गुरुवार, 22 अक्टूबर 2015

समजु नका लेखणीची बोथट झाली धार……

समजु नका लेखणीची बोथट झाली धार……

लिहती जरी लावणी, गजल
अन् कवितेचे विविध प्रकार
समजु नका लेखणीची
बोथट झाली धार……

लिहती जरी प्रेमकविता
किंवा लावणीचा झटका,
भ्रष्टाचार करणाऱ्यांवर
लगावती शब्दाचा फटका,
अन्ययाचा पक्ष घेऊन
बोलू नका रे फार,
समजु नका लेखणीची
बोथट झाली धार……

मारलेत तुम्ही पानसरे
अन् मारले दाभोळकर,
मारलेत जरी कलबूर्गी
पण पुन्हा जन्मले हाजारांवर,
मारणार तुम्ही विचारवंत
पण मरत नाहित विचार,
समजु नका लेखणीची
बोथट झाली धार……

त्यांच्या समोर बोलायला
बोबडी का हो वळतेय,
का ? असे लाजिरवाणे
वर्षानुवर्षे घडतेय,
शब्द नव्हेत ती त्यांची
शस्त्र आहेत धारदार,
समजु नका लेखणीची
बोथट झाली धार……

कायदे करुन माणसांची
मुसकी आवळू नका,
समाजसेवा करा प्रांजळपणे
नुसता देश गिळु नका,
कायदा असा करा तुम्ही
ज्याने थांबेन रे भ्रष्टाचार,
समजु नका लेखणीची
बोथट झाली धार……

रक्त पिऊन इथं सारि
बनलित बघा ढेकून,
निवडणूकीच्या टप्प्यात मात्र
नमस्कार करती वाकुन,
शब्दांना शब्दच राहू द्या
त्यांचा सोसवणार नाही प्रहार,
समजु नका लेखणीची
बोथट झाली धार……

अन्यायाच्या विरोधात
बोलते लेखणी त्यांची,
मोठमोठ्या घोटाळ्यांचे राज
सुद्धा खोलते लेखणी त्यांची,
बोलत राहील सदा ती
नाही कुणाला ही भिनार,
समजु नका लेखणीची
बोथट झाली धार……

            ©शिवा चौधरी(प्रहार)
                जामनेर,जळगांव

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें