*सोन सर पावसाची*
(अष्टाक्षरी)
सोन सर पावसाची
सारं रानं भिजवीते
काळ्या आईच्या गर्भात
हिरे मोती रुजविते
दाना दाना जवारीचा
हिऱ्यागत लकाकतो
उगवता भूईवरं
पाचू गत चकाकतो
तिफनीच्या मागे मायं
मोती सांडते मातीत
धरे चाड्यावरं मुठं
तीळ पेरते शेतीत
सोन सर पावसाची
बीज रुजवून जाई
हात कटेवरी तिच्या
मायं शोभे रखूमाई
ताप वाढता रवीचा
जेव्हा तरासे माऊली
तिचा पाहूनिया त्रागा
ढग धरिते सावली
गेल्या वरिसाची आग
यंदा ईझलं गं माय
अंगी हिरवा गं शालू
आली नेसुनिया सायं
सोन सर पावसाची
माझं मनं रुझविते
पेटलेल्या मनाचा गं
सारा दाह विझविते
✍🏽 *शिवा चौधरी*
*जामनेर,जळगांव*
8275493221
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें