कातरवेळ
कातरवेळ च्या वाऱ्या
नको छेडू येता जाता
आयुष्याचा उतार हा
उतरतोय मी आता
आयुष्याच्या प्रारंभाला
डोंगरमाथी फिरलो
आठवेणा मज तेव्हा
होतो किती घसरलो
शब्द माझे प्रेरणेचे
वाटत होती तयांना
आज तीच का ? माणसे
देतीय मज यातना
शब्द तेच भाव तोच
फक्त वेळ मात्र न्यारी
आयुष्याच्या सांजवेळी
मज बोलण्याची चोरी
मुका झालोय मी आता
कंठ असून मोकळा
कशा दावू वाऱ्या तुला
सुप्त अंतरिच्या कळा
स्वच्छंदी वागलोय मी
आयुष्याच्या उंबरठी
आता नकोशी झाली रे
मज जीवनाची "साठी"
वाटे मज गेले रे ते
तारुण्य काल परवा
मनी शहारीत होता
कातरवेळी गारवा
आठवांचे फुले देती
अंगावरती शहारे
तीच फुले झाली आता
धगधगती निखारे
उगाच त्या निखाऱ्यांना
का? हवा देतो सारखी
आयुष्याची झाली माझ्या
" कातरवेळ " नरकी
© शिवा चौधरी
जामनेर,जळगांव
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें