शनिवार, 2 अप्रैल 2016

स्पर्श रातराणीचा सुगंध

अष्टाक्षरी……

मन दळते दळणं
पिठं आसवांचे पडे
दाणे सुखाचे पडता
मन आनंदात रडे

जातं मनाचं कठोर
धान्य दुःखाचं ही दळे
माझ्या मनाच्या जात्यास
दुःख कसं ? बरं कळे

मनामनाच्या जात्यास
खुटा रोवला बोरीचा
गोड कडू गात ओव्या
कंठ दाटतो पोरीचा

जेव्हा मनाच्या जात्यास
लागे ओवीचा ग छंद
स्पर्श जणू भावनांचा
रातराणीचा सुगंध

शिवा चौधरी
      जामनेर,जळगांव

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें