरुजींच्या कथेतला श्याम
दिसेनासा होत चाललाय
आजच्या धावपळिच्या युगात
संस्कृति विसरत चाललाय

पुर्वी घोळक्यात जमायचे सारे
आता चॅटचा घोळका होतोय
तेव्हा कट्टी नंतर बट्टी व्हायची
आता रिमूव होताच नवा गृप बनतोय

हळूहळू आईचे संस्कार विरताय
विसरली जातेय बाबांची शिकवण
आजोबा सोबत खेळत नाही कुणी
आज्जीच्या गोष्टीची येईना आठवण

ताई भावास धपाटा घालत नाही
भाऊ ही तिची वेणी ओढत नाही
सर्वच खोल्यांची दारे झाली बंद
कुणी कुणासाठी कडी काढत नाही

जागतिकिकरण होतय भाकरीचं
चिऊ-काऊचा घास कसा मिळेल
आणि आईच गेली सायबर कॅफेत
मग आता श्याम तरी कसा मिळेल

घात

घात

माझ्याच माणसात माझा घात झाला
प्रगतिचा माझ्या तयास वात झाला

पिकवली साय मी मेहनतीनं ढिगाने
शिजवून तयाचा नुसता भात झाला

झिजली मजसवे रातंदिस भार्या
तोच माझ्या यशाचा एक हात झाला

चाललो वाटा कित्तेक काट्याकुट्यात
काट्यातल्या वाटेचा आता पाथ झाला

चढवले यशाचे निशान  मी आसमंती
आसमंतात ध्वजाचा झंझावात झाला

श्याम

श्याम

साने गुरुजींच्या कथेतला श्याम
दिसेनासा होत चाललाय
आजच्या धावपळिच्या युगात
संस्कृति विसरत चाललाय

पुर्वी घोळक्यात जमायचे सारे
आता चॅटचा घोळका होतोय
तेव्हा कट्टी नंतर बट्टी व्हायची
आता रिमूव होताच नवा गृप बनतोय

हळूहळू आईचे संस्कार विरताय
विसरली जातेय बाबांची शिकवण
आजोबा सोबत खेळत नाही कुणी
आज्जीच्या गोष्टीची येईना आठवण

ताई भावास धपाटा घालत नाही
भाऊ ही तिची वेणी ओढत नाही
सर्वच खोल्यांची दारे झाली बंद
कुणी कुणासाठी कडी काढत नाही

जागतिकिकरण होतय भाकरीचं
चिऊ-काऊचा घास कसा मिळेल
आणि आईच गेली सायबर कॅफेत
मग आता श्याम तरी कसा मिळेल

शनिवार, 13 अगस्त 2016

नशा

सिगारेट पिऊ नकोस
उद्या ती तुला पियील
आज वाटते चैन थोडी
उद्या जीवघेणी होईल

झिंगू नकोस बाटली संग
ती परिवारा सकट नाचवते
आज जातोय ज्या भट्टीवर
उद्या त्याच भट्टीत जाळवते

गुटखा नकोस खाऊ राज्या
त्याच्यातला 'ट' काढून टाक
त्याच्या नादापायी झालीय बघ
भल्याभल्या धडधाकटांची राख

चरस गांजा हिरोईनची
लत लय लय वाईट हाय
ऐकवत नाही कुठे अजून
तीनं केली असेल हयगाय

आम्ही नुसतं सांगतोय
क्रिया तुम्हीच करायची
म्हणून बाय बाय नशेला
नुसती मजा मारायची

शिवा चौधरी
जामनेर,जळगांव

शुक्रवार, 12 अगस्त 2016

कलेवर

कलेवर……

कीती पहाली वाट तुझी
पाखरू चातक होऊन
निरंतर वाहील्या नद्या
आसूसल्या नयानातून

हयात खर्ची घातली मी
पावसाची    वाट पाहून
शेवटी      कलेवर माझे
गेले आसवात     वाहून

कलेवरास मिळेल का?
सांगा क्षणभर विसावा
मनी एकच ईच्छा आता
विसाव्यावर तू दिसावा

तिरंगा

तिरंगा

लहरतांना आज निळ्या आसमंती
बघा आपला तिरंगा हसू लागलाय

छळ करणारांच्या ही अंतरंगात
इथं आज तिरंगा दिसू लागलाय

भ्रष्टाचारी पांढऱ्या वेशात आल्यानं
सादा-भोळा तिरंगा फसू लागलाय

त्यांची बघून सरेआम फसवेगिरी
हळूच मग  तिरंगा रुसू लागलाय

तिरंग्याखालीच वावरणाऱ्याच्या
काळजात  तिरंगा घुसु लागलाय

अरे माणसा तुझ्या  चुकांच्या  वेदना
बघ नकळत तिरंगा सोसू लागलाय

शिवा चौधरी
जामनेर,जळगांव

रविवार, 7 अगस्त 2016

बहिणाबाई

बहिणाबाई

खानदेशाची ती लेकं
जीचं नावं बहिणाई
सुखं दुःख जीवनाचं
माय जात्यावर गायी

तीचा एक एक शब्द
काना मंधी रस भरे
साऱ्या दिसाचा थकवा
गाणं म्हणताना सरे

नाही गेली ती शाळंत
तरी व्याकरणात गाणी
तीच्या ओवीतले सूरं
जशी कोकिळीची वाणी

मराठीच्या संगतीनं
केली अहिराणी मोठी
तीच्या कविता गोडीनं
येती आपसूकं ओठी

फुलं नाही भेटलंतं
तुला पाकळी वाहिनं
तुझ्या नावाचे गं शिवा
सदा गोडवे गाईनं

शिवा चौधरी
जामनेर,जळगांव(खान्देश)

वेदना


*वेदना*

धुडगूस घातली पाण्यानं
सावित्रीचा खचला पूल
कुठे विझलाय कुलदिपक
कुठं कायमची विझली चूल

जगाशी भांडून तीनं
चिमणीला जन्म दिला
चिमणी गेली पूरासंग
खोपा रिकामा झाला

माय गेली बाप उरला
संसाराची झाली दैना
पुरूषाला मनमोकळं
रडता सुद्धा येईना

रेस्क्यू साठी हेलपाटे
किती खाल्या खस्ता
हाच निधि माणसा तू
आधीच वापरला असता

रूद्रावतारी सावित्रीत
बस गावली, आटला पूर
अजून ही  पेटलेय मनी
अशम्य वेदनांचे काहूर

*शिवा चौधरी*
*जामनेर,जळगांव*

शुक्रवार, 5 अगस्त 2016

बापाचं सपान

सपान

माय मह्यी रखूमाई
बाप विठू गं सावळा
भरल्या डोयात दिसतो
हिरव्या पिकाचा सोहळा

सारी हयात खपली
तरी वल्याच जखमा
बापापाठी फिरे माय
अनवाणी गं रखमा

दानं देईन ही माती
थोडा धिर जरा धरु
म्हणे बाप कारभारने
चल मेहनत करु

गेला अनवाणी विठू
पुंडलिकाच्या भेटीस
केला विटेवर उभा
धरला त्याला बी येठीस

देव असो वा मानव
वाट पहावी लागते
दाणं भरता कणीसातं
चाहूल पाखरां लागते

दाणा दाणा कोरून खायी
पाखरू गं रानामंदी
नाश होऊन बी पिकाचा
खुशी त्येच्या मनामंदी

बाप सादा भोळा मह्या
समजे साऱ्यांचा रूजिकं
त्येचा दिल्लदार पणा
शिवारी डोलवितो पिकं

पिक डोले वाऱ्यावरी
बाप खुशित नाचतो
भरल्या डोयामंदी कसा
हिरवं सपान येचतो

नको ढिग जोंधळ्याचा
बस मिळावी भाकरी
मह्या बापाचं सपान
फुलू दे रे यंदातरी

शिवा चौधरी
जामनेर,जळगांव