लिहत गेलो लिहत गेलो
लिहत गेलो लिहत गेलो
लिहता लिहता भारावलो
भारावून लोचणी आला पूर
शेतकऱ्याची व्यथा लिहतांना
भरभरुन आला उर……………
लिहत गेलो लिहत गेलो
लिहता लिहता हरवलो
हरवलो तुझ्या आठवात
अजून किती दीस जगू सांग
सखे तुझ्या विरहात………
लिहत गेलो लिहत गेलो
लिहता लिहता गहिवरलो
गहिवरतांना चिंता खाई मनाला
कन्ये वाचून कसे जगावे
का? कळेना या मानवाला………
लिहत गेलो लिहत गेलो
लिहता लिहता दचकलो
दचकलो इतक्या साठी
नाते ही का? विसरती लोकं
दोन दिवसाच्या सत्तेसाठी………
लिहत गेलो लिहत गेलो
लिहता लिहता गोंधळलो
गोंधळून झालो बेजार
क्षणाच्या वासनापूर्ती साठी
का ? विकत घेताय आजार……
लिहत गेलो लिहत गेलो
लिहता लिहता भटकलो
का? जगू नये किन्नराने
माणसा सारखं मानानं
या स्त्री सारखं आदरानं……
लिहत गेलो लिहत गेलो
लिहता लिहता थकलो
शब्दा मध्ये विवेक भर रे शिवा
डोळे असून अंधळ्यांना दाव
समाज कल्याणाचा तू दिवा……
© शिवा चौधरी
जामनेर,जळगांव
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें