रविवार, 13 सितंबर 2015

शब्द

शब्द

शब्द वेडी मी शब्द वेडा तु
शब्दाच्या मदतीनं करु प्रेमाचं गुप्तगूं

शब्दापासुन प्रेम सुरु झालं तुजवर
शब्दांच्या खेळात मी भाळले मी तुजवर

शब्दांचीच फुलं शब्दांच्याच माळा
एक शब्द हार तुझ्या गळा एक माझ्या गळा

शब्दांच्याच गावात थाटु सुंदर संसार
शब्दांच्याच भिंती शब्दांचेच दार

माझे शब्द तुला घे तुझे शब्द मला दे
शब्दांच्या जोरावर बांधु एक बंगला

शब्दांच्या भ्रमात सरली आज रात्र
शब्दांच्या मिलनाने थंडावले गात्र

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें