गुरुवार, 28 अप्रैल 2016

जरा विसावू या वळणावर

जरा विसावू या वळणावर………

थकले गात्र अन् झिझली काया
सोडून लालच आणि मोहमाया
निरोप घेऊनी या जगताचा
घाट घातला मी मरणाचा
देह अंथरला या सरणावर,
जरा विसावू या वळणावर………

काय ते पातक घडले असावे
कपट कुकर्म मनी दडले असावे
सोडून सारे ईथेच ईथले
क्लेश अंहकार सारेच पुसले
दया करावी जाणारावर,
जरा विसावू या वळणावर………

पुसली असावी छटा पुण्ण्याची
माफि द्यावी मज मम गुन्ह्याची
पुनः न भेट या जन्मी विराळे
दोन बोल तू बोल  निराळे
या अभाग्या...च्या मरणावर
जरा विसावू या वळणावर………

तू न मोठा ज्ञानी भामटा
नकोस काढू उगाच चिमटा
गोड शब्द हवे तव जिव्हाळी
आयुष्याच्या या संध्याकाळी
नको मगरी आसवे या देहावर
जरा 🤒 विसावू या वळणावर………

जाता जाता तुम्हा सांगतो रे
हिशोब इथले  चुकले सारे
दे भुक्या चारा नी तृष्णा पाणि
अन ठेव मानसा मधुर वाणी
मग जावे ना लागे देव्हाऱ्यावर
जरा 🤒 विसावू या वळणावर………

शिवा चौधरी
जामनेर,जळगांव

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें