सद्बुद्धी दे.....!
सद्बुद्धी दे, दुर्बुद्धी हर
आऊ जिजाऊ समृद्ध कर,
राजांच्या गुणांचा अनुयायी मी
कृपा असू दे तुझी आम्हावर ।।धृ।।
जिकिरीनं घडाविला
राजा आमुचा छत्रपती,
स्वराज्याचा घेऊन ध्यास
पावन केली मराठी माती,
जीव आमुचा ही जडो मातीवर ।।१।।
पर नारीचा आदर माझ्या
आचरणात सदा राहू दे,
दुःसाहसी भामट्यांना
डोळ्यांत क्रोध माझ्या पाहू दे,
श्रद्धा आमुची छत्रपती वर ।।२।।
जात नको पात नको
हृदयी माऊली भेद नको,
मराठी माती नी मराठी नाती
जपतांना काही खेद नको,
संस्कार घडू दे मम मतीवर।।३।।
इमानात अभेद्यता
सह्याद्रीगत सदा राहू दे,
ध्येयातले तेज आमुच्या
रवीगत जगाशी पाहू दे,
मराठी झेंडा नेऊ वरवर ।।४।।
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें