*लावणी*
पहाटंच्या पारी न् भराया पाणी
मी तुझीच हापशी हेरलिया......
वाकड्या दांड्याची,
वाकड्या दांड्याची, हापशी मनात भरलिया ||धृ||
कोरस:- (वाकड्या दांड्याची, हापशी मनात भरलिया )
दोन घागरी....., घेऊन काखेत आले
पाणी भर्रायाला, शालू हिरवा लेवून आले
माझ्या घागरी गोल ,
मुखी छोटा गं होल - 2
धार अरधी बाहेर झरलिया.... ||1||
तोरा हापशिचा, बघावा काय
नळ नम्बरीच, दिसत हाय
रंग काळा जरी,
बघा चमचम करी- 2
मुठं आवळून दांड्याची धरलिया.... ||2||
तुमच्या पाण्याला जोरं भारी
आता आलिया माझी बारी
लावता थोडा जोरं,
सोडी मोठी धारं - 2
दोन झटक्यात घागर भरलिया....||3||
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें