आयुष्य
आयुष्याच्या रंगमंचाचा
परदा कसा बरं ओढावा
धडपडणाऱ्या नायकाने
सांगा धीर कसा सोडावा
विसरले जरी काही संवाद
कधी खचून जायचं नसतं
आयुष्याच्या रंगपटावरलं
दुःख दिसू द्यायचं नसतं
एकच प्रयोग आयुष्यात
पात्र मात्र अनेक रंगवा
अभिनयाच्या जोरावर
साऱ्या रसिकांना दंगवा
सहकर्म्यांना घेऊन संगे
कलामंदिर गाजायला हवे
निरोप घेतांना प्रेक्षकांचे
नकळत चक्षू भिजायला हवे
आयुष्याच्या अजस्त्र विंगेत
नटसम्राट कसा घडावा
नटसम्राटाने मरेस्तोवर
अभिनय कसा सोडावा
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें