सरलीत कित्तेक वर्षे
येथे बघता बघता
शहाणपणाने वागू जरा
माणसा जगता जगता
वेदना देती खूप सारे
स्व स्वार्थ साधतांना
चला आनंद वाटूयात
आनंद मागता मागता
आनंदात हसतांना
दिसतील खूप येथे
चला थोडं हसूयात
दुःख भोगता भोगता
अज्ञानांच्या हितासाठी
उघडू कवाडे ज्ञानाची
चला थोडं शिकवूया
येथे शिकता शिकता
अपयशाचे खाच-खडगे
चेंगारुन जाती अंगठे
अंगठ्यास बळकटी आली
ठोकरा लागता लागता
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें