भ्रूण हत्या
सोनोग्राफिचा माऊस
फिरु लागला पोटावर
हसू कसं फुलेल सांगा
त्या माऊलीच्या ओठावर……1
कसलं तरी औषध
लावलं गेलं ओटी पोटी
एक नारी दुसऱ्या नारीची
खालि करणार होती ओटी……2
लग्ना नंतर बिचारी
आई होऊ पहात होती
तीच्या पोटची मात्र आज
कळी खुडली जात होती……3
डोळे होते भरलेले
कंठ आला होता दाटून
जणू धमण्यातलं रक्त तीचं
गेलं होतं आटून……4
केविलवाण्या नजरेनं
छताकडे पहात होती
आई होण्या आधीच दुसरी
आई मारली जात होती……5
विज्ञानानं प्रगती केली
अन् शिखरावर पोहचलं
चांगलं राहीलं बाजुला
लोकांनी वाईटच घेतलं……6
शनै: शनै: माऊस तो
जसा फिरू लागला
बाबा म्हणून घेणारा ही
सांगा असा का? वागला……7
मी सांगते तुम्हास धनी
ही मुलगी नसेल आपली
अन्यथा तुम्ही आज
नसती तीला कापली……8
लाज वाटेल माझी तुम्हास
जर माझा एक गेला डोळा
मग तीच लाज कुठे जाते
कापतांना हा पोटचा गोळा……9
सासूबाई बाई अडाणी
सासरेबुवा हतबल झाले
शिकून सवरुन तुम्ही धनी
सांगा का ? वाया गेले……10
पैशा साठी डॉक्टर तो
आज जीव घेणार आहे
मेल्यावर तोच पैसा
सोबत का ? तो नेणार आहे……11
चाकू ,सुरे , कात्री घेऊन
तयार होते लढायला
विश्वातील सर्वश्रेष्ठ रत्नाचे
तुकडे तुकडे पाडायला……12
कुठून तरी आर्त हाक आली
आई मला जगायचंय
तु भोगतेय तेच दुःख
मला ही भोगायचंय……13
गडगडली वीज नभी
अन् बळ तीनं एकवटलं
गर्भातल्या आर्त हाकेनं
काळीज तीचं फाटलं……14
उठली ती ताडकन
अन् बंड तीनं पुकारला
अबलत्वाचा श्रृंगार आज
तडक तीनं झुगारला……15
प्रत्येकीनं असंच
वागायला पाहीजे
वाघिण असते नारी
वाघिणी गत जगायला पाहीजे
वाघिणी गत जगायला पाहीजे……16
©शिवा चौधरी
जामनेर,जळगांव
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें