तिरंगा
लहरतांना आज निळ्या आसमंती
बघा आपला तिरंगा हसू लागलाय
छळ करणारांच्या ही अंतरंगात
इथं आज तिरंगा दिसू लागलाय
भ्रष्टाचारी पांढऱ्या वेशात आल्यानं
सादा-भोळा तिरंगा फसू लागलाय
त्यांची बघून सरेआम फसवेगिरी
हळूच मग तिरंगा रुसू लागलाय
तिरंग्याखालीच वावरणाऱ्याच्या
काळजात तिरंगा घुसु लागलाय
अरे माणसा तुझ्या चुकांच्या वेदना
बघ नकळत तिरंगा सोसू लागलाय
शिवा चौधरी
जामनेर,जळगांव
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें