# हास्य लघु नाटीका #
विरंगुळा म्हणुन लिहलेली लघु नाटीका कृपया कोणत्याही शब्दांना मनावर घेऊ नये……
काय करणार सेन्सार नाही झालं ना !
साहीत्य प्रकार :- हास्य लघु नाटीका
लेखक :- शिवा चौधरी
सादरकर्ते :- कविविचार मंच गृप
स्थळ :- कविविचार मंच शेगांव
निर्माते :- शिवशंकर चिकटे
दिग्दर्शक :- जे डी भुसारे
निर्मिती सहाय्यक :- रवी कांबळे
कॅमेरा मॅन :- रविंद्र घोगरे
डायलॉग :- अनिल सा. राऊत
सजावट :- दिगंबर & अनिता सावंत
तर चला बघुया
"हौशी सासु फिरणारा नवरा" हास्य लघु नाटीका
[पडदा उठलो पल्लवी आणि मधू भोवरा भोवरा खेळताय, शिवा उभा राहुन खेळ बघतोय तितक्या कोकाटे गुरुजी येतात………]
गुरुजी :- काय गं पोरींनो काय करताय?
पल्लू :- काही नाही गुरुजी भवरा भवरा खेळतोय.
गुरुजी :- अगं काय पोरींनो ! असे खेळ खेळायचे दिवस राहीलेय का? तुमचे आता……
शिवा :- अहो गुरुजी त्या भोवरा भोवरा खेळताय, नवरा नवरा नव्हे…
मधू :- पुरे पुरे कळलंय त्यांना उगाच चावटपणा नको करुस.(ती नाक मुरडत म्हणाली)
शिवा :- यात काय चावटपणा ! त्यांना कमी ऐकायला आलं असेल म्हणुन जरा क्लियर केलं.
गुरुजी :- अरे भांडू नका (नम्र स्वरात) मला सांगा कुणाचा भोवरा जास्त फिरतो.
पल्लू :- माझा
मधू :- माझा
पल्लू :- माझा
मधू :- माझा (दोघी माझा माझा करतात)
गुरुजी :- अरे एक जण बोला कुणी तरी. (त्या परत मी मी करतात)
पल्लू :- हवं तर शिवाला विचारा गुरुजी तो बघतोय केव्हा पासून खेळ आमचा.
(ती गर्वाने म्हणाली जसा शिवा मनमोहन सिंग असावा आणि तो आपण सांगितलं तसा बोलावा पण तिला काय माहीत तो मनमोहन नव्हता आणि ती सोनिया ही नव्हती)
मधू :- त्याला काय कळतंय चल आपण फिरवूनच दाखवू गुरुजींना नवरा
पल्लू :- तु फिरवशिल गं तुझ्या कडे आहे नवरा , मला अजून "श्री" नाही भेटला
मधू :- अगं बाई मी नवरा म्हटले का? स्वारी मला भोवरा म्हणायचं होतं.
गुरुजी :- असु द्या माझ्या कडे वेळ नाही , शिवा तुच सांग बाबा कुणाचा " भोवरा "जास्त फिरतोय . आणि भवराच सांग नवरा नको (त्यांनी ही व्यंग केला)
शिवा :- मी काय सांगणार गुरुजी, भोवऱ्याच्या नावा वरुन तुम्हालाच कळेल, कोणता जास्त फिरतो.
गुरुजी :- नावा वरुन (आश्चर्याने)
(तितक्यात लेडी हिटलर अनिता ताई प्रवेश करतात)
ताई :- कोण रडवतयं पोरींना ! या शिवाला काही कामचं नाही, नुसत्या उचापत्या करतं कार्ट (त्या डाफरतात पण लगेच गुरुजींकडे लक्ष जातं) अगं बाई गुरुजी पण आहेत का इथं …… मग काही तरी मुद्दयाचं असावं.
शिवा :- मुद्दा वगैरे काही नाही, भोवरा कुणाचा जास्त फिरतो ते भोवऱ्याच्या नावा वरुन ठरवायचयं.
ताई :- नावावरुन (आश्चर्य) बरं सांगा नावं मीच ठरवते.
पल्लू :- माझा विदेश मंत्रि
मधू :- माझा पंतप्रधान
ताई :- मग पल्लूचा जास्त फिरणारा आहे
गुरुजी :- ते कसं?
ताई :- विदेश मंत्रि नेहमी दौऱ्यावर असतो ना म्हणुन
शिवा :- पण पंतप्रधान भाजपा चा आहे म्हटलं !
ताई :- अगं बाई मग तर मधूचाच भोवरा जास्त फिरणार (सगळे हसतात)
गुरुजी :- पण मला सांगा पल्लवीचा जास्त का फिरत नाही ?
शिवा :- अहो गुरुजी तुम्ही घाईत आहात ना ? मग या तुम्ही अशी ही चर्चा भोवऱ्याची आहे सालीची नाही. (साली शब्दावर जरा जास्त जोर देऊन तो म्हणाला) (ते जातात)
ताई :- हो भवऱ्यावरुन आठवलं ,काय गं पल्लू श्री भेटला कि नाही तुला आणि भेटला तर सासू कशी हवी तुला?
शिवा :- विषय बदलणं तर यांच्या कडुन शिकावं (तो पुटपुटतो)
ताई :- काय रे …… काय बडबडतोय? (तिरकस पणे पहात)
शिवा :- काही नाही, म्हटलं पल्लूला " हौशीसू मिळावी
(त्यानं मधला सा जाणुन बुजून गाळला)
ताई :- हे काय नवीन हौशीसू कुणी चायनिज श्री शोधतेय का ? काय.
शिवा :- चायनिज कसला मी हौशी सासू म्हटलं.
मधू :- मग तो सा कधी लावणार? (हातवारे करतं नाक मुरडत)
पल्लू :- शी नंतर (त्वरित म्हणते अन जिभ चावते ) परत हशा पिकतो
शिवा :- हीला मध्ये बोलायची सवय.
(तितक्यात चिकटे येतात )
चिकटे :- काय कुणाचं बाळ शी करतयं?
ताई :- बाळ कसलं हो, हौशी सासूतला नेमका सा सुटला होता तो केव्हा लावणार म्हणुन पल्लू म्हणाली शी नंतर लावा म्हणुन हसू आलं.
चिकटे :- शी नंतर नको तर मग सू आधी लावा (परत हशा पिकतो)
मधू :- आयला इथं पण गरबड( आश्चर्य टाळी वाजवत)
ताई :- नाही तर शीसू च्या मध्ये लावा हे योग्य होईल.(ताईनं तर्क लावलापण चिकटेंनी त्यावर पण जोक मारला)
चिकटे :- अहो शिशुच करतो ना शी सु
हा हा हा हा (सगळे हसतात)
शिवा :- अहो बंद करा ते, इथं काय सा रे ग म प लागलाय सुर लावायला. चला येतो मी (जरा चिडण्याचं नाटक करत पळ काढतो. कारण त्याला दुसरे कडे कुठे तरी जायचं असतो)
ताई :- हा मेला नक्की "पंतप्रधान" होणार, एक जागी काही टिकत नाही
चिकटे :- आता पुढचा देश कोणता
(अहो अहो करत त्याच्या मागे निघून जातात आणि परदा पडतो)
नाटीकेला जिवंतपणा यावा म्हणुन पात्रांचा एकेरी नावाने उल्लेख केला त्या बद्दल क्षमस्व……
सुधारणा करुन पुन्हा --->>
# हास्य लघु नाटीका #
विरंगुळा म्हणुन लिहलेली लघु नाटीका कृपया कोणत्याही शब्दांना मनावर घेऊ नये……
काय करणार सेन्सार नाही झालं ना !
साहीत्य प्रकार :- हास्य लघु नाटीका
लेखक :- शिवा चौधरी
सादरकर्ते :- कविविचार मंच गृप
स्थळ :- कविविचार मंच शेगांव
निर्माते :- शिवशंकर चिकटे
दिग्दर्शक :- जे डी भुसारे
निर्मिती सहाय्यक :- रवी कांबळे
कॅमेरा मॅन :- रविंद्र घोगरे
डायलॉग :- अनिल सा. राऊत
सजावट :- दिगंबर & अनिता सावंत
तर चला बघुया
"हौशी सासु फिरणारा नवरा" हास्य लघु नाटीका
[🎭पडदा उठलो पल्लवी आणि मधू भोवरा भोवरा खेळताय, शिवा उभा राहुन खेळ बघतोय तितक्या कोकाटे गुरुजी येतात………]
गुरुजी :- काय गं पोरींनो काय करताय?
पल्लू :- काही नाही गुरुजी भवरा भवरा खेळतोय.
गुरुजी :- अगं काय पोरींनो ! असे खेळ खेळायचे दिवस राहीलेय का? तुमचे आता……
शिवा :- अहो गुरुजी त्या भोवरा भोवरा खेळताय, नवरा नवरा नव्हे…😊
मधू :- पुरे पुरे कळलंय त्यांना उगाच चावटपणा नको करुस.(ती नाक😚 मुरडत म्हणाली)
शिवा :- यात काय चावटपणा ! त्यांना कमी ऐकायला आलं असेल म्हणुन जरा क्लियर केलं.
गुरुजी :- अरे भांडू नका (नम्र स्वरात) मला सांगा कुणाचा भोवरा जास्त फिरतो.
पल्लू :- माझा
मधू :- माझा
पल्लू :- माझा
मधू :- माझा (दोघी माझा माझा करतात)
गुरुजी :- अरे एक जण बोला कुणी तरी. (त्या परत मी मी करतात)
पल्लू :- हवं तर शिवाला विचारा गुरुजी तो बघतोय केव्हा पासून खेळ आमचा.
(ती गर्वाने म्हणाली जसा शिवा मनमोहन👳🏼 सिंग असावा आणि तो आपण सांगितलं तसा बोलावा पण तिला काय माहीत तो मनमोहन नव्हता आणि ती सोनिया 👸🏽ही नव्हती)
मधू :- त्याला काय कळतंय चल आपण फिरवूनच दाखवू गुरुजींना नवरा
पल्लू :- तु फिरवशिल गं तुझ्या कडे आहे नवरा , मला अजून "श्री" नाही भेटला
मधू :- अगं बाई मी नवरा म्हटले का? स्वारी मला भोवरा म्हणायचं होतं.😛
गुरुजी :- असु द्या माझ्या कडे वेळ नाही , शिवा तुच सांग बाबा कुणाचा " भोवरा "जास्त फिरतोय . आणि भवराच सांग नवरा नको (त्यांनी ही व्यंग केला)😜
शिवा :- मी काय सांगणार गुरुजी, भोवऱ्याच्या नावा वरुन तुम्हालाच कळेल, कोणता जास्त फिरतो.
गुरुजी :- नावा वरुन😳 (आश्चर्याने)
(तितक्यात लेडी हिटलर 😠अनिता ताई प्रवेश करतात)
ताई :- कोण रडवतयं पोरींना !
या शिवाला काही कामचं नाही, नुसत्या उचापत्या करतं कार्ट (त्या डाफरतात पण लगेच गुरुजींकडे लक्ष जातं) अगं बाई गुरुजी पण आहेत का इथं …… मग काही तरी मुद्दयाचं असावं.
शिवा :- गंभीर मुद्दा वगैरे काही नाही, भोवरा कुणाचा जास्त फिरतो ते भोवऱ्याच्या नावा वरुन ठरवायचयं बसं.
ताई :- नावावरुन😳 (आश्चर्य) बरं सांगा नावं मीच ठरवते.
पल्लू :- माझा विदेश मंत्रि
मधू :- माझा पंतप्रधान
ताई :- मग पल्लूचा जास्त फिरणारा आहे
गुरुजी :- ते कसं?
ताई :- विदेश मंत्रि नेहमी दौऱ्यावर असतो ना म्हणुन
शिवा :- पण पंतप्रधान भाजपा चा आहे म्हटलं !
ताई :- अगं बाई मग तर मधूचाच भोवरा जास्त फिरणार (सगळे हसतात)😝😝😝😝😝😝
गुरुजी :- पण मला सांगा पल्लवीचा जास्त का फिरत नाही ?😇
शिवा :- अहो गुरुजी तुम्ही घाईत आहात ना ? मग या तुम्ही अशी ही चर्चा भोवऱ्याची आहे सालीची नाही. (साली शब्दावर जरा जास्त जोर देऊन तो म्हणाला) (ते जातात🚶🏻🏃🏻)
ताई :- हो भवऱ्यावरुन आठवलं ,काय गं पल्लू श्री भेटला कि नाही तुला आणि भेटला तर सासू कशी हवी तुला?
शिवा :- विषय बदलणं तर यांच्या कडुन शिकावं (तो पुटपुटतो)
ताई :- काय रे …… काय बडबडतोय? (तिरकस पणे पहात)😒
शिवा :- काही नाही, म्हटलं पल्लूला " हौशीसू मिळावी 👵🏻
(त्यानं मधला सा जाणुन बुजून गाळला)
ताई :- हे काय नवीन हौशीसू कुणी चायनिज श्री शोधतेय का ? काय.
शिवा :- चायनिज कसला मी हौशी सासू म्हटलं.
मधू :- मग तो सा कधी लावणार? (हातवारे करतं नाक मुरडत😗😙)
पल्लू :- शी नंतर (त्वरित म्हणते अन जिभ चावते ) परत हशा पिकतो
शिवा :- हीला मध्ये बोलायची सवय.
(तितक्यात चिकटे येतात )
चिकटे :- काय कुणाचं बाळ 👶🏻शी करतयं?
ताई :- बाळ कसलं हो, हौशी सासूतला नेमका सा सुटला होता तो केव्हा लावणार म्हणुन पल्लू म्हणाली शी नंतर लावा म्हणुन हसू आलं.
चिकटे :- शी नंतर नको तर मग सू आधी लावा (परत हशा पिकतो)
मधू :- आयला इथं पण गरबड( आश्चर्य टाळी👏🏼 वाजवत)
ताई :- नाही तर शीसू च्या मध्ये लावा हे योग्य होईल.(ताईनं तर्क लावलापण चिकटेंनी त्यावर पण जोक मारला)
चिकटे :- अहो शिशुच करतो ना शी सु
हा हा हा हा (सगळे हसतात)
शिवा :- अहो बंद करा ते, इथं काय सा रे ग म प लागलाय सुर लावायला. चला येतो मी (जरा चिडण्याचं नाटक करत पळ काढतो. कारण त्याला दुसरे कडे कुठे तरी जायचं असतो)
ताई :- हा मेला नक्की "पंतप्रधान" होणार, एक जागी काही टिकत नाही
चिकटे :- आता पुढचा देश कोणता ?🇨🇲🇺🇦🇭🇳🇧🇪🇵🇪🇪🇨🇱🇧🇱🇧🇵🇹🇰🇿
(अहो अहो करत त्याच्या मागे निघून जातात आणि परदा पडतो)
नाटीकेला जिवंतपणा यावा म्हणुन पात्रांचा एकेरी नावाने उल्लेख केला त्या बद्दल क्षमस्व……
लेखक :- शिवा चौधरी
जामनेर,जळगांव
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें