सोमवार, 7 सितंबर 2015

वंशाची पणती लेख


$$ "वंशाची पणती" $$

       जरा वेगळच वाटतंय ना " वंशाची पणती " कारण आपण ऐकलाय तो वंशाचा दीवा आणि या दिव्या साठि समाजात गर्भपात, कन्याभ्रुण हत्या, भुतविद्येचा सहारा घेऊन असंख्य मुलींची हत्या करण्यात आली आहे आणि मानसिकता जर बदलली नाही तर पुढेही होतच राहतिल, मी तर याला हत्याच म्हणेल कारण आपला वंश पुढे चालावा म्हणुन मुलगाच हवा ही समाजाची धारणा होऊन बसलीय. आणि त्यासाठी ज्या नराधमांनी मुलींच्या हत्या केल्या असतील त्या कोणत्या का रुपाने असो हा लेख वाचतांना मिरच्या नक्किच झोंबतील, यात शंकाच नाही.
समाजात जरी ही धारणा असली कि वंश मुलगा चालवतो तरी माझ्या मते तुमचा वंश पुढे ढकल्याचं काम करते ती मुलगी, जी तुमच्या साठी तुमची कधीच नसते पण तुमचा वंश चालवन्या साठी दूर कुठे तरी ती वाढत असते. अगदी तुम्हाला बेमालुम पणे पण तरीही तो कुंभार ती पणती घडत असतो अगदी निस्वार्थ पणे आणि आपण स्वार्थी माणसं त्याचं मुलीनं जर एखाद्या मुलीला जन्म दिला तर तीच्या वर ताशेरे ओढतो. दुसऱ्याच्या घरातुन आलेली मुलीने  तुमचा वंश पुढे चालावा म्हणुन तुमच्या साठी मुलगाच जन्माला घालावा, असा तुमचा हेका असतो पण तुमच्या साठी ज्यांनी मुलगी तुमच्या घरात पाठवली, त्यांच्या उपकाराची फेड मुलीला जन्माला घालुन पुर्ण करता येऊ शकते पण तशी मानसिकता असावी लागते तसा सद् विचार अंगी असावा लागतो, पण आमच्या अंगी तशी मानसिकता यायला किती काळ लागेल सांगता येत नाही. स्त्री मुलाला जन्म देत नाही म्हणुन स्त्रीला ही जीवे मारणारे नराधम आज ही पहायला मिळतात. कुणी लाडाने वाढवलेली कन्येला मारतांना लाज कशी वाटत नसेल त्या नालायकांना त्यात काही स्त्रीया ही असतात, त्यांनी तरी याला विरोध करायला हवा पण नाही, काहीवर जबरदस्ती केलि जाते तर काही स्वतःहुन
ते पाप करायला पुढे असतात. स्वतःचा वंश पुढे चालावा म्हणुन दुसऱ्याचा वंश चालवण्यासाठी आकार घेत असलेल्या फुलाला गर्भातच कुस्करतांना लाज कशी वाटत नसेल या गोष्टीच नवलं वाटतं, फेसबुक वर प्रेयसीसाठीची कविता वाचुन लाईक ठोकतांना आणि  प्रेयसीसाठी जसा प्रेमाचा झरा वाहु लागतो. मग गर्भपात करतांना मुलींना जिवे मारतांना बुद्धि गहाण ठेवलेली असते का? तेव्हा प्रेम कुठे जातं, एखाद्या मुलीने सुंदरसा फोटो अपलोड केला कि कमेंट सांगायची गरज नसते त्या वेळेस जणु ते लेखक होतात आणि एका पेक्षा एक सरस कमेंट टाकतात, लहान मुलींसाठी क्युट बेबी म्हणनारे आपण वास्तविक जिवनात मुलींसाठी काय करतोय. लिंग गुणोत्तरातला फरक दिवसे दिवस इतका वाढत चाललाय त्याचा विचार काय सरकारनं करावा कि काय ? नवल आहे राव् तुमचं
सरकारच्या नावानं बोंबा मारायची सवय पडलीय ना आता इथं पण सरकार बोलावणार कि काय ? लाज वाटायला पाहीजे आपल्याला लाज !
आपल्या सर्वांना ही मानसिकता बदलावी लागेल कि मला वंशाचा दिव्या सोबत वंशाच्या पणतीची पण तीतकिच गरज आहे कारण माझ्या घराचा वंश चालवन्या साठी जर दुसरा व्यक्ति मुलगी जन्माला घालतोय तर मला कुणाचा वंश चालवण्या साठी मुलीला जन्म दीलाच पाहीजे, मी असं म्हणत नाही कि मुलगी होत नसेल तर डझन भर मुलं जन्माला घाला पण गर्भात मुलींना मारणे तर थांबवु शकता ना ? मुलीला जन्म देणाऱ्या स्त्रीला त्रास देणं तर थांबवु शकता ? मगं तितकं तर करा. कारण सृष्टिकर्त्याने जगण्याचा अधिकार फक्त तुम्हालाच नाही दिलेला तो अधिकार प्रत्येकाचा आहे मगं ती मुलगी असो वा मुलगा. कृपया त्या चिमुकलीचा जीव नका घेऊ, आणि त्या वंशाच्या पणतीला आकार घेऊ द्या.

© शिवा चौधरी(कळमसरेकर)
       जामनेर, जळगांव

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें