शनिवार, 12 सितंबर 2015

बालपण

बालपण

रीमझीम रीमझीम पावसाळा
घेउन येई खुप साऱ्या वाण्यांचा सडा
एक ईकडुन पळायचा दुसरा तिकडुन पळायचा
आमच्या साठी तो झुकझुक गाडीचा खेळ व्हायचा
एखादा बसायचा दुसऱ्याच्या उरि
वाटायचं तेव्हा डबलडेकर आली दारि

रिमझीम रिमझीम गंमत पावसाची न्यारी
अवतरली धरतीवर मखमली परी
स्पर्श होता लाजते नवी नवी नवरी
कोडं पडलं अजुनही देवगाय येते कशी धरणीवरी
लेवुन येते बाई लाल लाल रंग
रूप तिचं बघता होती सारे दंग

रिमझीम रिमझीम पाऊस कीती गोड
झुलवायची मनाला गोगलगाय ची ओढ
गोगल गाय गोगल गाय
खरचं पोटात दडलेय, कागं तुझे पाय
किती किती शांत तु असतेस गं बाई
नटखट बाळाला उपमा तुझी का गं देते आई

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें