कवी सम्मेलन/प्रकाशन सोहळ्याला अनुपस्थितीची खंत ! 😔
पण त्या निमित्ताने कवी शिवा चौधरींची एक सुधाकरी रचना.....
_*आनंदसागर*_
भरविण्या येथे
साहित्याचा मेळा
अवघा तो गोळा
महाराष्ट्र.......
पुणे मुंबईचा
थाट माट न्यारा
विदर्भाचा तोरा
आवरेना......
अंलकारा शोभे
पश्चिमी लहर
काव्याचा बहर
मराठवाडा....
सोहळा बघूनी
हरवेल मती
शब्द जणू मोती
खान्देशाचे.....
शब्दाच्या जागरी
आनंद सागरी
भरितो गागरी
अमृताच्या.....
शिवा म्हणे कवी
घालती जागर
आनंद सागर
काव्यखंड.....
✍🏽 _*शिवा चौधरी*_
_जामनेर,जळगांव_
📲 _9592487310_
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें