शेती
नांगराच्या जरी
सोसल्या वेदना
कधी न याचना
केल्या हीनं………
तुज साठी माती
उन्हात तापली
पाण्यात ही झाली
ओली चिंब………
भेगाळे काळिज
तीचं पाण्या विनं
तरी तिचं जिनं
शांततेच………
आपलीच माती
आपले माणसे
भेद ठायी नसे
शेतीचिया………
हिरे मोती पाचू
दान देते हाती
जाणं ठेवी शेती
कष्टाचिया………
निसर्गाचा कोप
सदा तिजवरं
फाटतोय ऊरं
वेदनेनं…………
शेतीविनं जिनं
व्यर्थ रे मानवा
घास नवा नवा
देते तुला…………
जसं जसं सारं
रान फुलविते
मन् डोलविते
शेती माझी…………
काळा लाल भूरा
किती तुझे रंग
कसे फेडी पांग
शिवा तुझे…………
©शिवा चौधरी
जामनेर,जळगांव
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें