रविवार, 23 जुलाई 2017

समाज षंढ झालाय

*समाज षंढ झालाय*

कुठे होतोय बलात्कार
कुठे यौन शोशणाचा बहर आलाय,
खरं सांगू का गड्या !
हा समाज षंढ झालाय.....

यौन शोशकाच्या गुप्तांगावर
घाव घालायला हवा
बलात्काऱ्याला चौकात
उभा चिरायला हवा
एका आईचं घर उजाळतो
दुसऱ्या आईच्या पोटी कसाई जन्माला आलाय,
खरं सांगू का गड्या !
हा समाज षंढ झालाय.....

नाबालिक म्हणून अभयाला
पात्र होतोय साप
हतबल होऊन चिमुरडीचा ढसाढसा रडतोय बाप
जन्म देऊन कन्येला त्यानं काय गुन्हा केलाय,
खरं सांगू का गड्या !
हा समाज षंढ झालाय.....

दुर्बलाची काठी होऊन ठेचूक काढा त्या सापाला
हरलेल्या थकलेल्या न्याय द्या त्या बापाला
हरलेला बाप तिचा मेटाकुटीला आलाय,
खरं सांगू का गड्या !
हा समाज षंढ झालाय.....

*शिवा चौधरी*
*जामनेर,जळगांव.*
17-04-17 02:32 वाजता

आई मी काय म्हणतेय......!

आई तू म्हणतेस......!

तू म्हणतेस रामायणातला
न्याय प्रिय होता राम,
मग चारित्र्यावर संशय सितेच्या
त्याने का घेतला सांग.

तू म्हणतेस ओढणी
सदा छाती भोवती ठेव,
डावावर मांडतांना द्रौपदी
का चुकलेत देव.

तू म्हणतेस लिलावती सारखं
व्रत सत्यनारायणाचं कर,
टायटानिकचं ही जहाज
तसंच येईल का गं वर.

तू म्हणतेस शामची आई
होती खूप महान,
मग शुद्रास मदत करणाऱ्या शामला
ती का घालते स्नान.

तू म्हणालीस अशुभ झालं
आता होईल जग बुडवी,
मग दाभोळकरांना मांजर
का नाही गेली आडवी.

तू म्हणालीस सावित्री फुले
मुलींना शिक्षण देऊन गेली,
मग सत्यवानाची सावित्री
मध्येच कुठून आली.

तू म्हणतेच नैसर्गिक आपत्ती
देवाचीच असते लीला,
मग तो ही या जगाचा
हिटलर नाही का झाला.

तू म्हणतेस मुलगी तू
घराबाहेर नको जाऊ,
मग तूच सांग कल्पनेसारखी
भरारी कशी घेऊ.

आई देव पावावा म्हणून
कुमारीका जेवू घालता इथं,
त्याच देशात गर्भात आई
मुली सुद्धा मारता इथं.

कधी गणपती पाण्यात टाकतेस
कधी उपास-तापास करतेय,
आई सांग ना गं तू
अशी का म्हणून वागतेस.

आई मी काय म्हणतेय
तू सारासार विचार जरा कर,
गुंढाळून ठेव पोथ्या पुराण
अन शिक्षणानं ओटी माझी भर.



वाटं दुःखाची......

वाटं दुःखाची.....

वाटं दुःखाची सरना
आसं सुखाची उरंना
जरी मनात हुंदके
आसू डोयाचा झरंना
वाटं दुःखाची सरना
आसं सुखाची उरंना || धृ ||

पायी तुडवते रोजं
हालं यातनांचे काटे
भोगं सरता ना सरे
माझ्या नशिबाच्या वाटे
दिली नशिबानं हूल
कसं जगू उमजेना
वाटं दुःखाची सरना
आसं सुखाची उरंना - 1

घाव वाटणिला माझ्या
आसू पडले गहान
जिर्ण झालीयं रं झोळी
वाटं दानाची पाहून
कधी देशिल रं दानं
झोळी तग ती धरना
वाटं दुःखाची सरना
आसं सुखाची उरंना - 2

आसू पिऊन मुक्याने
तृष्णा भागवती ओठं
दिसं येतील सुगीचे
आशी तगतयां पोट
मनी सुखाची ती आशा
सुखं जवळी फिरंना
वाटं दुःखाची सरना
आसं सुखाची उरंना - 3

धाव धावतोया जीव
कसा सरल हा भोग
सैर भैर या मनाचा
धावे कस्तूरीचा मृग
घाल-मेलं या जिवाची
चैनं जिवाला पडंना
वाटं दुःखाची सरना
आसं सुखाची उरंना - 4

शिवा चौधरी
जामनेर,जळगांव

ती पुनवेची रात.....!

ती पुनवेची रात....!

काजवे रुसले चंद्र हसला
तारका गाणे गात होती,
काय करावे कौतुक तिचे
जी पुनवेची रात होती.

पाहून तिचे रूप सोहळे
पाकळ्या पाकळ्या गळत होत्या,
तिच्या कोमल कायेवरती
चाफे कळ्या जळत होत्या.

तिच्या मोहक सुगंधात
मोगरा सुद्धा झुरला होता,
रातराणी गत सुगंध तिचा
रोमा रोमात शिरला होता.

क्षणाक्षणाला भोळ्या मनाला
तिच्याअसण्याचा आभास  हा,
ती असावी फक्त माझी
मनात एकच ध्यास हा.

शिवा चौधरी
जामनेर,जळगांव

काठास धडकती लाटा


काठास धडकती लाटा

काठास  धडकती  लाटा
जगण्याची  आस  घेऊनी
फिरुनी  परत  फिरती त्या
मोती   शिंपल्यात  देऊनी

मोत्या परिस  जीवन हे
व्यर्थ घालू नको मानवा
अमृता परी जिव्हा तुझी
व्यर्थ बोलू नको मानवा

शब्दांनी जोर धरतास
धर  सावरुनी  मनाला
भटकूनी मार्ग वेड्या तू
नको दुखवूस रे कुणाला

दुःख जरी किती येऊ दे
कधी डगमगू    नको  तू
दु:खात ही भल्या मानसा
स्वाभिमान विकू नको तू

जातील क्षण निघूनिया
सुखर होतील रे  वाटा
पुन्हा एकदा नव्याने त्या
काठास धडकती लाटा

✍🏽  *शिवा चौधरी*
  *जामनेर,जळगांव*
📲 *8275493221*

शनिवार, 15 जुलाई 2017

सोनं सर पावसाची

*सोन सर पावसाची*
(अष्टाक्षरी)

सोन   सर      पावसाची
सारं   रानं      भिजवीते
काळ्या आईच्या गर्भात
हिरे    मोती     रुजविते

दाना दाना जवारीचा
हिऱ्यागत  लकाकतो
उगवता          भूईवरं
पाचू   गत  चकाकतो

तिफनीच्या मागे  मायं
मोती   सांडते  मातीत
धरे    चाड्यावरं   मुठं
तीळ    पेरते     शेतीत

सोन सर   पावसाची
बीज   रुजवून   जाई
हात कटेवरी   तिच्या
मायं   शोभे   रखूमाई

ताप    वाढता  रवीचा
जेव्हा तरासे  माऊली
तिचा  पाहूनिया त्रागा
ढग    धरिते   सावली

गेल्या वरिसाची आग
यंदा   ईझलं  गं   माय
अंगी हिरवा   गं शालू
आली नेसुनिया सायं

सोन सर   पावसाची
माझं  मनं   रुझविते
पेटलेल्या मनाचा गं
सारा दाह   विझविते

✍🏽 *शिवा चौधरी*
*जामनेर,जळगांव*
8275493221

सोनं सर पावसाची

*सोन सर पावसाची*
(अष्टाक्षरी)

सोन   सर      पावसाची
सारं   रानं      भिजवीते
काळ्या आईच्या गर्भात
हिरे    मोती     रुजविते

दाना दाना जवारीचा
हिऱ्यागत  लकाकतो
उगवता          भूईवरं
पाचू   गत  चकाकतो

तिफनीच्या मागे  मायं
मोती   सांडते  मातीत
धरे    चाड्यावरं   मुठं
तीळ    पेरते     शेतीत

सोन सर   पावसाची
बीज   रुजवून   जाई
हात कटेवरी   तिच्या
मायं   शोभे   रखूमाई

ताप    वाढता  रवीचा
जेव्हा तरासे  माऊली
तिचा  पाहूनिया त्रागा
ढग    धरिते   सावली

गेल्या वरिसाची आग
यंदा   ईझलं  गं   माय
अंगी हिरवा   गं शालू
आली नेसुनिया सायं

सोन सर   पावसाची
माझं  मनं   रुझविते
पेटलेल्या मनाचा गं
सारा दाह   विझविते

✍🏽 *शिवा चौधरी*
*जामनेर,जळगांव*
8275493221

बुधवार, 5 जुलाई 2017

मी स्त्री

मी स्त्री

पेंगलेल्या डोळ्यांना
चोळून उठतेय मी
पापणी आडंची स्वप्न
मोडून उठतेय मी

सबलत्वाचा चिखल
आहे सर्वांगाला माखलेला
अबलत्वाच्या चिखलात
पडून उठतेय मी

पोताऱ्याच्या मातीसारखी
लिपले गेलेय आजवर
त्याच मातीतून विटेसम
घडून उठतेय मी

मनासारखं जेव्हा इथं
काहीच घडत नाही
मनातल्या मनात मग
जळून उठतेय मी

बरबटलेल्या नजरा
दिसतात चोहीकडे
वासनेच्या चटक्यांनी
पोळून उठतेय मी

स्त्री समानतेचे पाठ फक्त
धड्यापुरतेच मर्यादित
सिद्ध करण्या स्वतःला
अजून झटतेय मी