*"गुड मॉर्निंग चारोळी स्पर्धा"*
स्पर्धॆसाठी………
🌸चारोळी 1
नका खेळूस भावनांशी
उगाच मूकबधिरांच्या
आधिच कळ्या नियतीने
चुरगाळल्या त्या फुलांच्या
🌸चारोळी 2
कुणास वाटाव्या वेदना
कुणा पुढे मांडू गाऱ्हाणे
एक एक दिस काढतो
आम्ही बापडे धिराने
🌸चारोळी 3
जरी आम्ही मूकबधिर
लढणार साऱ्या जगाशी
असो कितीही उंच ध्येयं
झेपावणार त्या आकाशी
स्पर्धॆसाठी………
1
मुकबधीरतेचं गलबत घेऊन
जीवनाच्या रणांगणात लढतोय,
आणि वेदनांच्या चिखलात रुतलेलं
तेच गलबत बाहेर काढतोय.
2
का केलास भगवंता मज मुका
मम वेदना बोलून कसा दावू,
श्रवणशक्ती ही नाही दिलीस तू
सांत्वना तरी ऐकून कसा घेऊ.
3
नको पैसा, नको अडका
फक्त ममत्वाचा हात दे,
माणसा फक्त माणूसकिची
मुकबधीरास साथ दे.
शिवा चौधरी
जामनेर,जळगांव
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें