बुधवार, 27 जनवरी 2016

हास्य कविता -2

होता येत नाही

या जगात एकदा झाला बदल
कि पुन्हा मुळ रुपात येता येत नाही
ही वास्तविकता तुम्हाला सांगतोय
हवेत खोटे तीर मारत नाही

शहाळाचं होतय बघा नारळ
पण नारळाचं शहाळं होत नाही
किती ही केली धडपड जीवाची
पुन्हा लहान कधीच होता येत नाही

मुलीचं रुपांतर बाईत होतं
बाईला मुलगी होता येत नाही
एकदा का नवऱ्याचा केला तीनं बैल
त्या बैलाला पुन्हा नवरा होता येत नाही

काही माणसं भेटतात अवचित
त्यांना पुन्हा भेटलं जात नाही
निवडणूकीत घरघर फिरतो
तोच नेता पुन्हा गावात येत नाही

आला जरी गावात चुकून
आश्वासन पुर्ती करता येत नाही
आणि विचारलाच प्रश्न कुणी
तर म्हणे पक्षा पुढं माझं चालत नाही

निवडणूकी आधी असतो माणूस
नंतर खाता खाता होतोय नेता
माणसाला नेता नक्की होता येतं
नेत्याला मात्र माणूस होता येत नाही

© शिवा चौधरी
     जामनेर,जळगांव

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें