बुधवार, 6 दिसंबर 2017

बाबासाहेब

बाबासाहेब

काल मला बाबा साहेब
भेटले जाता जाता
स्वर त्यांचा थोडा 
नाराजीचाच होता

म्हटले तुमच्या साठी
किती झटले राजा फुले
तुमच्या भल्या साठी
काय काय नाही रे केले

आणि तुम्ही मात्र नुसत्या
जयंत्या मयंत्या करताय
राजकीय डावपेचात
आपआपसात मरताय

तुम्ही महापुरुषांना
फक्त स्मारकात बघताय
वाचत नाहीत राजा त्यांना
इथंच तुम्ही चुकताय

भगवे हिरवे पिवळे
तुम्ही झेंडे वेगळे केले
निळ्याचे सुद्धा तुम्ही
फाडून दोन केले

महापुरूषांना नुसते
भजणारच आहात का?
ग्रंथ काय घरात नुसते
पुजणारच आहात का?

डिजे चा ताल धरून
नाचायला ही शिक
कपाटातली पुस्तकं
वाचायला ही शिक 

शिकून सवरून राज्य
कराल या देशावर
अविचार केलातर
लटकाल मग फासावर

तुमच्यातच बघतोय
हा बाबा चंद्र तारे
पुरे झालेत आता
नुसते हार तुरे

शाहू फुल्यांच्या वारस्यातून
तुमचं ध्येय दिसेल
तीच मला खरी आज
श्रद्धांजली असेल

कवी शिवा चौधरी
जामनेर,जळगांव
८२७५४९३२२१

आ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनी भावपूर्ण श्रद्धांजली.

💐💐💐💐💐💐💐💐💐

मंगलवार, 5 दिसंबर 2017

आऊ जिजाऊ माऊली

आऊ जिजाऊ माऊली

महाराष्ट्र देशा हिरकणी लाभली
लेक लखुजींच्या घरी जन्मली
अन् तुझ्या जन्माने खरच माते
सिंदखेड नगरी पावन झाली

आऊ जिजाऊ माऊली
आमचे जिजाऊ माऊली
तू गं मायेची सावली
आमचे जिजाऊ माऊली || धृ ||

बालपणीचे खेळ वेगळे
सैर सपाटा हत्ती घोडे
नाही कवड्या नाही बाहूली
तुज खेळण्या गं तलवार भावली || १ ||

जाधवा घरी गं तू वाढली
भोसल्या घरची सून जाहली
घडवून छत्रपती आमुचा
स्वराज्यासी दिलास वाली || २ ||

छाया तुझी आम्हा शिरी राहिली
मुघली जुल्माची सरली काहिली
आज अवघ्या महाराष्ट्राची निष्ठा
तुज चरणी मी वाहिली || ३ ||

आऊ जिजाऊ माऊली
आमचे जिजाऊ माऊली
तू गं मायेची सावली
आमचे जिजाऊ माऊली..........

शिवा चौधरी
जामनेर,जळगांव
८२७५४९३२२१

शनिवार, 2 दिसंबर 2017

सद्बुद्धी दे.....!

सद्बुद्धी दे.....!

सद्बुद्धी दे, दुर्बुद्धी हर
आऊ जिजाऊ समृद्ध कर,
राजांच्या गुणांचा अनुयायी मी
कृपा असू दे तुझी आम्हावर ।।धृ।।

जिकिरीनं घडाविला
राजा आमुचा छत्रपती,
स्वराज्याचा घेऊन ध्यास
पावन केली मराठी माती,
जीव आमुचा ही जडो मातीवर ।।१।।

पर नारीचा आदर माझ्या
आचरणात सदा राहू दे,
दुःसाहसी भामट्यांना
डोळ्यांत क्रोध माझ्या पाहू दे,
श्रद्धा आमुची छत्रपती वर ।।२।।

जात नको पात नको
हृदयी माऊली भेद नको,
मराठी माती नी मराठी नाती
जपतांना काही खेद नको,
संस्कार घडू दे मम मतीवर।।३।।

इमानात अभेद्यता
सह्याद्रीगत सदा राहू दे,
ध्येयातले तेज आमुच्या
रवीगत जगाशी पाहू दे,
मराठी झेंडा नेऊ वरवर ।।४।।

मंगलवार, 28 नवंबर 2017

जुळेल का माझं ही !

जुळेल का माझं ही ?

जुळेल का माझं ही
म्हणून स्थळ बघायला गेलो
अटी बघून मुलीच्या
मेटाकुटीला आलो

पहिला प्रश्न मुलीचा
शिकलात किती सांगा
माझ्या मागं मुलांच्या
लागल्याय म्हणे रांगा

तुमची योग्यता बघूनच
मी तुम्हाला वरणार आहे
हुंडा जर का मागितला तर
इथंच धरून मारणार आहे

चकार शब्द तोंडावाटून
बाहेर माझ्या पडेना
काय उत्तर द्यावे तिला
काहीच मला कळेना

दुसरा प्रश्न तत्काळ
मग तिने मला केला
नोकरी तुमची सरकारी
कि प्रायव्हेट आहे बोला

प्रायव्हेट असेल नोकरी जरी
पर्मनंट असायला हवेत
मैत्रिणींच्या नवऱ्यांमध्ये
तुम्ही उठून दिसायला हवेत

पुढचा प्रश्न तिचा होता
पगार किती मिळतो
कपात कुपात करून सांगा
हातात किती पडतो

पगार माझा ऐकून ती
मला खूश जरा वाटली
पण पुढच्या प्रश्नाची भिती
माझ्या मनात होती  दाटली

शेवटचा प्रश्न तिने मला
केला लयच भारी
माझ्या साठी झोपाळा
म्हणे बांधाल का हो दारी

पुढे म्हणाली अंगणात
चारचाकी असावी राव
सात बाऱ्यावर शेती थोडी
तुमच्या दिसावी राव

नक्षत्रागत पोर माझी
तिला रडवायचं नाही
शाॕपींग साठी कधी
तिला अडवायचं नाही

शाकाहारी पोर माझी
राव तिला बाटवू नका
बांधा वरती पोर नाजूक
चुकून पाठवू नका

ऐकता ऐकताच सारं
तापला होता पारा
संतापाने मी ही मग
बोललो भराभरा

शेती कशाला हवीय
जर शेतात जायला नको
तुझ्या आई-बाबांना सन्मान
माझे घरात रहायला नको

पाऊस नाही पाणी नाही
शेतात काय रूजवणार
सात बाऱ्यावर मग काय
कोरडीच शान गाजवणार

अहो उद्याच घेतो शेती
नोकरी देऊ का सोडून
हुंडा नकोच नको मला
फक्त पोरगी द्या धाडून

कळतो तुमचा अट्टाहास
कारण पोरी झाल्याय कमी
काळीजं बनताय दगडं
अन् माणसं होताय ममी

शेतकऱ्याचा पोरगा मी
मामा हुंडा मुळीच घेणार नाही
कळलीय किंमत मुलीची
गर्भात तिला मारणार नाही .

शुक्रवार, 8 सितंबर 2017

सत्तेचं गाजर

*सत्तेचं गाजर*

सत्तेच्या गाजरवर भाळतात लोकं !
सत्तेसाठी स्वाभिमान ही जाळतात लोकं !

देवालयात जाऊन चोरतात चार फुले ,
तीच फुले केसात तिच्या माळतात लोकं !

स्वतःच्या खादीवर डाग नको टिचभर !
पण ढिगभर गुंड इथं पाळतात लोकं !

लुटली जातेय जनता त्यांच्याच इशाऱ्याने....
पण साळसुदपणाचा आव आणतात लोकं !

समजून घे माणसा माणसातले  गारुडी,
गाजराच्या ही पुंगीवरती डोलवतात लोकं !

जवळ करण्यासाठी बोलवचने कोटी कोटी,
कालांतराने त्यांनाच मग टाळतात लोकं !

उशीर होतो समजण्या डाव नागिनीचा,
दंशा नंतर जनतेला ही मग कळतात लोकं !

✍🏽 *शिवा चौधरी*
_जामनेर,जळगांव_
📲 9592487310

आनंदसागर

कवी सम्मेलन/प्रकाशन सोहळ्याला अनुपस्थितीची खंत ! 😔
पण त्या निमित्ताने कवी शिवा चौधरींची एक सुधाकरी रचना.....

_*आनंदसागर*_

भरविण्या     येथे
साहित्याचा मेळा
अवघा  तो  गोळा
महाराष्ट्र.......

पुणे       मुंबईचा
थाट माट न्यारा
विदर्भाचा   तोरा
आवरेना......

अंलकारा शोभे
पश्चिमी  लहर
काव्याचा बहर
मराठवाडा....

सोहळा   बघूनी
हरवेल      मती
शब्द जणू मोती
खान्देशाचे.....

शब्दाच्या जागरी
आनंद     सागरी
भरितो     गागरी
अमृताच्या.....

शिवा म्हणे कवी
घालती    जागर
आनंद     सागर
काव्यखंड.....

✍🏽 _*शिवा चौधरी*_
_जामनेर,जळगांव_
📲 _9592487310_

मंगलवार, 5 सितंबर 2017

ऑनलाइन

*ऑनलाइन*

ऑनलाईन मॉम
ऑनलाईन पॉप
मोबाइल पे मारो
ऑनलाइन  गप

ऑनलाइन मास्टर
ऑनलाइन   स्कूल
हॉलीबॉल फुटबॉल
देखो हो रहे है गुल

ऑनलाइन    पोक
ऑनलाइन   किक
ऑनलाइन तलाक
देखो दे रहे है सिक(बिमार)

ऑनलाइन प्रपोज
ऑनलाइन     प्रेम
ऑनलाइन    जान
कैसे ले रहा है गेम

ऑनलाइन     यहाँ
गुड मॉर्निंग नमस्ते
ऑनलाइन   मे ही
देखो जम रहे रिस्ते

ऑनलाइन    शादी
ऑनलाइन    बरात
ऑनलाइन    यहाँ
क्या होगी सुहागरात?

ऑनलाइन प्रसाद में
चढाये जाते पकवान
ऑनलाइन बच्चे भी
होंगे क्या रे भगवान !

✍🏽 *शिवा चौधरी*
*जामनेर,जलगांव*
📲9592487310

*ऑनलाइन*

ऑनलाईन आई
ऑनलाईन बाबा
मेंदूचा   घेतलाय
मोबाइलनं  ताबा

ऑनलाइन  गुर्जी
ऑनलाइन    पट
मैदानी खेळ केले
मोबाइलनं चौपट

ऑनलाइन     पोक
ऑनलाइन चिमटा
ऑनलाइन तलाक
देतोय कुणी भामटा

ऑनलाइन प्रपोज
ऑनलाइन     प्रेम
ऑनलाइन    जीव
घेऊ लागलेत गेम

ऑनलाइन  सगळं
भेटू लागतंय   इथं
ऑनलाइनच  मग
जुळू लागतंय नातं

ऑनलाइन     लग्न
ऑनलाइन    वरात
ऑनलाइन      सून
आलीय बघा घरात

जो तो जपतोय बघ
ऑनलाइनचा ठेवा
ऑनलाइन मुलं ही
होतील का रे  देवा ?

✍🏽 *शिवा चौधरी*
*जामनेर,जळगांव*
📲9592487310

मंगलवार, 15 अगस्त 2017

वंदे मातरम्

वंदे मातरम् !

आज़ादी के सही मायने
सारा देश खो बैठा है....
कोई धरम के कोई कौम के
फतवे लेकर ऐठा है ।

अरे सोचो हमने कैसे तुमको
दिलवायी थी आज़ादी ,
और लढ लढ के आपस ने तुम
करने चले हो बरबादी ।

लढ़ रहा था कंधे से कंधा लगाये
वह गोलियों के बौछार में,
छोड़ गया बदनसीब वह
हम यारों को मझधार में ....

ऐसे में भी कोई न यारों
हममें से वहाँ रोया था,
आँखे नम थी शहादतपर
एक बुंद ना आंसू गिराया था ।

क्योंकि.....
दाँव लगी थी इज़्ज़त उसकी
जो भारत माँ कहलाती है,
वही अंत समय में सब धर्मों को
गोद मे पनाह दिलाती है ।

सोयें थे वह और देखा हमनें
उन बेवाओं की सुनी माँग को,
मासूमों की किलकारीयाँ
और बुढों की लडखडाती टांग को....

भूल गये हो भगत सिंह तुम
भूल गये जालियन वाले बाग कों,
और गुमनामी के अंधेरे वाले
भूल गये हो नेताजी सुभाष कों....

दर्द सहते छूट गयें साल सत्तर पिछें
तुम सन सैंतालीस मे लटकें हो,
अंतरिक्ष की सैर करके भी
वंदे मातरम् में ही अटके हो ।

लढ़ना तुम्हारा काम नहीं
तुम विश्वास करो उन विरों पर...
जो तुम्हारी अमन के ख़ातिर
खड़े है लाइन जिरो (0) पर.....

लढ़ मेरे सपूत लेंगे
बस एक बिनती तुमसे करता हूँ,
बंद करो यह आपस की उलझन
क्योंकि हर रोज़ यहाँ मैं मरता हूँ ।

शिवा चौधरी
जामनेर,जलगाँव

सोमवार, 14 अगस्त 2017

सैनिकी वेदना

#सैनिक_एक_वेदना

तुम्ही म्हणताय आई प्रमाणे निस्सिम प्रेम आहे माझं या धरतीवर......

पण मला तर पोकळ देशभक्तीचं अवडंबर वाटतयं,
कारण कुणी ही पहा कामं कमी पण श्रेयच जास्त लाटतयं.

अरे खरं प्रेम होतं आम्हा विरांचं या धरेवरती....
तेव्हा किती पडले होते धारातिर्थी,
आम्ही वाहत नाही बसलो अश्रू त्या शवांवरती.

मरगळ झटकली, आसवं पुसली, त्यांच्याच बंदूकितली काडतूसं घेतली,
डोळ्यात आसवां ऐवजी त्यांच्या रक्ताचा गरमागरम गुब्बार घेऊन पुन्हा लागलो लढायला.....
कारण तेव्हा वेळ नव्हता ना रे आमच्याकडे त्यांच्या शवावर दोन अश्रू ढाळायला.

युद्ध जिंकलं गड्या.....
पण स्वस्थ बसू देईना म्हातारे आई बाप, लहान लेकरं,
अरे इतकंच काय स्वस्थ बसू देईना तिचं पांढरं फट्ट कपाळ,
अन् तिच्या गर्भातलं इवलसं बाळ.

कसं जगावं तिनं ?
आणि कसं जगवावं त्याला?
काटेरी नजरांच्या जंगलात कसे बहरेल ते कोवळं पिंपळपान....
अन वासनांध मेंढरांच्या कळपात कसं जपाव ते कोकरु छान.

भगत सिंह, राजगुरू, सुखदेव, विसर पडला का रे साऱ्यांचा,
चौकीचौरा, जालियन वाल्या बागेतल्या गोळीबारांचा,

आज ही तेच चित्र दिसतय.....
काल इंग्रजी हुकूमत होती
आज आपलेच आपल्याला मारताय...
राजकारणाच्या ढोहात नुसती वंशवादाची नौका तारताय

परिस्थिती बदलेल या आशेवर डोळे मिटले रे आम्ही,
अन् सत्तरवर्षाच्या कारकिर्दीत चक्क आईलाच लुटले तुम्ही !

शिवा चौधरी
जामनेर,जळगांव

रविवार, 23 जुलाई 2017

समाज षंढ झालाय

*समाज षंढ झालाय*

कुठे होतोय बलात्कार
कुठे यौन शोशणाचा बहर आलाय,
खरं सांगू का गड्या !
हा समाज षंढ झालाय.....

यौन शोशकाच्या गुप्तांगावर
घाव घालायला हवा
बलात्काऱ्याला चौकात
उभा चिरायला हवा
एका आईचं घर उजाळतो
दुसऱ्या आईच्या पोटी कसाई जन्माला आलाय,
खरं सांगू का गड्या !
हा समाज षंढ झालाय.....

नाबालिक म्हणून अभयाला
पात्र होतोय साप
हतबल होऊन चिमुरडीचा ढसाढसा रडतोय बाप
जन्म देऊन कन्येला त्यानं काय गुन्हा केलाय,
खरं सांगू का गड्या !
हा समाज षंढ झालाय.....

दुर्बलाची काठी होऊन ठेचूक काढा त्या सापाला
हरलेल्या थकलेल्या न्याय द्या त्या बापाला
हरलेला बाप तिचा मेटाकुटीला आलाय,
खरं सांगू का गड्या !
हा समाज षंढ झालाय.....

*शिवा चौधरी*
*जामनेर,जळगांव.*
17-04-17 02:32 वाजता

आई मी काय म्हणतेय......!

आई तू म्हणतेस......!

तू म्हणतेस रामायणातला
न्याय प्रिय होता राम,
मग चारित्र्यावर संशय सितेच्या
त्याने का घेतला सांग.

तू म्हणतेस ओढणी
सदा छाती भोवती ठेव,
डावावर मांडतांना द्रौपदी
का चुकलेत देव.

तू म्हणतेस लिलावती सारखं
व्रत सत्यनारायणाचं कर,
टायटानिकचं ही जहाज
तसंच येईल का गं वर.

तू म्हणतेस शामची आई
होती खूप महान,
मग शुद्रास मदत करणाऱ्या शामला
ती का घालते स्नान.

तू म्हणालीस अशुभ झालं
आता होईल जग बुडवी,
मग दाभोळकरांना मांजर
का नाही गेली आडवी.

तू म्हणालीस सावित्री फुले
मुलींना शिक्षण देऊन गेली,
मग सत्यवानाची सावित्री
मध्येच कुठून आली.

तू म्हणतेच नैसर्गिक आपत्ती
देवाचीच असते लीला,
मग तो ही या जगाचा
हिटलर नाही का झाला.

तू म्हणतेस मुलगी तू
घराबाहेर नको जाऊ,
मग तूच सांग कल्पनेसारखी
भरारी कशी घेऊ.

आई देव पावावा म्हणून
कुमारीका जेवू घालता इथं,
त्याच देशात गर्भात आई
मुली सुद्धा मारता इथं.

कधी गणपती पाण्यात टाकतेस
कधी उपास-तापास करतेय,
आई सांग ना गं तू
अशी का म्हणून वागतेस.

आई मी काय म्हणतेय
तू सारासार विचार जरा कर,
गुंढाळून ठेव पोथ्या पुराण
अन शिक्षणानं ओटी माझी भर.



वाटं दुःखाची......

वाटं दुःखाची.....

वाटं दुःखाची सरना
आसं सुखाची उरंना
जरी मनात हुंदके
आसू डोयाचा झरंना
वाटं दुःखाची सरना
आसं सुखाची उरंना || धृ ||

पायी तुडवते रोजं
हालं यातनांचे काटे
भोगं सरता ना सरे
माझ्या नशिबाच्या वाटे
दिली नशिबानं हूल
कसं जगू उमजेना
वाटं दुःखाची सरना
आसं सुखाची उरंना - 1

घाव वाटणिला माझ्या
आसू पडले गहान
जिर्ण झालीयं रं झोळी
वाटं दानाची पाहून
कधी देशिल रं दानं
झोळी तग ती धरना
वाटं दुःखाची सरना
आसं सुखाची उरंना - 2

आसू पिऊन मुक्याने
तृष्णा भागवती ओठं
दिसं येतील सुगीचे
आशी तगतयां पोट
मनी सुखाची ती आशा
सुखं जवळी फिरंना
वाटं दुःखाची सरना
आसं सुखाची उरंना - 3

धाव धावतोया जीव
कसा सरल हा भोग
सैर भैर या मनाचा
धावे कस्तूरीचा मृग
घाल-मेलं या जिवाची
चैनं जिवाला पडंना
वाटं दुःखाची सरना
आसं सुखाची उरंना - 4

शिवा चौधरी
जामनेर,जळगांव

ती पुनवेची रात.....!

ती पुनवेची रात....!

काजवे रुसले चंद्र हसला
तारका गाणे गात होती,
काय करावे कौतुक तिचे
जी पुनवेची रात होती.

पाहून तिचे रूप सोहळे
पाकळ्या पाकळ्या गळत होत्या,
तिच्या कोमल कायेवरती
चाफे कळ्या जळत होत्या.

तिच्या मोहक सुगंधात
मोगरा सुद्धा झुरला होता,
रातराणी गत सुगंध तिचा
रोमा रोमात शिरला होता.

क्षणाक्षणाला भोळ्या मनाला
तिच्याअसण्याचा आभास  हा,
ती असावी फक्त माझी
मनात एकच ध्यास हा.

शिवा चौधरी
जामनेर,जळगांव

काठास धडकती लाटा


काठास धडकती लाटा

काठास  धडकती  लाटा
जगण्याची  आस  घेऊनी
फिरुनी  परत  फिरती त्या
मोती   शिंपल्यात  देऊनी

मोत्या परिस  जीवन हे
व्यर्थ घालू नको मानवा
अमृता परी जिव्हा तुझी
व्यर्थ बोलू नको मानवा

शब्दांनी जोर धरतास
धर  सावरुनी  मनाला
भटकूनी मार्ग वेड्या तू
नको दुखवूस रे कुणाला

दुःख जरी किती येऊ दे
कधी डगमगू    नको  तू
दु:खात ही भल्या मानसा
स्वाभिमान विकू नको तू

जातील क्षण निघूनिया
सुखर होतील रे  वाटा
पुन्हा एकदा नव्याने त्या
काठास धडकती लाटा

✍🏽  *शिवा चौधरी*
  *जामनेर,जळगांव*
📲 *8275493221*

शनिवार, 15 जुलाई 2017

सोनं सर पावसाची

*सोन सर पावसाची*
(अष्टाक्षरी)

सोन   सर      पावसाची
सारं   रानं      भिजवीते
काळ्या आईच्या गर्भात
हिरे    मोती     रुजविते

दाना दाना जवारीचा
हिऱ्यागत  लकाकतो
उगवता          भूईवरं
पाचू   गत  चकाकतो

तिफनीच्या मागे  मायं
मोती   सांडते  मातीत
धरे    चाड्यावरं   मुठं
तीळ    पेरते     शेतीत

सोन सर   पावसाची
बीज   रुजवून   जाई
हात कटेवरी   तिच्या
मायं   शोभे   रखूमाई

ताप    वाढता  रवीचा
जेव्हा तरासे  माऊली
तिचा  पाहूनिया त्रागा
ढग    धरिते   सावली

गेल्या वरिसाची आग
यंदा   ईझलं  गं   माय
अंगी हिरवा   गं शालू
आली नेसुनिया सायं

सोन सर   पावसाची
माझं  मनं   रुझविते
पेटलेल्या मनाचा गं
सारा दाह   विझविते

✍🏽 *शिवा चौधरी*
*जामनेर,जळगांव*
8275493221

सोनं सर पावसाची

*सोन सर पावसाची*
(अष्टाक्षरी)

सोन   सर      पावसाची
सारं   रानं      भिजवीते
काळ्या आईच्या गर्भात
हिरे    मोती     रुजविते

दाना दाना जवारीचा
हिऱ्यागत  लकाकतो
उगवता          भूईवरं
पाचू   गत  चकाकतो

तिफनीच्या मागे  मायं
मोती   सांडते  मातीत
धरे    चाड्यावरं   मुठं
तीळ    पेरते     शेतीत

सोन सर   पावसाची
बीज   रुजवून   जाई
हात कटेवरी   तिच्या
मायं   शोभे   रखूमाई

ताप    वाढता  रवीचा
जेव्हा तरासे  माऊली
तिचा  पाहूनिया त्रागा
ढग    धरिते   सावली

गेल्या वरिसाची आग
यंदा   ईझलं  गं   माय
अंगी हिरवा   गं शालू
आली नेसुनिया सायं

सोन सर   पावसाची
माझं  मनं   रुझविते
पेटलेल्या मनाचा गं
सारा दाह   विझविते

✍🏽 *शिवा चौधरी*
*जामनेर,जळगांव*
8275493221

बुधवार, 5 जुलाई 2017

मी स्त्री

मी स्त्री

पेंगलेल्या डोळ्यांना
चोळून उठतेय मी
पापणी आडंची स्वप्न
मोडून उठतेय मी

सबलत्वाचा चिखल
आहे सर्वांगाला माखलेला
अबलत्वाच्या चिखलात
पडून उठतेय मी

पोताऱ्याच्या मातीसारखी
लिपले गेलेय आजवर
त्याच मातीतून विटेसम
घडून उठतेय मी

मनासारखं जेव्हा इथं
काहीच घडत नाही
मनातल्या मनात मग
जळून उठतेय मी

बरबटलेल्या नजरा
दिसतात चोहीकडे
वासनेच्या चटक्यांनी
पोळून उठतेय मी

स्त्री समानतेचे पाठ फक्त
धड्यापुरतेच मर्यादित
सिद्ध करण्या स्वतःला
अजून झटतेय मी

गुरुवार, 1 जून 2017

जगता जगता

सरलीत  कित्तेक  वर्षे
येथे     बघता    बघता
शहाणपणाने वागू जरा
माणसा जगता  जगता

वेदना  देती  खूप  सारे
स्व   स्वार्थ   साधतांना
चला  आनंद  वाटूयात
आनंद  मागता  मागता

आनंदात       हसतांना
दिसतील    खूप     येथे
चला   थोडं     हसूयात
दुःख   भोगता   भोगता

अज्ञानांच्या  हितासाठी
उघडू  कवाडे   ज्ञानाची
चला  थोडं    शिकवूया
येथे   शिकता   शिकता

अपयशाचे     खाच-खडगे
चेंगारुन      जाती    अंगठे
अंगठ्यास बळकटी आली
ठोकरा  लागता     लागता

रविवार, 28 मई 2017

पहिला पाऊस

पहिला पाऊस

मंद मंद हा
खट्याळं वारा
मना मनाच्या
छेडीत तारा
भिजवूनी देह
चिंब करिती
मंद मंद या
पाऊस धारा || धृ ||

पहिला पाऊस
मृगा मृगाचा
शिळ घालतो
मुखी निराळी
अथांग सागर
लहरी मधूनी
नाचत जाई
निसंग होडी
मनी मोहरे
रम्य किनारा......1

चावट भारी
थेंब तयाचा
रेंगाळून ये
उदरा वरती
कोमल देह
तिचा बघूनी
फूल पाखरे
मनात झुरती
खोड काढूनी
देई शहारा.......2

गंध सुगंध
सोडत जाई
पहिल्या सरीत
भिजता माती
उनाड पक्षी
गिरकी घेऊनी
उंच भरारी
नभात घेती
गुज सांगतो
कानी वारा......3

रंग साजरा
इंद्र धनुचा
पाऊस धारा
घेऊन आली
जाई मोगरा
चाफा चमेली
निळ्या नभाच्या
सरित न्हाली
मोर नाचूनी
फुलवी पिसारा.....4

शिवा चौधरी
जामनेर,जळगांव
🍏 8275493221

सोमवार, 15 मई 2017

गोंधळ 4

*गोंधळ*

आई तुझी गं किर्ती
मी ऐकूनी आलो,
तुझ्या किर्तीचा महिमा
गावाया आलो.
नैवद्य घेऊन आलो
पुरणपोळीचा...
आहेरतुला घेऊन आलो
साडी चोळीचा
दारी गोंधळ गोंधळ
गोंधळ आईचा || धृ ||

तुझ्या हातावर शोभे आई हिरवा गं चुडा
तुझ्या गं भाळी चंद्र नांदे होऊनिया टिळा
सुर्याची गं आभा पसरली तुझ्या किर्तीतूनी
चांदणी गं होऊन बसली नासिकेत नथनी
अन् नभात फडफडतोय झेंडा गं देविचा || 1 ||

कवळ्याचीमाळ पायात पैंजण घालूनी मी नाचतो
तुझ्या कृपेची फुलं गं आई परडीत वेचतो
झेंडा घेऊन बोधाचा मी मिरवितो गं तिन्ही लोकी
तुझ्या लेकरा तारुण न्यावे तूच पाठीराखी
भक्ती करुनी उभारीन मी डोंगर राईचा || 2 ||

महिषासूर मर्दिनी तुझं गं रुद्ररूप भारी
त्रिशूल हाती घेऊन केली सिंव्हाची स्वारी
दैत्याचा संहार करुनी भक्त तू तारिला
भक्त तू तारिला गं आई महिषासूर मारिला
हर्षीभंडारा उधळतोय गं तुझ्याच पायीचा || 3 ||

✍🏽 *शिवा चौधरी*
*जामनेर,जळगांव*
📲 9592487310

शुक्रवार, 12 मई 2017

जागरण3

[12/05 8:02 pm] Shiva Chaudhary: जागरण/गोंधळ -1

नम: दुर्गा नम: दामिनी
संहार करण्या आले मी,
नाचून तांडव घालूनी
दृष्टास मारण्या आले मी ||धृ||

भभक भभक देह हा
नासिका फिंगारती
दृष्ट नष्ट करण्या
शस्त्र ही श्रृंगारती || 1 ||

थरथर का? कापतो
दृष्ट दैत्या आता
पुण्ण्याचा राहिला
घडा तुझा रे रिता || 2 ||

मुक्ती मुक्ती मागसी
मुक्ती तुला न लाभने
अंत हा समीप हा
कुकर्म तुझे रे वाढले || 3 ||

नेत्रात क्रोध, शस्त्रात वेध
हा वार कसा तू रोकसी
आलिय वेळ, सरलाय खेळ
प्राणास आता मुकसी || 4 ||

✍🏽 *शिवा चौधरी*
*जामनेर,जळगांव*
📲 9592487310

[12/05 8:13 pm] Shiva Chaudhary: जागरण/गोंधळ -2

वाजता शंखनाद,स्फुरती बाहू हे
माजता दृष्ट हे,केतू अन् राहू हे
हाती शस्त्र घेऊनी उठली उठली
रणरागीणीs s s पेटली s s s || धृ ||

दानवा दानवा, रक्तपात माजला
तव-तव तू कर्माने, आज रे भाजला
जाणता पातके आज मी रुठली रुठली || 1 ||

मी काली; मी दुर्गा; मी रण् चंडिका
भाळी रक्त चंदनं, गलमाला मुंडीका
वधण्या दृष्टीशी क्रोधी मी नटली- नटली || 2 ||

रक्ताभिषेक हवा, त्रिशुली दानवा
तव कंठ भेदूनी तारिते मानवा
प्राणभोग बघता काळरात्र गोठली गोठली || 3 ||

✍🏽 *शिवा चौधरी*
*जामनेर,जळगांव*
📲 9592487310

[12/05 9:48 pm] Shiva Chaudhary:

जागरण/गोंधळ -3

हो दूर्गा हो काली
महिषासूर मर्दिनी
अनाथांची हो वाली
रौद्ररूप धारिणी

सूड घे सूड घे
धडधडत्या ज्वालांनी
सूड घे सूड घे.....|| धृ ||

पिडीतांशी छेडणाऱ्या,दृष्टांचा सूड घे
निरागस लेकरांच्या,वेदनांचा सूड घे
रंजलेल्या भाभड्यांच्या, यातनांचा सूड घे....|| 1 ||

रक्तपात रक्तघात, दैत्य इथं मातला
अविवेकी दानवांचा सुळसुळाट माजला
सुळसुळत्या दानवांच्या बुद्धीचा सूड घे....|| 2 ||

मी अंबा जगदंबा, कंठ आज फोडणार
माजलेल्या दैत्यांशी यमसदनी धाडणार
माजलेल्या दैत्यांच्या कृत्यांचा सूड घे....|| 3 ||

✍🏽 *शिवा चौधरी*
*जामनेर,जळगांव*
📲 9592487310