पित्तरपाटा
घरी बाजरीचा घाटा
तरी करी पित्तरपाटा
बाप जिताव्हता तवा
अवधडा त्येच्या वाटा
जिते पणी तुयासाठी
राबराबली माऊली
तवा दिली नाही तीले
कुनी मायेची साऊली
आता शेरभर तुप
सांडीतो आगीवर
जीत्या पणी तेयेले
भेटेना सुखाची भाकर
पोटं भरलं कावळ्याचं
कसं शिवलं पिंडाला
काही दक्षिणेसाठी सांगे
तुया बाप रे रुसला
श्राद्ध करुन बापाचं
थोडा दान धर्म कर
कावळा शिवेल पिंडाला
असं काही कर्म कर
चोहीकडे लुट सारि
भीति दावितो धर्माची
शिकुन ही वाया गेला
कहानी विसरी कर्माची
: ©शिवा चौधरी(कळमसरेकर)
जामनेर,जळगांव
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें