शनिवार, 12 सितंबर 2015

किव (लेख)

।। किव ।।

"आपला आपण करावा विचार तरावया पार भवसिंदू"

हे वाक्य साधारण 20 वर्षापुर्वी अभ्यासात आलं होतं, याचा नेमका अर्थ मला ही उमगला नव्हता पण आज लोकं याचा सोई नुसार अर्थ लावुन मोकळे होतात, मतदारांच्या दारोदारी मतांची भिक मागत फिरनारे प्रसंगी पायावर लोटांगण घेनारे नेते मंडळी सत्तेवर आले कि मतदार राज्यालाच विसरता, त्याला दिलेल्या आस्वासनांचा त्यांना जणु असा विसर पडतो कि त्यांनी कधी असे वाक्य बोललीच नव्हती किंवा असं म्हणा हवं तर त्यांचे आस्वासनं अशी गायब होतात जसे घोड्याच्या डोक्यावरचे सिंगे, त्यांना आठवतं ते वाक्य कि " आपला आपण करावा विचार तरावया पार भवसिंदू" या वाक्याचा अर्थ त्यांनी असा घेतलाय कि आपण फक्त आपला विचार करावा 5 वर्षात हवं तितकं चाटुन घ्यावं मगं गाडगं चाटुन चाटुन झिझलं तरी हरकत नाही, आणि कुणी प्रश्न केला तर द्यायचा दाखला तुमचं सरकार होतं तेव्हा तुम्ही काय केलं. अरे त्यांनी लाख काही केलं नाही तु काय करतोयस ते बघं आपण काय करतोय हा विचार करा जर तुम्हाला हा समुद्र पार करायचा असेल तर,
त्या वाक्याचा असा अर्थ घ्या पण घेतला जातो उलटाच स्वतःचा विचार करुन घरं भरायची कामं करनारी नेते मंडळीच जास्त कामं करणारी तुरळकच आणि तुम्हीतरी काय करत होता विरोधक असतांना हेच कि जे आज ते करत आहेत, आणि विरोधकांनी ही चुका केल्याच असतील कि म्हणुन तर तुम्ही आज सत्तेत नाही.
असो तुमचंही तेचं होईल जर असचं चालत राहीलं तर पण मग तुमच्या या ओढाताणी च्या खेळात सामान्य नागरीकाने सरणावर जाई पर्यंत वाटच पाहावी का कि तुमचे अच्छे दिन कधी येनार, आणि तुमच्या अशा धोरणाने शेतकरी स्वतःहुन अच्छे दिन ओढवुन घेतो,  त्याच्या साठी त्याला खर्च ही करावा लागत नाही कारण घरात परिस्थिति मुळे विकलेल्या गुराचं दावं (दोरखंड) असतंच नाही तर पिकावर शिंपडायला आणलेल थोडं फार औषध उरलेलं असतंच आणि असे अनेक बिन खर्चाचे मार्ग अवलंबुन आपलं जीवन संपवुन घेतो आणि अच्छे दिन सुरु होतात कारण त्याला आता कुणाचीच चिंता नसते, निवांत झोप घेत पडतो
त्याच्या साठी हेच चांगले दिवस असतात कदाचित ?
आणि सर्वात जास्त वाईट तर तेव्हा वाटतं जेव्हा शेतकऱ्यांचेच मुलं विद्यमान सरकारचा पक्ष घेत तुमचं सरकार असतांना तुम्ही काय केलं असा जाब विचारतात. दुसऱ्या बाजुनंही शेतकऱ्यांचीच मुलं उत्तरं पण देतात,
शेतकरी मरतोय हे कुणालाच दिसत नाही का त्याच्या वर दुष्काळाचं सावट पडलंय त्यांच कर्ज कुणी माफ करायचा कुणी विचार करत नाहीत आणि हे आज पासून नव्हे तर या सरकार येन्याच्या अगोदर पासुन सुरु आहे फरक इतकाच कि जे काल म्हणत होते तुम्ही काय केलं आम्हाला जाब विचारताय तर पण आज उलट चित्र दिसतयं कारण सरकार बदललंय ना! आणि कदाचित ती शेतकऱ्यांची मुलं सदन घरातली असावी म्हणुन असे प्रश्न उत्तरं करतांना दिसतात. मग अशा लोकांची किव करावीशी वाटते, अरे जरी तुम्ही सदन असलात तरी त्याचा विचार करा ना जो दोन वेळच्या अन्नासाठी मरमर मरतोय, आता काही जन म्हणणार आम्ही सदन कसे ?
तर भावांनो जर खरचं सदन नसता तर ज्या मोबाईलवर पोस्ट वाचतोय तो विकत घ्यायची गरज होती का? काही प्रश्न स्वतःलाच विचारावी उत्तरं नक्की मिळतीलं आणि एक दुसऱ्यावर चिखल फेक करण्या पेक्षा राजकारणाला बाजुला सारुन तुम्ही शेतकऱ्यांची पोरं एक व्हा, मग नंतर राजकीय गटांनी एक येऊन काम करावे अशी ईच्छा जाहीर करा. म्हणुन म्हणतो, " आपला आपण करावा विचार तरावया पार भवसिंदू" तुम्ही काय करु शकता हा विचार करा दुसऱ्याने काय केले हे बघु नका, नाही तर निदान पुन्हा तुमची 'किव' करावीशी वाटेल असे विधानं तरी करु नका.

©शिवा चौधरी(कळमसरेकर)
जामनेर,जळगांव
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें