बाप
आसवं होती पापणीत
अन रक्त साचले नयनी
काय सांगू राजे हो
आपल्या बापाची कहानी
बाप पितो आसवं
अन तुला मात्र पाणि
त्याच्या वाटेल खस्ता
तुला दहि दूध लोणी
काय करावं लेकरासाठी
काहीच त्यास कळेना
कालच दहि दूध लोणी
आज तुला ही मिळेना
कारण त्याची दुधती गाय
त्यांनी केलीय खाटी
आमची लेकरं उपाशी
त्यांच्या लेकरां साठी
हताश होतो बाप
अन् बघतो आढ्याकडे
जहराचा डब्यासंग
बाप हमसून रडे
रक्ताळलं काळिज त्याचं
अन घायाळ झालं मन
संसारासाठी बापाची
असे सदाच वणवन
रक्ताळल्या काळजाला
चिंधड्या होत्या बांधलेल्या
शिवत होता उगाचच
दाभणाने जंगलेल्या
धनुर्वाताची कधी ही
पर्वा तो करत नाही
ईच्छा असून ही बाप
स्वेच्छेने मरत नाही
दिसते जरी आत्महत्या
पण तो असतो खून
हे फक्त त्यालाच कळते
जो बघतो त्याला निरखून
जळो मरो कष्ट खाणारे
आपआपल्या पापाने
का करावी आत्महत्या
सांगा आपल्या बापाने
ता.क. कितीही होऊ दे हाल अपेष्टा परंतु शेतकरी मायबापांनो आत्महत्या करु नका. तुमच्या जाण्यानं प्रश्न सुटत नाहीत, ते आणखीनच वाढतात……
डोळ्यात आणून खोटे आसू ते तुमच्या परिवारा संग फक्त सेल्फी काढतात.
शिवा चौधरी
जामनेर,जळगांव
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें