*काळी आई*
किती केले उपकारं
काळी आई मजवरं
नाही मानले आभार
आम्ही तुझे आजवरं
हरपलं मन माझं
रान हिरवं पाहून
जागवतो रान वारा
गीत मंजूळ गाऊन
दाणे कणिसाचे मोती
कापसाचे शुभ्र सोने
झोळी भरली खच्चून
आता काय मज उणे
दिली पोटाला भाकरी
दिलं मोटेचं तू पाणी
तुझ्या कृपेचे गं आई
गाऊ रोज गोडं गाणी
कृपा ठेवं आम्हावरी
दे गं करमाला फळ
आम्हा खटाया झटाया
माती देशीलं का बळ
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें