*आस*
हरवलेल्या पाखरा भेट एकदा घेऊन जा
आठवातला चेहरा पुन्हा एकदा दावून जा
हृदयात दाटलिया हूरहूर तव भेटीची
येऊनीया दिस चार मजपाशी राहून जा
पोरक्या झाल्या बघ तुजविण सरी श्रावणाच्या
चिंब चिंब सरी खाली एकदा तरी न्हाऊन जा
काळवंडू लागलिया बघ चिंच तुझ्या वाट्याची
गाभूळलेला वाटा तुझा आता तरी खाऊन जा
धडधडतेय काळीज तव मधुर स्पर्शासाठी
काळजावर हात तुझा एकदा तू ठेऊन जा
अडकले प्राण बहूदा काया तुला दावण्याला
शिनली काया माझी अखेरस तरी पाहून जा
🏽 *शिवा चौधरी*
*जामनेर,जळगांव*
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें