शुक्रवार, 11 सितंबर 2015

झुला


              झुला

झुला म्हणु कि झोपाळा
झोका म्हणु कि हींदोळा
नाही मज समजले

शब्दांच्या या खेळामध्ये
तेव्हा नाहीच उमगले

बाबांच्या हाताचा झुला बिनघोर असायचा
झोपायची बिनधास्त मी अन् तात्कळत तो बसायचा

आईच्या झोक्यात पोटाभोवतीचा कपडा नाही उमजायचा
आवळुन बांधलेल्या कपड्यात ही भाव काळजीचा असायचा

सखी संगे हिंदोळ्यावर उंच आकाशी जरी जायचे
एकमेकींना झुलवतांना जीव कासाविस व्हायचे

आज झोपाळ्यावर तुझ्या कुशीत जरी विसावले
तरी चित्त मात्र सोनुलीच्या झोक्यातच सामावले

झोप गं चिमुकले तु, मी जागेन सारि सारि रात
अस्तित्व तुझे जपण्या एकत्र करेल कायनात

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें