बुधवार, 7 अक्टूबर 2015

लावणी

लावणी

अहो काय बाई उगाच बसला,
चला फेरफटका आज मारु या....
आणि शब्दातुन हो या जिभेचे,
चोचले आज पुरवू या...गं गं गं ……
माझी राणी तू गं…माझी राणी तू  गं…

आरं बाजारातुन रोजचं वांगी,
अन् मीरच्या आनतो संगतीला…
भाजून वांगी अन् मीरच्यांच,
भरीत करु चल पंगतीला...गं गं गं ……
माझी राणी तू गं…माझी राणी तू  गं…

अगं लय मजा ती खान्देशाच्या भरीता मंधी,
एवडचं आहे तुले आता सांग्याचं...
अन् चारिन मया हातचं तुले,
भरीत रोज मी वांग्याचं...गं गं गं ……
माझी राणी तू गं…माझी राणी तू  गं…

पुरणपोळी अन् श्रीखंड पुरी
आमरस भेटे कधी कधी…
अन जोंधळ्याच्या भाकरी संग,
ठेचा चाले तोऱ्यामंधी...गं गं गं ……
माझी राणी तू गं…माझी राणी तू  गं…

अगं नाक मुरडूनी का गं बसली,
काय हवं तुला बोलं तरी…
अन् कोकणाच्या आठवणसाठी,
आणुन देतो काजूकरी...गं गं गं ……
माझी राणी तू गं…माझी राणी तू  गं…

काजूकरीचे नाव ओठी येता,
खुलली तुझी कळी गं…
अन् कोकणातल्या पापलेटाची,
दिसते तुजला गोडी गं...गं गं गं ……
माझी राणी तू गं…माझी राणी तू  गं…

झिंगला गं जीव हा माझा,
या फास्टफूडच्या वासानं…
अन् तृप्त होई जीव हा सारा,
मराठमोळ्या घासानं...गं गं गं ……
माझी राणी तू गं…माझी राणी तू  गं…

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें