शुक्रवार, 8 सितंबर 2017

सत्तेचं गाजर

*सत्तेचं गाजर*

सत्तेच्या गाजरवर भाळतात लोकं !
सत्तेसाठी स्वाभिमान ही जाळतात लोकं !

देवालयात जाऊन चोरतात चार फुले ,
तीच फुले केसात तिच्या माळतात लोकं !

स्वतःच्या खादीवर डाग नको टिचभर !
पण ढिगभर गुंड इथं पाळतात लोकं !

लुटली जातेय जनता त्यांच्याच इशाऱ्याने....
पण साळसुदपणाचा आव आणतात लोकं !

समजून घे माणसा माणसातले  गारुडी,
गाजराच्या ही पुंगीवरती डोलवतात लोकं !

जवळ करण्यासाठी बोलवचने कोटी कोटी,
कालांतराने त्यांनाच मग टाळतात लोकं !

उशीर होतो समजण्या डाव नागिनीचा,
दंशा नंतर जनतेला ही मग कळतात लोकं !

✍🏽 *शिवा चौधरी*
_जामनेर,जळगांव_
📲 9592487310

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें