सोमवार, 5 सितंबर 2016

शिक्षण आज काल

शिक्षण आज काल

पूर्वी अ ने व्हायची आई
आज झालं ए फॉर ऍप्पल
पुर्वी आईचं दुध असे श्रेष्ठ
आज जन्मताच कृत्रिम निप्पल

तेव्हा पावकी निमकी संग
पाढे सुध्दाअसायचे तोंडपाठ
आता हीशोबासाठी मुलांना
कॅल्क्यूलेटर सतराशे साठ

पूर्वी आमच्यावर गुरूजन
मेहनत करायचे फार फार
आता दिसतो बिच्याऱ्यांवर
तांदूळ शिजवण्याचा भार

आज बघा खाजगिकरणानं
शिक्षणाची प्रतच ढासाळली
कुरणं काढलित इथं शाळांची
अन नोटांची वैरणं हासळली

तुमच्या अशा धोरणामुळे
गुरूजी बदनाम   होताय
गुरुजींच्या जिवावर इथं
रसमलाई तुम्ही खाताय

लाज बाळगारे दलालांनो
अजून किती किती खाणार
वेळीच नाही ना सावरलात
तर तुम्हाला भस्म्याच होणार

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें