बुधवार, 30 दिसंबर 2015

श्रद्धांजली

जेष्ठ कवी मंगेश पाडगांवर यांना भावपुर्ण श्रद्धांजली……💐💐💐💐

       श्रद्धा सुमने

काव्य विश्वातला एक तारा अंधारात गडप झाला,
जाता जाता जिवाला हूरहूर लावून गेला.

ओतुन दिला काव्यरस सारा या अवनीवर…
स्वतः होऊन अग्नीच्या स्वाधिन चटका आमच्या मनाला लावुन गेला.

वेचली होती अनंत काव्य पुष्प शब्दांच्या बागेतली,
काव्यपुष्पांची  परडी इथंच सोडुन गेला.

दरवडत राहील सुगंध आजिवन त्याफुलांचा,
फक्त सदृष्य रुपातून आज तो अदृष्य झाला.

©शिवा चौधरी
     जामनेर,जळगांव

💐💐💐💐💐💐💐💐💐

सोमवार, 28 दिसंबर 2015

धनी

धनी

या मातीच्या जोरावर
धनी साऱ्यांशी भांडतो
नाही भरवसा तरी
डाव मातीत मांडतो ……!!

उरी हिरवं सपान
धनी रोजं फुलवतो
रानं करुन जीवाचं
धनी लेकरं पोसतो ……!!

रोज जातोय शेतात
नवी घेऊन उभारी
बैलजोडीला विकून
पिक पेरतो शिवारी ……!!

बैलजोडीच्या बदली
जू खांद्यावर घेतली
दाणा पोटचा राखून
मुठं चाड्यात सोडली ……!!

जरी केली त्याची थट्टा
सरकार दरबारी
जरी देती त्यास दगा
पावसाच्या चिंबसरी ……!!

राती हताश होऊन
धनी आढ्याकडे पाही
दिस उगल सोन्याचा
धनी आशेवर राही ……!!

धनी बोलला मजला
जीव देऊ कसा सांग
मह्या मरणानं राणी
नाही फिटणार पांग ……!!

या दुनियेशी साजने
मी  हिंमतीनं लढीनं
काळ्या आईस हिरवा
सखे शालू नेसविन ……!!

काळ्या मातीत आमचं
सारं सपान जळलं
तरी धन्यानं माझिया
नाही जगणं सोडलं ……!!

©शिवा चौधरी
    जामनेर,जळगांव

शुक्रवार, 25 दिसंबर 2015

बाप

बाप

सुखलेल्या रानामंधी
बाप अनवाणी चाले
त्यच्या जगण्याची व्यथा
कुरूप पायातलं बोले …!!!

त्यच्या जिव्हारी चटका
वर पाण्याचा फटका
कसा करलं रे बाप
मह्या संसार नेटका …!!!

भेगाळली भूमि सारि
आटल्यात पाटचाऱ्या
किती केल्या पांडूरंगा
तुया दारि त्यानं वाऱ्या …!!!

रोज राहतीस त्यास
मिठ भाकरीचे वांधे
नाही दायदाणा घरी
माय अंबाडीच रांधे …!!!

घरी लगनाची पोरं
सळसळते डोळ्यात
रोज डूबती बुब्बूळं
आसवांच्या रे तळ्यात …!!!

सडे घामाचे शिंपून
फुलवलं होतं रानं
एका झटक्यात सारं
ईस्काटलं का? सपान …!!!

आसवांच्या तळ्यामंधी
बाप रोजरोज न्हातो
त्यच्या मरणाचं गाणं
मुक्या आवाजात गातो …!!!

आम्ही बळीची रे प्रजा
नाही जहर पिणारं
सावकारी भयापायी
नाही फास ही घेणारं …!!!

पुन्हा उठलं रे बाप
नवा हुरूप घेऊन
माय निघलं साथिला
त्यची सावली होऊनं …!!!

शनिवार, 19 दिसंबर 2015

सुविचार 20 to 31/12/15

शुभ प्रभात

       आयुष्याचा कॅनव्हॉन्स पारदर्शी असतो

त्यावरची कलाकारी पलीकडुन उलटीच भासणार,

त्यामुळे पलीकडच्याच्या मताला काही अर्थ नसतो

म्हणून त्यांनी काढलेल्या चुकांना जास्त महत्व देऊ नका.

फक्त आपलं कार्य आत्मविस्वाने निरंतर सुरू ठेवा………

मग यश तुमचं असेल !
फक्त तुमचं………

सुविचार :- शिवा चौधरी
जामनेर,जळगांव

संकल्पना :- सुकलाल पाटील,धुळे

व्हाईस ओव्हर :- बबन चखाले,पुणे
20/12/15

शुभ प्रभात

       आयुष्यात खूप माणसे भेटतात

प्रत्येकाच्या वेगवेगळ्या रंगछटा…

कोणत्या छटेचा कुठे व कसा वापर करावा,

याचं कौशल्य ज्याला आत्मसात झालं

तोच खरा श्रेष्ठ चित्रकार………

सुविचार :- शिवा चौधरी
जामनेर,जळगांव

संकल्पना :- सुकलाल पाटील,धुळे

व्हाईस ओव्हर :- बबन चखाले,पुणे
21/12/15

शुभ प्रभात

आपलं रडगाणं कुणाला सांगण्यात वेळ घालवू नका…

कारण समोरचा फारफार तर आपलं सांत्वन करु शकतो,

त्यावर उपाय योजना आपल्या आपणंच करायच्या असतात…

म्हणुन वेळ वाया न घालता आलेल्या प्रसंगाला खंबीर पणे सामोरे जायला हवं.

सुविचार :- शिवा चौधरी
जामनेर,जळगांव

संकल्पना :- सुकलाल पाटील,धुळे

व्हाईस ओव्हर :- बबन चखाले,पुणे
22/12/15

शुभ प्रभात

शिक्षण हा मानवाचा अदृश्य डोळा आहे……

मानवाच्या डोळ्यात जरी दोष निर्माण झाला,

तरी या डोळ्याच्या इशाऱ्या वर  सारं जग नाचू शकतं…

म्हणुन प्रत्येकानं तो डोळा मिळवायलाच हवा.

सुविचार :- शिवा चौधरी
जामनेर,जळगांव

संकल्पना :- सुकलाल पाटील,धुळे

व्हाईस ओव्हर :- बबन चखाले,पुणे
23/12/15

शुभ सकाळ

      जीवनात बरीचशी कार्य आईस्क्रिम प्रमाणं असतात

त्यांना वेळेवर पुर्ण केलं तर ठिक……

अन्यथा तेही वितळून वाया गेल्या सारखेच,

म्हणून प्रत्येक कार्य निश्चित वेळेत पुर्ण करायला शिकलं पाहीजे !

अन्यथा यशाचा घास खाण्या ऐवजी अपयशाचा घोट घ्यावा लागेल हे निश्चित………

सुविचार :- शिवा चौधरी
जामनेर,जळगांव

संकल्पना :- सुकलाल पाटील,धुळे

व्हाईस ओव्हर :- बबन चखाले,पुणे
24/12/15

शुभ सकाळ

         ओठात एक आणि पोटात दुसरं कितीही ठेवायचा प्रयत्न केलात,

तरी मानसाच्या वागणुकी वरुन त्याचा स्वभावाचा अंदाज हा येतोच,

म्हणुन जे पोटात असेल तेच ओठात ठेवा……

कारण तुमच्या स्पष्ट पणामुळे जग तुमच्या विचारांचा स्विकार तरी करेल 
अथवा

चुकत असाल तर मार्गदर्शन तरी करेल……

सुविचार :- शिवा चौधरी
जामनेर,जळगांव

संकल्पना :- सुकलाल पाटील,धुळे

व्हाईस ओव्हर :- बबन चखाले,पुणे
25/12/15

शुभ सकाळ

शांत पाण्यात स्पष्ट प्रतिमा पहात असतांना………

कुणी पाणि ढवळून वलय निर्माण केलं,
तर गोंधळुन जाऊ नका,

पाणि पुन्हा शांत होण्याची वाट पहा,
प्रतिमा पुन्हा स्पष्टच दिसेल…

दैनंदिन कामात ही असे अडथडे येतच असतात……

म्हणुन खचून जायचं नसतं, थोड्या वेळाने त्याच कामात रमायचं असतं.

सुविचार :- शिवा चौधरी
जामनेर,जळगांव

संकल्पना :- सुकलाल पाटील,धुळे

व्हाईस ओव्हर :- बबन चखाले,पुणे
26/12/15

♻ शुभ सकाळ ♻

              आपापसातल्या मतभेदाने झालेल्या जखमेवरची खपली… काढायची नसते,

त्यामुळे जखम पुन्हा ताजी होऊन रक्ताळण्याची शक्यता असते,

असेल ही कदाचित समोरच्याची चुक……

पण त्यावर मोठेपणाचा मलम लावुन  मायेची फुंकर घातली,

तर मनावरील अदृष्य व्रण ही मिटू लागतात.

सुविचार :- शिवा चौधरी
जामनेर,जळगांव

संकल्पना :- सुकलाल पाटील,धुळे

व्हाईस ओव्हर :- बबन चखाले,पुणे
27/12/15

♻ शुभ सकाळ ♻

    वृक्षांची मुळं जरी दिसत नसली

तरी त्यांचं कामगिरी खूप मोठं असते

उगाच फांद्यांची आसक्ति त्यांना भेटण्याची नसते...

फांद्या कितीही उंच गेल्या तरि त्यांचा झुकाव जमीनीकडेच असतो.

मानवाने ही आपली मुळं ओळखायला हवी...

आपल्याला उंचावर नेणारी मानसं जपायला हवी.

सुविचार :- शिवा चौधरी
जामनेर,जळगांव

संकल्पना :- सुकलाल पाटील,धुळे

व्हाईस ओव्हर :- बबन चखाले,पुणे
27/12/15

शुभ प्रभात

जीवन अडथळा शर्यती प्रमाणं असतं,

त्यात असंख्य अडथळे येतात …

त्यांना योग्य वेळी योग्य प्रकारे पार करायचं असतं,

तरच अंतिम रेषेपर्यंत सुरक्षित पोहचता येतं.

सुविचार :- शिवा चौधरी
जामनेर,जळगांव

संकल्पना :- सुकलाल पाटील,धुळे

व्हाईस ओव्हर :- बबन चखाले,पुणे
28/12/15

शुभ सकाळ

साप शिडीच्या खेळात, जशा शिड्या कमी आणि साप जास्त………

तसे वास्तविक आयुष्यात ही सापच जास्त असतात,

प्रत्येक साप गिळायला टपुन बसलेला असतो,

सापशिडीच्या खेळात साप आणि शिडीतला फरक त्वरीत कळतो…

पण वास्तविक आयुष्यातील साप ओळखणं मात्र खूप अवघड.

सुविचार :- शिवा चौधरी
जामनेर,जळगांव

संकल्पना :- सुकलाल पाटील,धुळे

व्हाईस ओव्हर :- बबन चखाले,पुणे
29/12/15

♻ शुभ सकाळ ♻

शुन्य……… बघायला जाल, तर शुल्लक बाब,

आणि करायला गेलं, तर करणारे त्यातून, विश्वाची निर्मिती ही करतात.

मानवाच्या कर्माचं ही काहीसं असचं असतं…

दुष्कर्म केलं तर जीवन मातीमोल !
आणि सदकर्म केलं, तर त्याच जीवनाला हिऱ्याची चमक प्राप्त होते.

सुविचार :- शिवा चौधरी
जामनेर,जळगांव

संकल्पना :- सुकलाल पाटील,धुळे

व्हाईस ओव्हर :- बबन चखाले,पुणे
31/12/15

शुक्रवार, 18 दिसंबर 2015

लावणी

लावणी

भलतीच घाई…… करता बाई…
भलतीच घाई……करता बाई…
माझ्या बाबाला सारं सांगाल का ?
मला लग्नाला मागणी घालाल का ?
मला लग्नाला मागणी घालाल का ?

{कोरस:- लय तयवरली लगनाला झुरली हीला लगनाला मागणी घालाल का? -2 }

इश्काच्या आगीत घेतली उडी
भावला मनाला गबरु गडी
मधाच्या बोटाची चाखून गोडी
पाण्यात मध……मधात पाणी -2
माझ्या पिरतीचं,
माझ्या पिरतीचं पाणी चाखाल का?
मला लग्नाला मागणी घालाल का ?
मला लग्नाला मागणी घालाल का ?

{कोरस:- लय तयवरली लगनाला झुरली हीला लगनाला मागणी घालाल का? -2 }

नजर माझी तुम्हास हेरते
पाव्हनं तुम्हस्नी ईशारा करते
काळिज काढून हातात धरते
हातात काळिज……काळजाला हात -2
माझ्या काळजाची,
माझ्या काळजाची धडधड ऐकाल का?
मला लग्नाला मागणी घालाल का ?
मला लग्नाला मागणी घालाल का ?

{कोरस:- लय तयवरली लगनाला झुरली हीला लगनाला मागणी घालाल का? -2 }

आरशा म्होरं झाले मी दंग
ज्वानीला चढलाय गुल्लाबी रंग
गाठिची चोळी झालिया तंग
चोळीची गाठ……गाठीची चोळी
माझ्या चोळीची,
माझ्या चोळीची गाठ तुम्ही सोडाल का?
मला लग्नाला मागणी घालाल का ?
मला लग्नाला मागणी घालाल का ?

{कोरस:- लय तयवरली लगनाला झुरली हीला लगनाला मागणी घालाल का? -2 }

पाव्हणं तुमचं वागणंच खोटं
मला तुमचं भ्या वाटतं
इश्काचा चाळा करत्यात ओठं
इश्काचा चाळा……चाळ्यातले ओठं
माझ्या ओठांची,
माझ्या ओठांची लाली चाखाल का?
मला लग्नाला मागणी घालाल का ?
मला लग्नाला मागणी घालाल का ?

{कोरस:- लय तयवरली लगनाला झुरली हीला लगनाला मागणी घालाल का? -2 }

©शिवा चौधरी
    जामनेर,जळगांव

गुरुवार, 17 दिसंबर 2015

सख्या

सख्या

मी रे वाटसरु सख्या
तु पावसाची मुक्त सर्
भिजताच अंग सारे
थरथरती अधर …………

वाटे मजशी रहावे
तव संगतीला सदा
तु कृष्ण व्हावा माझा
मी तुझी व्हावी राधा …………

मखमली स्पर्श तुझा
होईल का ? रे तनाशी
दे मजशी तु  सहारा
घे ना मज बाहुपाशी …………

गुंफू श्वासांचा गजरा
वेचू प्रणयाची फुले
बागे मंधी आठवांच्या
मन् मंदमंद डुले …………

तु रे चांद पुनवेचा
सख्या चांदणी मी तुझी
अमावसच्या रातीला
आभा पसरेल माझी …………

जशी गवताची पाती
भिजतिया रे दवानं
तुझं राजबिंड रूप
न्हाऊ घातलं घामान …………

मी मेघ पावसाचे
तु मानसूनी वारा
मी होईल धरनी
तु पुन्हा पावसाची धारा…………

©शिवा चौधरी
    जामनेर,जळगांव

बुधवार, 16 दिसंबर 2015

स्वागत गीत

स्वागतम्

आ आ आ आ$$$$$$$
स्वागतम………… स्वागतम……………
स्वागतम………… स्वागतम……………

आई शारदेच्या प्रांगणी…………
रमला……सोहळा
जाई मोगऱ्याच्या या मनी………
गुंफूनि………या माळा  - 1

स्वागतम………… स्वागतम……………
स्वागतम………… स्वागतम……………

आ;सुसले नेत्र हे……
आपुल्या दर्शना
पेटती वात ही……
शोभते निरंजना  - 2

स्वागतम………… स्वागतम……………
स्वागतम………… स्वागतम……………

वि ; खूरले  पुष्प हे ………
शब्दांचे ईथे
श्रवण्या … तववाणी
मन् केले रिते  - 3

स्वागतम………… स्वागतम……………
स्वागतम………… स्वागतम……………

रम्य हि  नगरी………
गोड हि …… माणसे
जिंकण्या जग हे………
ध्यास म  नी     बसे   -  4

स्वागतम………… स्वागतम……………
स्वागतम………… स्वागतम……………

© शिवा चौधरी
जामनेर,जळगांव

सोमवार, 14 दिसंबर 2015

सुधाकरी 2 अभंग

अभंग

तुच रुपवंती
तुच गुणवान
सुवर्णाची खाण
माझी राणी……1

जरी असलासे
सावळा गं रंग
करितसे दंग
मनास या……2

चाफेकळी नाक
डाळिंबी अधर
साजेशी नजर
लाभलीया……3

उंच उंच बांधा
सादा पेहराव
निरागस भाव
मुखावरी……4

असो नऊवारी
या पैठणी शालू
लागतिल खुलू
तवदेही……5

बघताच तुला
हर्ष होई मना
लाभला जीवना
साथी यैसा……6

भेटि साठी झाला
जीव कासाविस
शेवटचे दिस
निघेनात……7

रक्तपिसासुंचा
भरला बाजार
जनता लाचार
तयापुढे………

एक एक घोट
नकळत पिती
झाली राजनिती
घाणेरडी………

निवडुन दिला
जनतेनं नेता
पोकळचं बाता
करि सदा………

कर्तव्याची जाणं
राहीली ना कुणा
काय झाला गुन्हा
जनतेचा…………

फुकाचे भांडणे
दाखवती जगी
राती एका जागी
होती गोळा………

तुज दारि येता
सांग त्यास नीति
मान साऱ्या जाति
सारख्याच………

कुणावर ठेऊ
भरवसा सांगा
बोला पांडूरंगा
आता तरी………

सुविचार 15ते19,/12/15

शुभ सकाळ

जीवन हा एक सोंगट्यांचा खेळ आहे,
यात कुणी राजा, तर कुणी प्रधान आहे,
कुणी एकच घर चालतो तर कुणी स्वैरभैर फिरतो,
आपण या खेळातील घोड्याची चाल आत्मसात करावी !
जेणे करुन प्रधानाला ही आपल्या आसपास भटकायला भीति वाटायला हवी…………

सुविचार :- शिवा चौधरी
जामनेर,जळगांव

संकल्पना :- सुकलाल पाटील,धुळे

व्हाईस ओव्हर :- बबन चखाले,पुणे
15/12/15

♻ शुभ सकाळ ♻

        मानवी मन् आकाशात  फिरणाऱ्या स्वच्छंद मेघांसारखं असतं,

वाट्टेल तसा आकार घेतं, वाट्टेल तिकडे फिरतं,

पण एक गोष्ट मात्र खरी………

मेघ कितीही उंच गेले तरी फिरुन त्यांना नातं धरनीशीच जोडावं लागतं………

म्हणुन आपण कितीही किर्ती मिळवली तरी आपले सुरवातीचे दिवस विसरु नका.

सुविचार :- शिवा चौधरी
जामनेर,जळगांव

संकल्पना :- सुकलाल पाटील,धुळे

व्हाईस ओव्हर :- बबन चखाले,पुणे

🔸🔹🔸🔹🔴🔹🔸🔹🔸

शुभ सकाळ

जीवनरुपी बुद्धिबळाच्या खेळातील
कदाचित आपण प्यादे ही असू…
परंतु आपण जर बुद्धिचा योग्य वापर करुन खेळलो,
तर राजात रुपांतर होणं ही अवघड नाही…

सुविचार :- शिवा चौधरी
जामनेर,जळगांव

संकल्पना :- सुकलाल पाटील,धुळे

व्हाईस ओव्हर :- बबन चखाले,पुणे
17/12/15

शुभ सकाळ

जन्म म्हणजे मातितून सुवर्णाची निर्मिती व मृत्यू म्हणजे त्याच सुवर्णाचं विघटन,
आणि दोघांमधला काळ म्हणजे जीवनरुपी सुवर्णालंकार………
हा अंलकार इतका सुंदर घडवा,
कि त्याचं विघटन होतांना जन अन जन हळहळायला हवा.

सुविचार :- शिवा चौधरी
जामनेर,जळगांव

संकल्पना :- सुकलाल पाटील,धुळे

व्हाईस ओव्हर :- बबन चखाले,पुणे
18/12/15

शुभ सकाळ

आयुष्यात अडचणी या येताच…

म्हणुन खचून जाऊ नका,

अडचणींवर मात करुन जगायला शिका…

जीवन खूप सुंदर आहे
त्याला एकाकी संपवू नका.

सुविचार :- शिवा चौधरी
जामनेर,जळगांव

संकल्पना :- सुकलाल पाटील,धुळे

व्हाईस ओव्हर :- बबन चखाले,पुणे
19/12/15

मंगलवार, 8 दिसंबर 2015

शेती सुधाकरी

शेती

नांगराच्या जरी
सोसल्या वेदना
कधी न याचना
केल्या हीनं………

तुज साठी माती
उन्हात तापली
पाण्यात ही झाली
ओली चिंब………

भेगाळे काळिज
तीचं पाण्या विनं
तरी तिचं जिनं
शांततेच………

आपलीच माती
आपले माणसे
भेद ठायी नसे
शेतीचिया………

हिरे मोती पाचू
दान देते हाती
जाणं ठेवी शेती
कष्टाचिया………

निसर्गाचा कोप
सदा तिजवरं
फाटतोय ऊरं
वेदनेनं…………

शेतीविनं जिनं
व्यर्थ रे मानवा
घास नवा नवा
देते तुला…………

जसं जसं सारं
रान फुलविते
मन् डोलविते
शेती माझी…………

काळा लाल भूरा
किती तुझे रंग
कसे फेडी पांग
शिवा तुझे…………

©शिवा चौधरी
      जामनेर,जळगांव

शुक्रवार, 4 दिसंबर 2015

सुविचार

♻ शुभ सकाळ ♻

विश्वाच्या 🎬रंगपटावरील
आयुष्य एक कलाकृती आहे,
आपण सारे रंगकर्मी🎭
आहोत
आणि जीवन आपली निर्मिती.

त्या निर्मितीला आपल्या अभिनयाने असं 🎨रंगवा,
कि जगातिल असंख्य प्रेक्षकांनी तोंडात बोटं घालायला हवी……

शिवा चौधरी
      जामनेर,जळगांव

शुभ सकाळ🙏🏼 शिव सकाळ

🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹

शुभ प्रभात

घड्याळाचे 🕓 काटे कधीच कुणासाठी थांबत नसतात.

मग मनुष्यच का ? शुभ👣मुहूर्ताची वाट बघत असतो.

आपल्या आयुष्यातला प्रत्येक⌛ क्षण अन् क्षण शुभ असतो,

उलट वेळ ⏰ सतत विचार करत असते, हा कधी माझ्या सोबत चालु🏃🏻 लागेल………

© शिवा चौधरी
       जामनेर, जळगांव

शुभ सकाळ 🙏🏼
        शिव सकाळ 🚩

शिव सकाळ ♻

व्यक्तिचं मन अथांग🚣🏻 सागराप्रमाणं खोल आणि नितळ असावं....

कारण खोल मनात खूप काही सामावतं 🔮तर नितळ पाण्यात आरपार दिसतं,

आपलं ही मन् स्वच्छ आणि नितळ असावं की असंख्य जनांचे चाहते बनू शकतो……

हो,
फक्त त्यासोबत स्वभावात नदिच्या पाण्याचा गोडवा🍫 असावा म्हणजे झालं.

          शिवा चौधरी 🍯
     🌱 जामनेर,जळगांव 🌱

       🌺 शुभ सकाळ 🌺
        शिव सकाळ🚩
🍃🔸🍃🔸🍃🔸🍃🔸🍃

शुभ प्रभात

निर्माता आपली फक्त रेखाकृती बनवतो....
रंग त्यात आपले आपणच भरावे लागतात,
आता ते आपण ठरवायचं कि कुठे कोणता रंग भरावा !
जेणे करुन आपले चित्र विश्व प्रदर्शनीत उठुन दिसेल.
दिनांक :- 10/12/2015

       शुभ प्रभात

          वृक्ष जीर्ण 🌳 झालेल्या पानांचा🍂 त्याग करतात,

कारण त्यांना नवी पालवी 🌿घेऊन पुन्हा बहरायचं असतं……

व्यक्तिने ही आपल्या बुरसटलेल्या विचारांना त्यागायला हवं,

जेणे करुन त्याच्या जीवनाला ही उच्च विचारांचा 🌻बहर येईल.

             शिवा चौधरी
      🐾जामनेर,जळगांव🐾

शिव सकाळ - शुभ सकाळ
11/12/15

🍯 शुभ सकाळ 🍯

      नाती फुल🌻 झाडांप्रमाणं जोपासायची असतात,

काही अंशी त्यागाचं खत पाणि🚰 घालून टिकवायची असतात,

अन्यथा त्यांना जर किड🐛 लागली………

झाडांच्या पानांप्रमाणं🍂 मने 💕 हि करपायला लागतात.
  

         शिवा चौधरी 🌴
      🐾जामनेर,जळगांव🐾
12/12/15

🍯 शुभ सकाळ 🍯

   क्रोध 😡 हा एका ठिणगी प्रमाणं असतो !

क्षणात मालवला तर निरवं शांतता, 🌝
आणि अविवेकाने वाढवला तर वणवा🔥

म्हणुन क्रोधावर 😠 नियंत्रण ⚓ ठेवणं शिकायला हवं.

अन्यथा या देहाची राख 🌚  व्हायला वेळ⏰ लागणार नाही

        शिवा चौधरी 🌴
      🐾जामनेर,जळगांव🐾
13/12/15

🍯 शुभ सकाळ 🍯

   जगात कुठली हि वस्तु 🚽 बिनकामाची  अथवा टाकावू 💩 नसते...

फक्त तिचा कोण❓, कुठे ❓व कसा वापर करतो हे महत्वाचं,

मानसा मानसात हि कुणी श्रेष्ठ 🎩 किंवा कनिष्ठ 👞 नसतो !

फरक असतो बघणाऱ्याच्या दृष्टिचा👀

        शिवा चौधरी 🌴
      🐾जामनेर,जळगांव🐾

14/12/15

गुरुवार, 3 दिसंबर 2015

स्वप्न कविता

सुंदर स्वप्न

लाज लाजरी दिसे साजरी
जशी स्वर्गाची भासे परी,
क्षणात रुसते क्षणात हसते
राग तुझा गं नाकावरी……

नयना मधूनी अलगद चमके
चमके प्रणयी मादकता,
चेहऱ्या वरती तुझ्याच शोभते
प्राजक्तफुलांची साजुकता…

कुरळे कुरळे केस साजरे
रेशमास ही लाजवती,
हळुच उडती स्वप्नी माझ्या
निद्रेतून मज जागवती…

डाळिंबासम अधरावरती
नागिणी गत जीभ फिरे,
दंश तयाचा मजला व्हावा
जरी रक्ताचे वाहतील झरे…

रवी किरणांच्या तेजाहुन ही
कर्ण कुंडले चमचमती
इर्षेने त्या चंद्र चांदण्या
अंगारासम धगधगती…

चाफेकळी नासिका भरते
श्वास अंतरी मदनाचा,
बाहूपाशी तुझ्याच मिळतो
हर्ष मनाशी जगण्याचा…

सुवर्ण कांती अटकर बांधा
मनास माझ्या भुलवितो,
ताजी ताजी परडी मधली
कलिका हृदयी फुलवितो…

विणेच्या सुरात तुझे
स्वर
असे काही गं  विरघळती,
निघताची अंतरा मुखातूनी
रोम रोम ही गीत गाती…

नृत्यामध्ये मोर नाचरा
कंठी कोकिळ बसलासे,
रुपाची तू खाण सखे ग
स्वर्ग भूवरी वसलासे…

रुपवान तू सुंदर नारी
आलिंगन मज देशिल का?
अर्पिन तुजला जीवन सारे
वास्तवात तू येशिल का?

©शिवा चौधरी
    जामनेर,जळगांव

बुधवार, 2 दिसंबर 2015

मनुवाद्यांनो आता तुमचं काही खरं नाही

मनुवाद्यांनो आता तुमचं काही खरं नाही !!!

प्रत्येक जागीच चालणार नाही हो दबंगाई
तुमच्या विरोधात आता उठलिया बाई
मनुवाद्यांनो आता तुमचं काही खरं नाही ||धृ||

तुम्ही जितकं तिला छळणार
तितकीच मग ती उसळणार
आग आहे ती भडकली कि भडकणार
हे भडकवणं तुमच्या साठी बरं नाही
मनुवाद्यांनो आता तुमचं काही खरं नाही……

ती जिजाऊ झालीय ती सावित्री झालीय
तुम्ही तिला भटकवताय हीची तिला
खात्री झालीय
तुमची दादागिरी तीच्या आता जिव्हारी आलीय
शक्तिच्या द्योदक त्या, कळपातंली गुरं नाही
मनुवाद्यांनो आता तुमचं काही खरं नाही……

तुम्हीच तिला करुन दिलं वातावरण पूरक
परंपरा आणि विज्ञानातला तिला कळतो हं फरक
तिनं घेतलेय सुत्र हाती, दुबळ्या तु आता मागं सरक
तिच्या पुढं चालणार तुमचे थेरं नाही
मनुवाद्यांनो आता तुमचं काही खरं नाही……

पद्मनाभ घ्या, अथवा जामा मज्जिदचा मिनार
हाजी अली दर्गा या पहा शनीचा पार
कार्तिकेय मंदिर, या शबरीमला चा गाभार
अजून आहेत भरपूर, हेच काही सारं नाही
मनुवाद्यांनो आता तुमचं काही खरं नाही……

बघा तुमच्या विरोधात हॅप्पी टू ब्लिड घेऊन उठली
योनी चित्रासंग अन्याया विरोधी बोंब तिनं ठोकली
अरे तिच्याच पोटी जन्मला तरी संस्कृति कशी बाटली
गैरसमज आहे तुमचा, हे आंदोलन चारीमेरं नाही
मनुवाद्यांनो आता तुमचं काही खरं नाही……

जीवन चक्राची मुख्य स्त्रोत म्हणजे स्त्री
परिवर्तनीय दिपाची ज्योत म्हणजे स्त्री
प्रतिगामी विचारांची सरेआम मौत म्हणजे स्त्री
अरे अस्सल बीज आहे ती, गाळलेलं मातेरं नाही
मनुवाद्यांनो आता तुमचं काही खरं नाही……

मनुवाद्यांनो आता खरचं तुमचं खरं नाही……

© शिवा चौधरी (प्रहार)
     जामनेर,जळगांव


⬛⚫▪🔵▪⚫⬛

🔻मनुवाद्यांनो आता तुमचं काही खरं नाही !!!🔻
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹

✳प्रत्येक जागीच चालणार नाही हो दबंगाई👊🏼
तुमच्या विरोधात आता उठलिया बाई
मनुवाद्यांनो आता तुमचं काही खरं नाही ||धृ||

🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹

💠तुम्ही जितकं तिला छळणार
तितकीच मग ती उसळणार
आग 🔥आहे ती भडकली कि भडकणार
हे भडकवणं तुमच्या साठी बरं नाही
मनुवाद्यांनो आता तुमचं काही खरं नाही……

🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹

♻ती जिजाऊ झालीय ती सावित्री झालीय
तुम्ही तिला भटकवताय हीची तिला
खात्री झालीय
तुमची दादागिरी तीच्या आता जिव्हारी आलीय
शक्तिच्या द्योदक त्या, कळपातंली गुरं🐃🐂 नाही
मनुवाद्यांनो आता तुमचं काही खरं नाही……
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹

❇तुम्हीच तिला करुन दिलं वातावरण पूरक
परंपरा आणि विज्ञानातला तिला कळतो हं फरक
तिनं घेतलेय सुत्र हाती, दुबळ्या तु आता मागं सरक
तिच्या पुढं चालणार तुमचे थेरं नाही
मनुवाद्यांनो आता तुमचं काही खरं नाही……
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹

✳पद्मनाभ घ्या, अथवा जामा मज्जिदचा मिनार
हाजी अली दर्गा या पहा शनीचा पार
कार्तिकेय मंदिर, या शबरीमला चा गाभार
अजून आहेत भरपूर, हेच काही सारं नाही
मनुवाद्यांनो आता तुमचं काही खरं नाही……
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹

💠बघा तुमच्या विरोधात हॅप्पी टू ब्लिड घेऊन उठली
योनी चित्रासंग अन्याया विरोधी बोंब तिनं ठोकली
अरे तिच्याच पोटी जन्मला तरी संस्कृति कशी बाटली
गैरसमज आहे तुमचा, हे आंदोलन चारीमेरं नाही
मनुवाद्यांनो आता तुमचं काही खरं नाही……
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹

♻जीवन चक्राची मुख्य स्त्रोत म्हणजे स्त्री
परिवर्तनीय दिपाची ज्योत म्हणजे स्त्री
प्रतिगामी विचारांची सरेआम मौत म्हणजे स्त्री
अरे अस्सल बीज आहे ती, गाळलेलं मातेरं नाही
मनुवाद्यांनो आता तुमचं काही खरं नाही……

🔴मनुवाद्यांनो आता खरचं तुमचं खरं नाही……🔵
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
© शिवा चौधरी (प्रहार)
     जामनेर,जळगांव
◼◾▪🔴▪◾◼