*स्पर्धॆसाठी………*
*दिपावली*
सासरातुनिया पोरं
ओवाळते तुला दिवा
ये गं ये गं दिपावली
आसं लागलिया जिवा……
भाऊराया सिमेवर
दीप चक्षुचे करतो
भाऊबिजेच्या रातीला
उरी हुंदका उरतो
किती मेल्यात बहिणी
पोटी मोहानं दिव्याच्या
कशी सोसते गं कळा
माय अंतरी लाव्ह्याच्या
तार दोंघाना मायेनं
नको मिठाई नी मेवा
ये गं ये गं दिपावली
आसं लागलिया जिवा……
भाऊ बहिणी अनाथ
वाटं तुझी गं पाहता
दारी अनाथालयाच्या
उभे व्याकुळ राहता
दे गं प्रकाश तयांना
उजळण्या तू जीवनं
पाडं हर्षाचा पाऊस
बनुनिया तू श्रावणं
एक सांगणे साऱ्यांशी
तया पाठी उभे राव्हा
ये गं ये गं दिपावली
आसं लागलिया जिवा……
बाप माझा शेतकरी
जळजळतो शेतीत
हात पाय वाती गत
घामं भरे पणतीत
त्याचा घाम तेला वाणी
उजाळतो गं संसारं
जळूनिया पणतीत
करी काळोखा पसार
जळजळीत हे सत्य
सांगतोय तुला शिवा
ये गं ये गं दिपावली
आसं लागलिया जिवा……
*शिवा चौधरी*
*जामनेर,जळगांव*
📞 *9592487310*
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें