यंदा तरी सुखावून जा
येतोय तर येवून जा
चार दिस राहून जा
दाणा उगव मातीत
घास त्याचा खाऊन जा
इवल्या इवल्या पिकांची
बघ लहरणारी कांती
हर्षी बागडणारे बघ
राघू मैना आसमंती
नाचनारी पोरं पहा
फाटक्या अर्ध्या चड्डीवर
थांबलास तर चढलं मास
थोडं ठिसूर हड्डीवर
गोडवे ओवीत गाईल
कारभारीन जात्यावर
मोत्यावाणी चमक तू
माझ्या पिकांच्या पात्यावर
चंद्र, सुर्य, तारे तुझी
उतारतील रे आरती
नाचतील बैल जोड्या
चाळ बांधून खुरावरती
स्पटिकातून आसमंती
अवतरतो इंद्रधनू
मम कल्पनेच्या चित्रात
तो रंग भरतोय जणू
आलास तर येवून जा
खरचं चार दिस राहून जा
जाता जाता साऱ्यांनाच
यंदा तरी सुखावून जा
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें