बुधवार, 13 जनवरी 2016

फुंकर

°
          फुंकर

ससाण्याच्या भितीनं
पिलं लपती पाखरांच्या पराशी
पक्षिनं ही कवटाळते त्यास
हळूच आपल्या उराशी………

काय नातं असे वृक्षाचं
बी रुजवणाऱ्या धराशी
का खेळतात किटक सारे
नुकत्याच डोकावणाऱ्या डिराशी………

संसार जुडलाय सारा
तीच्याच रे उदराशी
तरी का नको वाटे मानवा
गोंडस बाहूली तुज पदराशी………

नाही मागत काही तुजला
वैभवच आणेल ती दाराशी
जन्म देऊन तर बघ कन्येला
तुजसाठी भिडेल ही ती व्याघ्राशी………

आजवर केलेल्या जखमांवर
फुंकर घाला ना जराशी
पाखरां सवे तु ही मानवा
कन्या कवटाळ रे उराशी………
कन्या कवटाळ रे उराशी………

©शिवा चौधरी
      जामनेर,जळगांव

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें