बुधवार, 9 सितंबर 2015

सखा

  सखा

तुच माझा मित्र
तुच माझा सखा
तुच पाठीराखा
सवंगड्या

रातं दिस एक
मित्रांसाठी होई
स्वार्थ दूर ठेवी
मित्र माझा

सर्वापुढे फिके
मित्रांचेच त्याग
मित्र अनुराग
खरा माझा

मित्र मित्र मित्र
मानतो मी तुला
भुलु नको मला
तवं दुःखी

मित्राचं हे नातं
रक्ताहुन भारी
तोड नाही खरी
सख्या तुला

पुर्णत्वासी नेई
मित्रांची संगत
जीवनी रंगत
मित्रांमुळे

आज आला खरा
फ्रेंडशिप दिन
सर्वामुखी गान
मैत्रीचेच

तुज संग आहे
आनंदात सारे
मित्र जान खरे
संकटात

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें