शनिवार, 18 फ़रवरी 2017

मावळे

जय जिजाऊ-जय शिवराय

*शिवजयंती स्पेशल*

मावळे, मावळे-मावळे
मर्द मराठे मावळे -2 ||धृ||

नसानसात शिवबा भिनवती
मावळे-मावळे
साऱ्या मुलखात झेंडा मिरवती
मावळे-मावळे
माजं; शत्रूचा$$$$ जिरवती
मावळे, मावळे-मावळे
मर्द मराठे मावळे -2

मोगलाईशी भिडले
मावळे-मावळे
गड-कपारी चढले
मावळे-मावळे
आदिलशाहीशी जोमानं लढले$$$$
मावळे, मावळे-मावळे
मर्द मराठे मावळे -2

सदा निष्ठेनं वागले
मावळे-मावळे
शब्दा-वचनाला जागले
मावळे-मावळे
प्राण प्रसंगी पणाला लावले$$$
मावळे, मावळे-मावळे
मर्द मराठे मावळे -2

अठरा पगड जाती
मावळे-मावळे
प्रीत शिवबा वरती
मावळे-मावळे
लाल रंगात भिजवली धरती$$$$
मावळे, मावळे-मावळे
मर्द मराठे मावळे -2

रंग घामाचा लाल
मावळे-मावळे
पाठिशी ढालं
मावळे-मावळे
रणांगणी चित्याची चाल$$$
मावळे, मावळे-मावळे
मर्द मराठे मावळे -2

✍🏽 *शिवकवी:- शिवा चौधरी*
*जामनेर,जळगांव*
📲 *9592487310*

19फेब्रुवारी2017